आत्मनिर्भर ट्विट | जगभर जाणाऱ्या ७०% लसी मेड इन इंडिया | मोदी-शहांना माहित नाही?
नवी दिल्ली, ०३ जानेवारी: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन देशात कोरोना लशीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिल्याचा आनंद व्यक्त केला. तसेच, भारत देश आत्मनिर्भर होत आहे, याचं हे पहिलं पाऊल असल्याचंही मोदींनी म्हटलं. देशात कोरोना लसीच्या परवानगीची आनंदी बातमी मराठमोळ्या डॉक्टरने अधिकृतपणे दिली, देशवासियांसाठी आणि महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. त्यामुळे, मोदींनीही आनंद व्यक्त करत वैज्ञानिकांनी देशवासीयांचं स्वप्न पूर्ण केल्याचं म्हटलंय.
यह गर्व की बात है कि जिन दो वैक्सीन के इमरजेंसी इस्तेमाल को मंजूरी दी गई है, वे दोनों मेड इन इंडिया हैं। यह आत्मनिर्भर भारत के सपने को पूरा करने के लिए हमारे वैज्ञानिक समुदाय की इच्छाशक्ति को दर्शाता है। वह आत्मनिर्भर भारत, जिसका आधार है- सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया।
— Narendra Modi (@narendramodi) January 3, 2021
त्यानंतर काही वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील अभिनंदन करतात मोदींच्या आत्मनिर्भर भारताचं कौतुक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कंगना रानौत तर भाजपसाठी मार्केटिंग करण्यास २४ तास ऑनलाईन असते आणि त्यामुळे वेळ न घालवता तिने अमित शहांच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली.
2021 starts with a great news … indeed a glorious year 🙏 https://t.co/p74fi8fsaj
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 3, 2021
मात्र देशात विकसित झालेली कोरोना लस ही पाहिली लस नाही याचा देखील या नेत्यांना विसर पडला आहे. स्वतःच्या पक्षाने दिलेल्या आत्मनिर्भर टॅगलाईनच्या मार्केटिंगची संधी मात्र पूणर्पणे कॅश केल्याचं पाहायला मिळालं आहे. वास्तविक जगभरात वापरल्या जाणाऱ्या ७६ टक्के लस या मेड इन इंडिया आहेत हे सत्य न सांगता आत्मनिर्भर टॅगलाईनची मार्केटिंग करण्याचे प्रकार सुरु आहेत. देशातील आरोग्य विषयक संशोधनात भारतीय वैज्ञानिकांचा इतिहास किती मोठा आहे हे सत्य तरुणाईपासून लपवलं जातंय असं म्हणावं लागेल.
जगातील लस संशोधनात सर्वात नावाजल्या जाणार्या डॉ. जेरोम किम यांनी देखील कोरोनाव्हायरस साथीच्या आजाराला सामोरे जाण्यासाठी भारताची मोठी भूमिका असेल असं आधीच म्हटलं होतं आणि त्याला कारण भारताचा याविषयातील इतिहास कारणीभूत होता. डॉ. किम यांनी WION’शी संवाद साधताना सांगितले होते की, “लसीकरण करण्याच्या कार्यक्रमांसाठी जगभरात वापरल्या जाणाऱ्या लसींपैकी 70% लसी भारतात बनवल्या जातात. जगातल्या जवळपास प्रत्येक लहान मुलांना मिळालेली लस ही भारतातच तयार केली गेली असं देखील डॉ. जेरोम किम म्हणाले. (सविस्तर मुलाखत येथे वाचू शकता)
यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या वेबसाईटवर देखील भारतातील लस संबंधित संपूर्ण इतिहास आपण पाहू शकता आणि त्यावरून भारत आरोग्य विषयक संशोधनात मोदी सरकार आल्यावर आत्मनिर्भर झाला की भारतीय वैज्ञानिकांचा इतिहास पूर्वीपासून महान आहे याचा अंदाज घ्यावा. (इतिहास येथे वाचा)
News English Summary: Prime Minister Narendra Modi took to his Twitter account to express his happiness over the emergency use of corona vaccine in the country. Modi also said that this is the first step towards India’s self-reliance. This is a proud moment for the people of the country and for Maharashtra. Therefore, Modi also expressed happiness and said that scientists have fulfilled the dream of the countrymen.
News English Title: Corona Vaccine Atmanirbharbharat campaign of Modi government after emergency approval news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON