24 January 2025 8:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Zomato Share Price | झोमॅटो शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ZOMATO HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँक शेअर 5 रुपयांवरून 1665 रुपयांवर पोहोचला, पुढची टार्गेट नोट करा - NSE: HDFCBANK Wipro Share Price | विप्रो शेअर 7 रुपयांवरून 317 रुपयांवर पोहोचला, आता पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: WIPRO Bonus Share News | संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, शेअरने 4038 टक्के परतावा दिला - BOM: 531771 Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: TATAPOWER Personal Loan | पर्सनल लोन घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करताय, लोन घेण्याआधी या गोष्टींवर नजर फिरवा
x

लस पुरवठ्यावरून महाराष्ट्र सरकारवर आगपाखड करणाऱ्या केंद्राकडून परदेशात सर्वाधिक पुरवठा

Corona vaccine, supply, Maharashtra, Foreign Countries

नवी दिल्ली, २७ मार्च: देशात कोरोना संक्रमणानं पुन्हा एकदा वेग घेतलेला दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातून समोर येत आहेत. याच दरम्यान केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारवर लसीकरण आणि लस पुरवठ्यावरून बेजबाबदारपणाचा आरोप केला होता. राज्याला पुरवण्यात आलेल्या लसीच्या डोसपैंकी ५६ टक्के लसीचा वापरच करण्यात आलेला नाही, असं जावडेकर यांनी म्हटलं होतं.

या संदर्भात प्रकाश जावडेकर यांनी एक ट्विट केलं होतं. ‘केंद्राकडून महाराष्ट्राला आतापर्यंत ५४ लाख लसीचे डोस पुरवण्यात आले आहेत. परंतु, महाराष्ट्रानं केवळ २३ लाख लसीच्या डोसांचाच वापर केला आहे. याचाच अर्थ ५६ टक्के लसीचा वापरच झालेला नाही’ असा आरोप जावडेकर यांनी केला आहे. यानंतरही, शिवसेनेचे खासदार संसदेत राज्यासाठी अतिरिक्त लशीचा पुरवठा करण्याची मागणी करत आहेत असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील आधीची मागणी करण्यापेक्षा आकडेवारीच्या खेळात राज्य सरकारलाच धारेवर धरलं होतं.

मात्र आता आपल्याच देशातील राज्यांना लस पुरवठा करण्यावरून राजकारण करणाऱ्या भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे. भारतातील लोकांचा जीव वाचविण्यास प्राधान्य द्यायचं सोडून मोदी सरकारने केलेल्या कृत्याने अनेकांनी संताप करण्यास सुरुवात केली आहे. कारण मोदी सरकारच्या वतीने संयुक्त राष्ट्रात देण्यात आलेल्या माहितीमुळे मोदी सरकारविरोधात संताप व्यक्त होण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने संयुक्त राष्ट्रांमध्ये केलेल्या दाव्यानंतर देशभरात संतापाचं वातावरण पाहायला मिळू शकतं. कारण भारताने आपल्या देशातील नागरिकांना जेवढ्या कोरोनाच्या लसींची डोस दिले नाहीत त्याहून अधिक डोस परदेशामध्ये निर्यात केलेत, असं स्वतः मोदी सरकारने संयुक्त राष्ट्रांसमोर सांगितलं आहे. लसींचे डोस निर्यात करण्याआधी भारतीयांना प्राधान्य देत त्यांचं लसीकरण सरकारने केलं अशतं तर सध्या देशात दिसणारी करोनाची दुसरी लाट थांबवता आली असती. पण मोदी सरकारने तब्बल ७० देशात लस निर्यात केली असून त्यात भारतीयांना दुय्यम स्थान म्हणजे भारतातील लोकांपेक्षा जगभरात अधिक लस पुरविण्यात आली आहे. या वृत्तामुळे मोदींना आंतरराष्ट्रीय नेते होण्याची घाई झाली आहे का असा प्रश्न समाज माध्यमांवर उपस्थित होऊ लागला आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी नागराज नायडू यांनी त्यासंदर्भात थेट संयुक्त राष्ट्रात माहिती दिली आहे.

 

News English Summary: The corona infection in the country seems to be gaining momentum once again. Maharashtra has been witnessing the highest number of patients in the country for the last few days. Meanwhile, Union Minister Prakash Javadekar had a few days back accused the Maharashtra government of irresponsibility in vaccination and vaccine supply. Javadekar had said that 56 per cent of the vaccines supplied to the state have not been used.

News English Title: Corona vaccine supply to Maharashtra controversy news updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)#Vaccination(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x