Health First | जाणून घ्या थंड अश्या काकडीचे गुणधर्म । नक्की वाचा
मुंबई ३० एप्रिल : खीरा किंवा काकडी एक असा खाद्य पदार्थ आहे जो पुर्ण भारतात सहज मिळतो. काकडी शरीराला शीतलता आणि ताजेपणा प्रदान करते. याला तुम्ही अनेक प्रकारे खाऊ शकता. जेसे सलाड, सँडवीच, किंवा तिखट मिठ लावुन खाऊ शकता. काकडीचे स्वास्थवर्धक आणि सौंदर्यवर्धक गुण दोन्ही अगणित आहेत.आयुर्वेदिकदृष्टय़ा काकडी ही शीतल, पित्तशामक, पाचक आणि मूत्रल आहे. काकडीचे बी शीतल, मूत्रल, पुष्टीकारक आहे. काकडीच्या या गुणधर्मामुळे ती खाल्ली असता शरीरातील अंतर्गत स्राव व मूत्रप्रमाण वाढते व पर्यायाने मूत्रविकार दूर होतात.
काकडीत विपुल प्रमाणात खनिजे आहेत. अनेक जण काकडीची साल काढून काकडी खातात; परंतु शक्यतो साल काढूच नये. कारण हे काकडीच्या सालीलगतच क्षार व जीवनसत्त्वे यांचे विपुल प्रमाण असते. काकडीमध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस ‘क’ जीवनसत्त्व, पोटॅशिअम, मीठ, मॅग्नेशिअम, गंधक, सिलिकॉन, ग्लोरीन, बम्लोरीन व तंतुमय पदार्थ ही पोषकद्रव्ये मिळतात.
सहसा काकडी ही कच्ची खावी, कारण कच्ची काकडी ही पौष्टिक व पचण्यास हलकी असते.
उपयोग :
काकडी ही पित्तशामक असल्याने अपचन, उलटी, मळमळ, पोटात गुब्बारा धरणे
या विकारांवर काकडीचा नियमित जेवणात वापर करावा.
- भूक मंद झाली असेल तर काकडीचे काप करून पुदिना, काळे मीठ, लिंबू रस, मिरे व जिरेपूड घालून खावेत. यामुळे भूक चांगली लागते.
- चेहऱ्याचा टवटवीतपणा आणि सौंदर्य वाढवण्यासाठी काकडीचा रस व मध यांचे मिश्रण चेहऱ्यास हलक्या हाताने चोळून लावावे.
- निद्रानाश ही समस्या भेडसावत असेल तर काकडीचे काप डोक्यावर ठेवून झोपावे.
- डोळ्याभोवतालची काळी वर्तुळे घालवण्यासाठी काकडी आणि बटाटे कुस्करून एकत्र करून डोळ्यांभोवती दररोज लावावा. सुकल्यानंतर तो धुऊन टाकावा.
- चेहऱ्यावरील वांग व काळपटपणा दूर करण्यासाठी काकडीचा रस, लिंबुरस व दूध एकत्र करून कापसाच्या बोळ्याने चेहऱ्यावर लावावे व हलक्या हाताने मसाज करावा.
- शरीरावरील भाजलेल्या जखमेची आग होत असेल तर काकडीचा रस लावावा, यामुळे तेथील आग थांबते.
- मधुमेह असणाऱ्या व्यक्तींच्या हातापायांची अनेक वेळा जळजळ होत असते, अशा वेळी काकडीचे काप तळहातावर व तळपायावर चोळावेत.
- काकडी ही शीतल व सारक आहे. त्यामुळे मलावष्टंभाची तक्रार असणाऱ्या रुग्णांनी रोज काकडीचे सेवन करावे. यामुळे आतडय़ातील मळ पुढे ढकलण्यास मदत होते व पोट साफ होते.
- काकडी, गाजर, बीट व कोिथबीर यांचा रस एकत्र करून प्यायल्यास शरीरातील उष्णता कमी होते व उत्साह निर्माण होतो. तसेच शरीरात युरिक अॅसिड साठून होणारे गाऊट, आर्थोरायटिस व सांधेदुखी यांसारखे रोग दूर होतात.
- आम्लपित्त, गॅसेस व आंत्रव्रण (अल्सर) यांसारखे विकार असल्यास काकडीचा कीस किंवा काकडीचा रस दर २-४ तासांनी प्यावा. यामुळे पोटातील उष्णता कमी होऊन थंडावा निर्माण होतो.
- अपचन होऊन उलटय़ा होत असतील तर काकडीचे बी वाटून ताकामधून घ्यावे. यामुळे पित्त, दाह, वारंवार तहान लागणे हे विकार कमी होतात.
- लघवी होताना जळजळ होत असेल तर काकडीरस लिंबुरस, जिरेपूड व खडीसाखर घालून प्यावा. यामुळे लघवीची जळजळ दूर होते.
- काकडीचा कीस चेहरा, मान यावर नियमितपणे लावल्यास चेहऱ्यावरील मुरुमे, पुटकुळ्या, सुरुकुत्या दूर होऊन चेहरा कांतिमान होतो. तसेच हा रस केसांना लावल्यास त्यामध्ये असणाऱ्या सिलिकॉन व गंधकामुळे केस गळायचे थांबतात.
- काकडीमध्ये 95 टक्के पाणी असते. यामुळे हे शरीरातील विषारी आणि अनुपयोगी पदार्थांना बाहेर काढण्यात मदत करते, आणि शरीराला जलमिश्रीत ठेवते.
सावधानता : काकडी ही शीत गुणधर्माची असल्याने वर्षां आणि शरद ऋतूत जास्त प्रमाणात खाऊ नये. खायचीच असेल तर थोडय़ा प्रमाणात व तीही फ्रिजमध्ये न ठेवलेली, सामान्य तापमानाची खावी.
News English Summary: Cucumber is a food that is easily available all over India. Cucumber provides coolness and freshness to the body. You can eat it in many ways. Like salads, sandwiches, or salt and pepper. Cucumber has innumerable health and aesthetic properties. From Ayurvedic point of view, cucumber is cool, biliary, digestive and diuretic. Cucumber seed is cool, diuretic, nutritious. Due to this property of cucumber, when it is eaten, internal secretion and urinary volume in the body increases and alternatively urinary disorders are eliminated.
News English Title: Cucumber is beneficiary to us from removing health problems news update article
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Insurance Tips | कार इन्शुरन्स क्लेम करण्याच्या नादात 'या' गंभीर चुका करू नका, इथे जाणून घ्या योग्य माहिती
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा