1 January 2025 6:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Mutual Fund | नोकरी असो किंवा व्यवसाय महिन्याला पेन्शन हवी असेल तर, 'हा' मार्ग ठरेल फायद्याचा NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉकला BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड सहित डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: RELIANCE Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, 33% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, टार्गेट नोट करा - NSE: BEL Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबद्दल खुशखबर आली, मल्टिबॅगर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: SUZLON
x

Health First | चाइनीज फूड खाता? | अजिनोमोटोच्या सेवनाचे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम - नक्की वाचा

Danger effects of Ajinomoto

मुंबई, १६ जुलै | भारतीय पदार्थांची खरी लज्जत मसाल्यांमध्ये असते. त्या तुलनेत चायनीज पदार्थ मिळमिळीत असतात. त्यांना अधिक चविष्ट करण्यासाठी अजिनोमोटोचा वापर केला जातो. अजिनोमोटो म्हणजेच Monosodium glutamate (MSG). याचा वापर करून विशिष्ट पदार्थांचे आकर्षण वाढवले जाते. मोमोज, नुडल्स यासारख्या चायनीज पदार्थांचे हळूहळू लोकांना व्यसनच लागते. त्यामुळे या अजिनोमोटोचा आहारातील समावेश कटाक्षाने टाळण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला दिला जातो. म्हणूनच या ‘अजिनोमोटो’ बाबत या काही इंटरेस्टिंग गोष्टी नक्की जाणून घ्या.

अजिनोमोटोचा मेंदूवर होणारा परिणाम:
अजिनोमोटो (MSG)चेच केमिकल नाव म्हणजे सोडियम सॉल्ट ऑफ़ ग्लुटॅमिक अ‍ॅसिड. आकलनशक्ती आणि स्मरणशक्तीवर अजिनोमोटो च्या अतिसेवनाचा परिणाम होतो. शरीरात अतिप्रमाणात अजिनोमोटो हे फूड अ‍ॅडक्टीव्ह गेल्यास पॅनिक अटॅक येणं, गरगरणे अशा समस्या वाढतात. लहान मुलांच्या आहारात अजिनोमोटो अधिक प्रमाणात जाणंदेखील त्रासदायक ठरू शकते. यामुळे लहान मुलांच्या वागाण्यात प्रकर्षाने बदल होतात. तरुणांच्या आहारात दर दिवसाआड 2.5 mg/g अजिनोमोटो गेल्यास ते हायपर अ‍ॅक्टीव्ह होतात.

अजिनोमोटोमुळे यकृताचे ( लिव्हर ) नुकसान होते:
अजिनोमोटोच्या अतिसेवनामुळे यकृतामध्ये फॅट साचून राहण्याचे प्रमाण वाढते. ज्यामुळे कालांतराने यकृताचे विकार जडण्याचे प्रमाण वाढते. दाह वाढू शकतो.

अजिनोमोटोचा परिणाम मेटॅबॉलिक रेटवर होतो:
काही अभ्यासानुसार, अजिनोमोटोचा आहारात अति प्रमाणात समावेश झाल्यास मेटॅबॉलिक सिंड्रोम आणि लठ्ठपणाचा त्रास वाढतो. अजिनोमोटोमुळे कार्डियोव्हसक्युलर म्हणजेच हृद्यविकार वाढतात, रक्तदाबाचा त्रास वाढतो तसेच मधूमेह बळावण्याची शक्यता वाढते.

अजिनोमोटोचा भूकेवर होणारा परिणाम:
अजिनोमोटोचा एक विशिष्ट स्वाद असतो. आहारात अजिनोमोटोचा वापर अधिक प्रमाणात केल्यास hypothalamic region चे नुकसान होते. मेंदूतील या भागामध्ये भूकेचे नियंत्रण असते.हे नियंत्रण बिघडल्यास लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते.

अजिनोमोटोचे अतिसेवन डोकेदुखी वाढवते:
अजिनोमोटोयुक्त पदार्थ खाल्ल्याने मसल्स पेन वाढवत नसले तरीही डोकेदुखीचा त्रास नक्की वाढवू शकते. तुमच्या वजनाच्या तुलनेत 150 mg/kg अजिनोमोटो शरीरात गेल्यास डोकेदुखीचा त्रास अधिक वाढवतो.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Danger effects of Ajinomoto in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x