16 April 2025 2:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
x

पुणे | अजून तरी लॉकडाऊनचा निर्णय नाही | नियम पाळा... उपमुख्यमंत्र्यांकडून अल्टिमेटम

Deputy CM Ajit Pawar, Pune citizens, Corona virus, Lockdown

पुणे, २६ मार्च: महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिक या जिल्ह्यांत रुग्ण पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. अशात राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार की नाही असा प्रश्न लोकांना पडला आहे. दरम्यान, पुण्यात झपट्याने रुग्ण संख्या वाढत असल्याने लॉकडाऊन केला जाणार का असा सवाल नागरिकांना पडला असताना पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात सध्या तरी लॉकडाऊन करणार नसल्याचे सांगितले आहे. आज (२६ मार्च) पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुण्यात दररोज होणाऱ्या मृतांचा आकडा देखील वाढू लागला आहे. काही दिवशी हा आकडा मुंबईपेक्षाही जास्त असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे पुण्यात कठोर निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात लोकप्रतिनिधी, प्रशासकीय प्रतिनिधी आणि पोलिस विभागातील प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यामध्ये या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. अजित पवारांनी आता पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांना २ एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. घालून दिलेले नियम लोकांना पाळायला हवेत. ते जर पाळले नाहीत, तर येत्या २ एप्रिलला नाईलाजास्तव कठोर निर्णय घ्यावा लागेल”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

येत्या शुक्रवारी लॉकडाऊन संदर्भात नाईलाजास्तव निर्णय घ्यावा लागेल. पुढच्या आठवड्यापासून पुण्यात लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल, असे संकेत अजित पवारांनी दिले. तसेच हॉटेल 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत. तसेच एपीएमसीच्या परीक्षा ठरलेल्या वेळेत होणार आहे. त्याशिवाय दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळेतच होतील. नागरिकांना धान्य किराणा भरून ठेवण्यासाठी वेळ देण्याची गरज आहे, असे अजित पवारांनी सांगितले.

 

News English Summary: The number of corona patients in Maharashtra is steadily increasing. In Mumbai, Pune and Nashik districts, the number of patients is increasing rapidly. People are wondering whether there will be another lockdown in such a state. Meanwhile, Pune’s Guardian Minister Ajit Pawar has said that there will be no lockdown in Pune as the number of patients is increasing rapidly. He was speaking at a press conference in Pune today (March 26).

News English Title: Deputy CM Ajit Pawar warn Pune citizens over increasing corona virus panic news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#AjitPawar(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या