Diabetes Symptoms | मधुमेह कुठल्याही वयात होऊ शकतो | ही प्राथमिक लक्षणे तुम्हाला आहेत का खात्री करा
Diabetes Symptoms | मधुमेह हा शरीराच्या अंतर्गत स्त्रावामुळे उद्भवणारा आजार आहे, जो कुठल्याही वयात होऊ शकतो. रक्त प्रवाहातील अति रक्त ग्लुकोसच्या पातळीवरून याचे निदान करता येऊ शकते. या आजाराची विभागणी २ गटात केली आहे.
मधुमेहाचे अजून काही प्रकार :
मधुमेहाचे अजून काही प्रकार आहेत त्यापैकी एक म्हणजे प्रीडायबिटीस. डॉक्टर याचे निदान जेवण झाल्यानंतर आणि उपवास केल्यानंतर दोन्ही स्थितीमध्ये रक्त शर्करा तपासून करतात. जर योग्य आहार, जीवनशैली आणि नियमित व्यायाम केल्यास या आजारांवर नियंत्रण केले जाऊ शकते. प्रकार १ मधुमेह इन्सुलिन आश्रित मधुमेह आहे जो अल्पवयीन मुलांमध्ये आणि ३० च्या आतील तरुणांमध्ये दिसतो आणि प्रकार २ अधिक आणि मुख्य करून आढळतो, ही परिस्थिती तेव्हा येते जेव्हा शरीर आवश्यक तेवढे इन्सुलिन तयार करू शकत नाही.
योग्य वेळी करून घेणे फार गरजेचे :
हा प्रकार ३० च्या पुढील वयोगट होताना दिसतो. मधुमेहाची काही लक्षणे दिसून येतात ती अशी कि अचानक भुकेने तळमळणे, गरजेपेक्षा जास्त वेळेला लघवीला जाणे, सतत तहानलेले असणे, दिसण्यात अस्पष्ट, तळहात किंवा पायाला जळजळीच्या संवेदना. मधुमेहाच्या तपासणीसाठी डॉक्टर्स अनेक तपासण्या सांगतात आणि त्या योग्य वेळी करून घेणे फार गरजेचे असते. आहारात बदल करणे, शारीरिक हालचाली करणे आणि योग्य ती जीवनशैली ठेवणे हे आपल्या हातात आहे.
लक्षणे सविस्तर:
1 – जास्तीत जास्त पाणी प्यावसे वाटणे. वारंवार लगवीला लागने. जास्त पाणी पिऊनही वारंवार तहान लागणे. अशा वेळी तहान भागविण्यासाठी काही लोक ज्यूस, सोडा, चॉकलेट, दूध आदी गोष्टींचे सेवन करतात. पण, या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरातील साखर अधिकच वाढते. त्यामुळे होणारा त्रास कमी होण्याऐवजी अधिक वाढतो.
2 – वजन घटने, वजन अधिक मोठ्या प्रमाणात वाढणे मधुमेहाला निमंत्रण देते. तसेच, प्रमाणापेक्षा कमी होणे हे सुध्दा मधुमेहाचेच लक्षण आहे. वजन घटण्याचे डॉक्टर दोन कारणे सांगतात. एक वारंवार वॉशरूमला जाणे आणि दुसरे म्हणजे शरीरातील वाढत्या कॅलरीजवर नियंत्रण ठेवता न येणे.
3 – अचानक अशक्तपना जाणवने. तीव्र भूक लागने ही सुद्धा मधुमेहाचीच लक्षणे आहेत. मधुमेह असलेल्या व्यक्तीला अचानकपणे अशक्तपणा येतो. रूग्णाच्या शरीरात जेव्हा हाई ब्लड शुगर असते तेव्हा शरीराला ग्लुकोजला मॅनेज करताना अडचण निर्माण होते.
4 – काम केल्यावर थकवा जाणवने ही अत्यंत साधी बाब आहे. मात्र, नियमितपणे अशक्तपणा जानवणे हा मधुमेहाचे लक्षण दाखवणारा प्रकार आहे. हे लक्षण दिसतात त्वरीत डॉक्टरांशी संपर्क करा. टाईप-2 मधुमेहात रूग्णाच्या शरीरातील साखर काही काळासाठी मोठ्या प्रमाणात वाढते. या प्रकाराची लक्षणे हळुहळू पूढे येतात.
5 – चिडचिडेपणा आणि मूड खराब होण्याचे प्रकार वारंवार घडणे हेही मधुमेहाचे लक्षण आहे. शरीरातील रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे मधुमेहाचे रूग्ण अधिक चिडचिडे बनतात. सततचे डिप्रेशन, घराबाहेरप पडण्याची ईच्छा न होणे, कामात लक्ष न लागने हेसुद्धा मधुमेहाचे लक्षण मानले जाते.
6 – नजर कमजोर होणे – मधुमेहाच्या सुरूवातीच्या काळात डोळ्यांना अचानक अधारी येणे. निट न दिसणे. अशी लक्षणे दिसतात. पण, मधुमेहात नजर कायमची अधू होत नाही. काही कालावधीनंतर रूग्णाची नजर स्थिर होते. त्याला निट दिसू लागते.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Diabetes symptoms in Marathi news updates check details 26 June 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार