Health First | पित्त झाले आहे तर करा हे घरगुती उपाय
मुंबई 9 मे : अपुरी झोप, तणावग्रस्त जीवनशैली, अरबट-चरबट फास्ट फूड खाणे अशा एक ना अनेक कारणांनी शरीरात पित्ताचे दोष निर्माण होतात. तीव्र डोकेदुखी, छातीत जळजळ, उलट्या होणे, अस्वस्थ वाटणे अशी पित्ताची लक्षणे दिसून येतात. मग पित्तावर उपाय म्हणून बाजारात उपलब्ध असलेली विविध रूपातील अँटासिड्स ही निष्फळ ठरतात. तेव्हा आजीच्या बटव्यातील हे काही घरगुती उपचार नक्कीच आजमावून पहा.
केळी:
केळ्यातून शरीराला पोटॅशियम मिळते. त्यामुळे पोटात अॅसिडची प्रक्रिया मंदावते. तसेच फायबरमुळेही पचनक्रिया सुलभ होते. पित्त झाल्यास पिकलेले केळे खावे. याने पित्ताचा त्रास कमी होतो.
तुळस:
तुळशीमध्ये अँटी अल्सर घटक असतात. ज्यामुळे पोटातील अॅसिडपासून तयार होणारे विषारी घटकांपासून बचाव होतो. पित्ताचा त्रास जाणवत असेल तर ४-५ तुळशीची पाने चावून खा.
दूध:
दुधात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आढळते. पित्ताचा त्रास होत असेल तर थंड दुधाचे सेवन करावे. यामुळे पोटातील जळजळ कमी होण्यास मदत होते.
बडिशेप:
बडिशेपही पित्तावर गुणकारी आहे. यात अँटी अल्सर घटक असतात ज्यामुळे पचनक्रिया सुधारते तसेच बद्धकोष्ठता दूर होते. बडिशेपचे दाणे चघळल्याने पित्ताचा त्रास कमी होतो.
जिरे:
जिऱ्याचे दाणे चघळल्यानेही पित्ताची समस्या दूर होण्यास मदत होते. याशिवाय जिरे पाण्यात उकळून ते पाणी थंड करुन प्यायल्यानेही फायदा होतो.
पित्तशामक आवळा:
तुरट, आंबट चवीचा आवळा कफ आणि पित्तानाशक असून त्यातील विटामिन-‘सी’ अन्ननलिका व पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते. रोज चमचाभर आवळ्याची पावडर/ चूर्ण घेतल्यास पित्ताचा त्रास होत नाही. कच्चा आवळा मिठासोबत खाल्ल्यास शरीरास सर्व षड्रस मिळतात.
औषधी वेलची:
आयुर्वेदानुसार वेलची शरीरात वात, कफ व पित्त यांमध्ये समतोल राखण्याचे काम करते. स्वादाला सुगंधी व औषधी गुणांनी परिपूर्ण वेलचीच्या सेवनाने पचन सुधारते. पित्ताचा त्रास कमी होतो. पित्तापासून आराम मिळण्यासाठी वेलचीचे दोन दाणे ठेचून (सालीसकट/सालीशिवाय) ती पाण्यात टाकून उकळा. हे पाणी थंड झाल्यावर प्यायल्याने तात्काळ आराम मिळेल.
पुदिना:
पुदिना पोटातील आम्लाची तीव्रता कमी करतो. त्यातील वायूहारक गुणधर्मामुळे पचनक्रिया सुधारते. त्यातील थंडाव्यामुळे पोटदुखी व जळजळ थांबते. पित्ताचा त्रास होत असल्यास काही त्याची पाने कापा व पाण्यासोबत उकळा. थंड झाल्यावर हे पाणी प्या. अपचनावरही पदिना गुणकारी आहे.
आल्हाददायक आलं – आलं या औषधी मुळाचा भारतीय स्वयंपाकघरात प्रामुख्याने वापर केला जातो. आल्याच्या सेवनाने पचन सुधारते. तसेच पोटातील अल्सरशी सामना करण्यास आल्याचा फायदा होतो. आल्यातील तिखट व पाचकरसामुळे आम्लपित्त कमी होते. पित्तापासून आराम मिळण्यासाठी आल्याचा एक लहान तुकडा चघळत रहा. तुम्हाला जर आलं तिखट लागत असेल ते पाण्यात टाकून उकळून ते पाणी प्या. किंवा तुम्ही आल्याचा तुकडा ठेचून त्यावर थोडा गुळ टाकून चघळत रहा.
News English Summary: Bile defects in the body are caused by one or more reasons such as insufficient sleep, stressful lifestyle, eating unhealthy fast food. Symptoms of bile include severe headache, heartburn, vomiting, and nausea. Then the various antacids available in the market as a remedy for bile become useless. So try some of these home remedies in Grandma’s bag.
News English Title: Do home remedies for acidity ,nausea news update article
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY