27 December 2024 7:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

Health First | अस्थमा किंवा दम्यावर आहेत काही घरगुती उपाय ते जाणून घ्या

home remedies for asthma

मुंबई २८ एप्रिल : दमा अर्थात अस्थमा. श्वसननलिकेला सूज आल्यामुळे किंवा इजा झाल्यामुळे फुफ्फूसाला होणाऱ्या ऑक्सिजनच्या पुरवठ्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे श्वासोच्छवास करताना त्रास होतो किंवा सतत धाप लागल्यास दमा आहे असं समजावं. दमा हा आजार अनुवांशिकतेनं अथवा वाढत्या प्रदूषणामुळे तिथं राहणाऱ्या नागरिकांमध्ये दम्याच्या आजाराचं लक्षणं असल्याचं दिसून येऊ शकतं.

नोएडामधील मेट्रो रेस्पिरेटरी सेंटरचे वरिष्ठ सल्लागार डॉ. दीपक तलवार यांनी ज्या लोकांना इनहेलर्स घेतल्यानंतरही १ ते २ महिन्यांपर्यंत खोकला येतो ते रुग्ण अस्थमाच्या गंभीर श्रेणीमध्ये येत असल्याचं त्यांनी सांगतिलं. काही रुग्ण अस्थमा नियंत्रणात ठेवण्यासाठी वर्षातून दोनहून अधिक स्टेरॉइड घेतात तेदेखील गंभीर श्रेणीत येतात. तसेच सूज नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक काळ दररोज औषध घेण्याची आवश्यकता असते. ३ ते ६ महिने उपचार करुनही अस्थमा नियंत्रणात ठेवण्यात अयशस्वी ठरतात त्यावेळी तो अस्थमाही गंभीर स्वरुपाचा मानला जातो. परंतु काही सुरुवातीच्या स्थितीत घरगुती उपायांनी दमा बरा करण्यास मदत होते.

योग्य पथ्य व काळजी घेतल्यास दमा पुर्णता नियंत्रणात आणता येऊ शकतो. इन्हेलर पंप थेरपीद्वारे दम्यावर उपचार करता येतात. विशेष बाब म्हणजे आता काही प्रकारच्या बिकट दम्यावर ब्रोन्कीयल थर्मोप्लास्टी या अत्याधुनिक उपचारपद्धतीद्वारे इलाज होऊ शकतो. पूर्वी ही उपचारपद्धती फक्त परदेशातच उपलब्ध होती. आता मात्र आपल्याकडेही ही नवीन उपचारपद्धती काही ठिकाणी कार्यरत झाली असल्यानं अशा प्रकारच्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

अस्थमा असलेल्या रुग्णांनी कशी काळजी घ्यावी?

– घरातील हवा खेळती रहावी. हवा स्वच्छ ठेवणारे प्युरीफायर अथवा एसी वापरावा. तसंच ओलसर भिंतीमुळेही दम्याचा त्रास वाढू शकतो.

– कुठेही बाहेर प्रवास करत असाल किंवा प्रदुषणसदृष्य विभागात गेल्यास नाकाला मास्क लावणं आवश्यक.

– घरातील पडदे नेहमीच झटकून ठेवा. बेडशिट्स, रोजच्या वापरातील कपडे दिवसाआड गरम पाण्यानं धुवा. एकंदर, तुमचं राहतं घर नेहमी स्वच्छ व प्रसन्न असलं पाहिजे.

– गडद सुंगंध असलेले परफ्युम वापरु नका.

– काही पदार्थ खाल्ल्यानं अॅलर्जी येऊ शकते. उदा. चायनीज फूड ज्यामध्ये अजिनोमोटो व व्हीनेगरचा वापर होतो. अशा पदार्थांची यादी बनवून असे पदार्थ खाणं शक्यतो टाळा.

– घरातील पाळीव प्राण्यांच्या केसांमुळे दमा वाढण्याची शक्यता असते.

– नियमित व्यायाम व योग्य आहार घ्या.

-आहारात विशेषकरून लसूण,आले ,ओवा ,मध ,लवंग ,मेथी ,शेवग्याच्या पानांचा उपयोग करावा.

News English Summary: Asthma Inflammation or injury to the trachea reduces the supply of oxygen to the lungs. Therefore, if you have difficulty in breathing or if you have shortness of breath, it should be considered as asthma. Asthma can be a symptom of asthma in people living there due to heredity or increased pollution.

News English Title: Do home remedies for Asthma news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x