22 November 2024 1:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Health first । आरोग्याच्या अनेक समस्येवर उपाय म्हणजे दररोज सूर्य नमस्कार करा । नक्की वाचा

benefits of surya namskar

मुंबई २३ एप्रिल : हिवाळ्याच्या दिवसांत, कडाक्याच्या थंडीत दररोज सकाळी एक तासासाठीही व्यायाम करणे, हे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाही. या दिवसांत शरीर आळशी बनते, आपल्याला झोपेतून उठूच नये असे वाटते. अशा परिस्थितीत व्यायामाचा नियम बनवता येत नाही. अशावेळी बाहेर जाऊन व्यायाम किंवा जिममध्ये घाम गाळण्यापेक्षा घरच्या घरीच सूर्यनमस्कार केल्यास शरीरासाठी फायदेशीर ठरते. घरीच सूर्यनमस्कार केल्याने, जास्त वेळ खर्ची करावा लागत नाही आणि आपले शरीरही सर्व आजारांपासून सुरक्षित राहते.

सूर्यनमस्कार करण्याचे शारिरीक आणि मानसिक फायदे:

निरोगी शरीर आणि एक आनंददायक भावना
सूर्यनमस्कार केल्यानं केवळ शरीरचं निरोगी होत नाही तर यामुळे मेंदूही खूप थंड राहतो आणि एक सुखद पूर्तता होते. सूर्यनमस्कार करताना दिर्घ श्वास घ्यायचा आणि सोडायचा आहे. यामुळे शरीरात शुद्ध ऑक्सिजन वाढतं. ज्यामुळे ब्लड सर्कुलेशन सुद्धा वेगानं होतं. हेच कारण आहे की मेंदू देखील अॅक्टिव्ह राहतं.

चांगले पचन प्रदान करते
सूर्यनमस्कार केल्यानं शरीरासोबतच पोटाजवळही बराच तणाव वाढतो. हा तणाव पोटाची पचनक्रिया चांगलं करण्यासाठी असतो. पचन तंत्र सुधारल्यावर शरीरातल्या अर्ध्या समस्या दूर होतात. बद्धकोष्ठता, अपचन किंवा पोटात जळजळ होणे किंवा ढेकर येणं या आणि अशा इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. मात्र सूर्यनमस्कार केल्यानं या सर्व समस्या कायमच्या दूर होतात. सकाळी रिकामी पोटी सूर्यनमस्कार कमीत कमी दहा वेळा जरूर करा.

पोटाची चरबी वितळेल आणि वजन कमी होईल
सूर्यनमस्कार केल्यानं पोटावर सर्वात जास्त इफेक्ट पडतो आणि हे कारण आहे की, पोटाची चरबी वेगानं कमी होण्यास सुरूवात होते. पोटाचे स्नायू देखील मजबूत होतात. पूर्ण शरीरातील वजन सहज कमी होण्यास सुरूवात होते.

शरीर डिटॉक्स करण्यास होते मदत
सूर्यनमस्कार करताना दिर्घ श्वास घ्यावा आणि सोडावा. यामुळे शरीरात शुद्ध ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं आणि कार्बन डायऑक्साइड आणि अन्य विषारी तत्त्व सुद्धा बाहेर येतात. सूर्यनमस्कार श्वासोच्छ्वास देखील सुधारित करते आणि फुफ्फुसांना बळकट करते.

स्मरणशक्ती चांगली होते आणि थायरॉईड ठीक होतं
सूर्यनमस्काराने स्मरणशक्ती देखील सुधारते. सूर्यनमस्काराचा परिणाम नर्व्हस सिस्टमवर पडतो आणि हे केल्यानं मेंदूमधून चांगल्या हार्मोन्सचे स्राव वाढतो. यामुळे केवळ तणावचं दूर होतं नाही तर यामुळे स्मरणशक्ती देखील वाढते. इतकेच नाही तर खासकरून थॉयरायड ग्लँडची क्रिया सुद्धा सुधारते.

शरीर लवचिक होतं
सूर्यनमस्कार फुल बॉडी एक्सरसाइज आहे. ही सर्वात चांगली कार्डिओ एक्सरसाइज मानली जाते. याच कारणामुळे सूर्यनमस्कार केल्यानं पूर्ण शरीर फ्लेक्सेबल होतं.

मासिक पाळीशी संबधित समस्या दूर होतात
सूर्यनमस्कार महिलांसाठी खूप फायदेशीर आहे. मासिक पाळीशी संबंधित अनेक समस्या हे आसन दूर करतं. एवढंच नाही तर मेनोपॉजच्या वेळी होणारा त्रास आणि मानसिक समस्या देखील दूर करतात. मासिक पाळी नियमित करणं, अतिरक्तस्राव किंवा कमी रक्तस्राव योग्य करण्यासोबतच डिलीवरीच्या वेळी होणारे त्रास किंवा वेदना कमी करते.

लक्षात ठेवा..
सूर्यनमस्कार सकाळच्या वेळेत रिकाम्या पोटी करावा. सुरुवातीला 10 ते 12 वेळा सूर्यनमस्कार घालावेत, त्यानंतर हळूहळू ही संख्या वाढवू शकता. हे आसन मऊ गादी किंवा पलंगावर करु नका. यामुळे आपल्या पाठीच्या कण्याला हानी पोहचू शकते. गर्भवती महिला, स्लिप डिस्कचे रुग्ण आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी सूर्यनमस्कार करू नये.

News English Summary: On winter days, exercising for even an hour every morning in the bitter cold is no less of a challenge. These days the body becomes lazy, you feel like you shouldn’t wake up from sleep. Exercise rules cannot be made in such a situation. It is better for the body to sunbathe at home than to go out and sweat in the gym. Sunbathing at home does not require much time and keeps your body safe from all ailments.

News English Title: Do surya namskar on daily basis news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x