Health First | आपले आरोग्य निरोगी आणि फिट ठेवण्यासाठी रोज योगा करा
मुंबई २७ एप्रिल : तुम्हाला जर तुमची जीवनशैली उत्कृष्ट हवी असेल तर आपल्या आयुष्यात योगाचा समावेश करून घ्या. योगा केल्यामुळे आपलं शरीर नेहमी निरोगी आणि चांगलं राहातं. मात्र योगा करत असताना याच्या नियमांचं पालन करणंही आवश्यक आहे. योगा आपलं शरीर तंदुरूस्त राखण्यास मदत करतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात नक्की योगाचं काय महत्त्व आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
तणावापसून मुक्ती-
नियमित योगा केल्याने मानसिक ताण तणाव कमी होण्यास मदत होते. सकाळी उठून तुम्ही जर प्राणायाम आणि मेडिटेशन करत असाल तर, पूर्ण दिवस तुम्हाला नक्कीच आनंद आणि उत्साही वाटेल.
वृद्धापकाळात आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी-
आपण तरूण असतो. तरूण असताना प्रकृतीही साथ देत असते. त्यामुळे शरीर कोणत्याही किरकोळ तक्रारी, आजाराशी झुंजायला तयार असते. पण, जसजसे वय वढू लागते तसतसे शरीरावर मर्यादा येतात. पण, तुम्ही जर सुरूवातीपासूनच योगा करत असाल तर, तुमची ही साधना वृद्धापकाळात कामी येऊ शकते. वृद्धापकाळात आरोग्याच्या तक्रारी कमी होण्यसाठी नियमित योगा करा.
शरीरातील साखर नियंत्रण-
आजकाल कमी वयातही मधुमेहाची लागण झालेले अनेक लोक आपल्याला पहायला मिळतील. शरीरातील इन्सूलीनची निर्मिती होण्याचे प्रमाण घटले की शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. अशा वेळी हे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी योगा महत्त्वाची भूमिका पार पाढतो.
वजन नियंत्रणासाठी महत्त्वाचे-
वाढता स्थूलपणा हा तुमच्या कार्यक्षमतेवर मर्यादा घालतोच. पण, अनेक आजारांनाही निमंण देतो. म्हणून नियमित योगा करत चला. नियमित योगा करण्याने शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते. परिणामी वाढत्या शारीरिक वजनाला मर्यादा पडतात.
रक्ताभीसरण-
योगामुळे शरीराच्या सर्व अवयवांना चांगला व्यायाम मिळतो. त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण वेगाणे होण्यास मदत होते. योगामुळे श्वासोच्छवास योग्य पद्धतीने घेतला जातो. त्यामुळे शरीरिरातील रक्ताभिसरण गतिमान होते.
दरम्यान, नियमित योगा करण्याचे फायदे असे आकडेवारीने मुद्देसुद सांगता येत नाही. त्याला मर्यादा पडतात. पण, तुम्ही नियमित योगा करून योगाचे असंख्य फायदे स्वत: अनुभवऊ शकता.
News English Summary: If you want to make your lifestyle better, include yoga in your life. Doing yoga always keeps our body healthy and well. But while doing yoga, it is also necessary to follow its rules. Yoga helps keep our body fit. So we are going to tell you exactly what is the importance of yoga in your life.
News English Title: Do Yoga regularly then you will notice its good effects news update article
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON