27 December 2024 8:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

Health First | तुम्ही सुद्धा रात्री जेवण उशिरा घेता? तर हे नक्की वाचा

late night dinner

मुंबई, ०२ जुलै | प्रत्येक कुटुंबातील रात्रीचे जेवण हे खरे म्हणजे एक कौटुंबिक स्नेहभोजन व्हायला हवे. कारण दिवसभर कामाच्या निमित्याने बाहेर असणारी माणसे साधारणपणे ह्या एकाच वेळी घरात एकत्र येत असतात. तेव्हा सर्वांनी एकत्र यावे एकत्र बसून जेवावे, परस्परांमध्ये त्या निमित्याने सुख संवाद साधला जावा, या गोष्टी रात्रीच्या एकत्र भोजन घ्यावे अथवा व्हावे ह्या कल्पने मागचा हेतू असतो. रात्रीचे एकत्र जेवण ही एक कौटुंबिक स्नेहवर्धनाची संधी असते असे म्हणणे वावगे ठरणार नाही. सर्वांनी एकत्र बसून जेवण्यात जो आनंद आहे, तो खानावळी सारखे एकेकटयांनी जेवण्यात मजा नाही.

रात्रीचे हे जेवण सर्वांनी जसे एकत्र घ्यायला हवे हे कुटुंब स्वास्थ्याच्या दृष्टीने आवश्‍यक आणि महत्वाचे आहे. तसेच रात्रीचे प्रत्येकाचे जेवणाचे प्रमाण हे त्याच्या वयोमान, प्रकृती नुसार कमी जास्त असणे ह्यात काहीच वावगे नाही. रात्रीच्या जेवणाचा विचार करता अनेक घरातून जेवण्याच्या संकल्पनेतील पौष्टीक आणि समतोल आहार हा संकल्पना निदान ह्या वेळच्या जेवणात तरी प्रयत्नपूर्वक पूर्ण करण्याचा गृहिणी वर्गाचा कटाक्ष असतो.

त्यामुळेच रात्रीच्या जेवणात वरण भात भाजी पोळी, आमटी, चटणी, कोशिंबीर, लोणचे, पापड, दही, ताक ह्यांचा प्रामुख्याने समावेश करण्यात येतो. तसेच आवडी नुसार पानावर काही तरी थोडेसे का होईना पण गोड पदार्थ वाढण्याकडे गृहिणीचा कल असतो. त्यामागचा हेतू हाच की मानवी शरीराच्या पोषणासाठी आवश्‍यक असणारी प्रथिने, जीवनसत्वे, विविध प्रकारचे रस हे या जेवणाच्या माध्यमातून प्रत्येकाला उपलब्ध व्हावेत.

बऱ्याच घरातून वयस्कर,जेष्ठ व्यक्ती, आजारी व्यक्ती ह्यांचा रात्रीचा आहार हा हलका, सहज पचणारा, तसेच तो प्रमाणशीर घेण्याकडेच कल असतो. त्याला कारण असते ती त्यांची कमी झालेली भूक, मंदावलेली पचन शक्ती, अपचनाची भीती, ऍसिडीटीचा संभाव्य त्रास, निद्रा नाशाची भीती आणि त्यामुळे बिघडणारे शारीरिक आरोग्य. त्यामुळे अशा व्यक्तीना त्यांच्या मना प्रमाणेच हवा तेव्हढाच रात्रीचा आहार घेऊ द्यावा. आपला आग्रह किंवा प्रेमाचा दुसऱ्यास त्रास होणार नाही ह्याची आपणच काळजी घ्यावी. रात्रीच्या जेवणात जर जास्त मसालेदार तेलकट तुपकट भाज्या वा खाद्य पदार्थ असतील तर ते निश्‍चितच आरोग्यास पूरक न ठरता अपाय कारक ठरू शकतात. त्यामुळे अशा प्रकारचे पदार्थ वारंवार जेवणात असणार नाहीत ह्याची काळजी घ्यायला लागते.

* जर आपण देखील लेट नाइट डिनरचा घेत असाल तर एकदा त्याचे होणारे नुकसान जाणून घ्या;

1. वजन वाढणे – जर आपण रात्री उशिरा जेवत असाल तर ते पचविणे देखील कठीण असते. त्यामुळे कोलेस्टेरॉल आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. त्याशिवाय रात्री उशिरा जेवण करणे वाढत्या लठ्ठपणाचे एक कारण देखील आहे.
2. तणाव – जर तुम्ही उशीरा खात असाल तर ते झोपण्यात देखील त्रास होतो. ज्यामुळे दिवसभर थकवा आणि तणाव राहतो. ज्याने कोलेस्टेरॉल आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. तणावमुक्त जीवन जगण्यासाठी लवकर जेवण सुरू करा.
3. उच्च रक्तदाब – रात्री उशीराने जेवण केल्यानंतर कुठल्याही प्रकारचा व्यायाम शरीराला होत नाही त्यामुळे अन्न पचण्यास त्रास होतो व उच्च बीपीची समस्या येते.
4. मधुमेह – अन्न खाल्यानंतर बर्याचदा लोक गोड खातात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते. जे नंतर त्रासदायक होऊ शकतो. रात्री लवकर जेवण करा आणि फिरा
देखील.
5. अपचन – ज्या लोकांना अपचनचा त्रास असतो, त्यांना उशीरा कधीच खायला नको. यानी त्रास अजून वाढू शकतो.
6. चिडचिडपणा – आपण आराम करण्यासाठी पुरेशी झोप नाहे घेत असाल, तर हे आपल्या मानसिक आरोग्यास देखील प्रभावित करते. मेंदूला पुरेसा विश्रांती मिळत नाही, परिणामी
चिडचिडपणा येतो.
7. झोप न येणे – बर्याचदा रात्री उशिरा जेवण्याने अन्न फूड पाईपमध्ये येऊ लागतो. यामुळे अस्वस्थता आणि घबराटपणा येतो आणि झोप येत नाही.

कितीही आवडीचे आणि आग्रहाचे असले तरी रात्रीचे जेवण घेताना खालील गोष्टी लक्षात ठेवणे:

* आरोग्यदृष्ट्या फार महत्वाचे असते.
* रात्रीच्या जेवणात पोळी ऐवजी भाकरीचा पर्याय निवडावा
* सततच्या वरण भाताचे जागी मुगाची खिचडी, मसाले भात हे पर्याय निवडावेत.
* फळ भाजा आणि पालेभाज्यांची अदलाबदल करीत राहावे.
* ज्या व्यक्तींना दही, दूध, ताक, खाण्याची सवय आहे त्यांनी रात्रीच्या जेवणात शेवटचा भात हा आमटी भात न खाता तो ताक भात दही भात कढी भात खावा. दूध भात हा तर अधिक उत्तम.
* रात्रीचा आहार हा दोन घासांची भूक राखूनच घ्यावा.
* रात्रीच्या जेवणानंतर पचनास मदत करणारी सुपारी, बडीशेप, सुपारी, विना सुपारी पान, आवळा सुपारी ह्या सारख्या पाचक वस्तूंचा वापर करावा
* जेवणा नंतर लगेच न झोपता थोडी शतपावली करावी वा चक्क फिरून यावे.
* जेष्ठ व्यक्तींनी आपापल्या क्षमतेनुसार तसेच आवड आणि गरज ह्या नुसार हा आहार घ्यावा. ज्या पदार्थांची सेवनाने आपल्याला त्रास होईल असे पदार्थ खाणे टाळावे.
* तसेच आहार हा फारच कमीही घेतला जाणार नाही ह्याची काळजी घ्यावी, कारण प्रमाणापेक्षा जास्त किंवा कमी घेतलेला आहार आपल्या झोपेवर परिणाम करतो हे विसरू नये.
* रात्रीचे जेवण घेताना पचनास जड असणारे पदार्थ न खाणेच हिताचे असते. रात्री जास्त तेलकट पदार्थ खाऊ नयेत.
* रात्रीच्या जेवणाची वेऴ सुद्धा निश्‍चित करून ती फार मागे पुढे होणार नाही ह्याची काळजी घ्यावी.
* तसेच आरोग्याचा विचार करता कोणीही अनावश्‍यक असे जागरण करू नये.
* आपणच आपल्या खाण्या पिण्याची योग्य ती काळजी घेतली, खबरदारी पाळली तर आपलेच आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल हे विसरून चालणार नाही.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Do you eat dinner late night then need to this health facts news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x