23 February 2025 8:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

Health First | दुपारी झोपणे शरीरासाठी फायदेशीर की अपायकारक | काय आहे सत्य

Health and Fitness, Health Science, Sleeping in Afternoon, Health Articles

मुंबई : तसे तर दुपारी झोपण्याची सवय ही शरीरास नुकसानकारक आहे व चुकीची आहे. परंतु, खूप कमी लोकांना हे माहीत आहे, की दुपारची थोडी डुलकी काढण्याचे काही फायदेसुद्धा आहेत. बर्‍याच संशोधनातून हे सिद्ध झाले आहे. पण, दुपारची झोप काढल्यानंतर तुम्हाला रात्री झोपेची समस्या निर्माण होऊ शकते. म्हणूनच, तुम्हाला हे जाणून घेणे खूपच जरूरी आहे, की तुम्हाला दुपारी किती वेळ झोप घेतली पाहिजे.

यूनिवर्सिटी ऑफ पेन्सिल्वेंनीयाच्या जूनियर- प्रोफेसरानी दुपारची झोप किंवा एक डुलकी ही तब्येतीसाठी फायदेशीर आहे असे म्हटले आहे. ते म्हणतात, दुपारी झोपल्यामुळे आपले कामात चांगले लक्ष लागते. आपला मूड ताजातवाना राहतो. संशोधकांचे असे म्हणणे आहे, की यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ति मजबूत होते. याशिवाय, हृदयाच्या संबंधित जे काही आजार आहेत, ते होण्याची भीती कमी होते. पण किती वेळ झोपायचे, हे मात्र लक्षात घेतले पाहिजे. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हे देखील वाचा – आरोग्यमंत्र | रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय | अत्यंत महत्वाचं

सकाळच्या वेळात १५ ते २० मिनिटांची झोप घ्यायला हरकत नाही. पण त्यानंतर सुद्धहा तुम्हाला झोप आली, तर मग हेच उत्तम होईल, की तुम्ही पूर्ण ९० मिनिटे म्हणजेच तास दिडतास झोप काढा. कारण, झोप पूर्ण न झाल्यामुळे तुम्हाला थकवा व डोकेदुखी याचा त्रास होऊ शकतो. परंतु, ९० मिनिटाची झोप घेतल्यावर तुम्हाला थकवा जाणवणार नाही आणि तुम्ही तुमचे काम उत्तम रीतीने करू शकाल.

मेंदू कार्यक्षम: तुम्हाला सांगू इछितो, की एका अभ्यासात ही गोष्ट समोर आली आहे, की दुपारी झोपल्यामुळे तुमच्या मेंदूची कार्यशक्ती वाढते. जे लोक सकाळी झोपतात,त्यांची स्मरणशक्ती दुसर्‍या लोकांच्या तुलनेत चांगली असते. मुख्यत: मुलांना सकाळी अर्धातास तरी झोपू द्यावे. जी मुले सतत अभ्यास करून थकून जातात, त्यांनी सकाळी मध्येच एक डुलकी काढावी, त्यामुळे त्यांच्या मेंदूला आराम मिळेल.

ज्या लोकांना हृदयासंबंधित समस्या आहेत, किंवा काही आजार आहेत, त्यांनी जर सकाळी झोप काढली, तर त्यांना हार्ट अटॅक येण्याची भीती कमी प्रमाणात असते. जर तुम्ही आठवड्यात तीन दिवस कमी तकमी अर्धा तास झोप घेतली, तर त्यांचा तुम्हाला खूपच फायदा होईल. जर तुम्हाला खूप जास्त राग येत असेल, तर सकाळी झोपल्यामुळे तुम्ही आरामाचा अनुभव घेऊ शकता.

हे देखील वाचा – २ रुपयाची तुरटी तुमच्या पांढऱ्या केसांना करेल काळे | घरगुती रामबाण उपाय

तुमच्या माहितीसाठी सांगतो, सकाळी झोपेचा परिणाम तुमच्या पचनशक्तीवर पण होतो, तुमची पचनशक्ती मजबूत होते. म्हणूनच, दुपारच्या वेळी, थोड्या वेळासाठी तुम्हाला तुमचे डोके तुमच्या डाव्या हातावर ठेवून झोपले पाहिजे. या अवस्थेत जर दुपारी जेवण झाल्यावर झोपले, तर त्याचा आपल्या शरीराला फायदा होतो. याशिवाय, चिडचिड्या स्वभावाची व्यक्ति जर दुपारी दीड तास झोपली, तर तिच्या स्वभावात सकारात्मक बदल बघायला मिळतात. चला तर मग याचा फायदा आपण पण करून घेऊया.

 

News English Summary: A junior professor at the University of Pennsylvania says a nap or a nap is good for your health. Sleeping in the afternoon, he says, gives you a better focus on your work. Your mood stays fresh. Researchers say that this strengthens your immune system. In addition, there are fewer heart-related ailments. But it is important to note how long you sleep. That is what we are going to tell you today.

News English Title: Does sleeping at afternoon is good for health or not News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x