26 December 2024 5:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK EPFO Pension Alert | खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वर्षात पेन्शन वाढणार, जाणून घ्या फायद्याची अपडेट IRFC Share Price | रेल्वे स्टॉक IRFC सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना असावी तर अशी, महिना SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 5 लाख रुपये परतावा Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनी बाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांकडून रेटिंग सह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: SUZLON
x

Health First | पावसात ओल्या कपड्यांना कुबट वास येतोय? | उपाय नक्की वाचा

Rain clothes smell

मुंबई, ११ जून | पावसाळ्यात आर्द्रतेचं प्रमाण जास्त असल्यानं वस्तूंना ओलाव्यापासून जपावं लागतं. इतर वस्तूंप्रमाणे कपड्यांची काळजी घेणं देखील गरजेचं आहे. सध्या घराबाहेर पडण्याचं प्रमाण कमी असल्यानं कित्येक कपडे कपाटात धूळ खात पडले आहेत. या ऋतूत कपड्यांना कुबट वास येणे, हलका ओलसरपणा किंवा बुरशी येणं असे प्रकार घडतात. पावसाळ्यात कपाट आणि कपडे अपटूडेट राहण्यासाठी काय करता येईल, याविषयी…

पावसाळ्यात सर्वाधिक त्रास म्हणजे कपडे पावसाने ओले झाल्यानंतर सुकवण्याचा. कारण पावसाळ्यात वातावरण दमट असल्यामुळे आणि सूर्यनारायणाचे दर्शन दुर्लभ होत असल्यामुळे दोन-तीन दिवस कपडे सुकतच नाहीत.

ओले कपडे लवकर न वाळल्यामुळे काहीवेळाने त्यांना कुबट वास येतो. पावसात कपडे ओले झाल्यानंतर अनेक जण ओले कपडे वॉशींग मशीनमध्ये टाकतात. मशीन जर एकदोन दिवसाआड सुरू केली तर मशीनमधील कपडे ओलेच राहतात. त्यामुळे कपड्यांना कुबट वास येतो. त्यामुळे ओले कपडे अगोदर पंख्याखाली वाळवा. त्यानंतरच धुवायला टाका.

पावसाळ्यात डिटर्जंट पावडरमध्ये थोडासा बेकिंग सोडा घाला. यामुळे कपड्यांचा वास तर जाईलच पण त्याशिवय कपडे अधिक स्वच्छ आणि निर्जंतुक होईल. पावसाच्या दिवसांत सूर्यप्रकाश कितीवेळ असेल याचा काहीच भरवसा नाही.

त्यामुळे ऊन येण्याची वाट पाहत बसू नका. पावसात भिजलेले कपडे सुकवण्यासाठी पंख्याखाली वाळत घाला. पाऊस उघडल्यानंतर घराची दारं-खिडक्‍या उघडा जेणेकरून घरात हवा खेळती राहून कपडे लवकर सुकतील.

लहान मुलांची कपडे वेगळी ठेवा. कारण मोठ्या माणसांची कपडे जाडेभरडे आणि मोठे असल्याने सुकण्यास अधिक वेळ लागतो. मात्र लहान मुलांचे कपडे छोटे असल्याने ते तुलनेने लवकर सुकतात. त्यामुळे लहान मुलांची कपडे वेगळे धुवा आणि सुकायला टाका.

 

News Summary: The biggest problem during the rainy season is drying clothes after they get wet. Because the weather is humid in the rainy season and Suryanarayana’s darshan is rare, clothes do not dry for two-three days. Wet clothes sometimes smell bad because they don’t dry quickly.

News Title: Does wet clothes smell bad in the rain season health news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x