Health first | चहाचा अतिरेक करू नका नाहीतर आरोग्यावर होतील त्याचे वाईट परिणाम । नक्की वाचा
मुंबई २१ एप्रिल : चहात अधिक प्रमाणात कॅफीन आणि टॅनिनसारखे पदार्थ आढळतात जे आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतात. त्यामुळे एका दिवसात मर्यादित प्रमाणातच चहाचे सेवन करा.वेलची, आले घातलेला कडक चहा सर्वांनाच आवडतो. दिवसाची सुरुवात चहाचे घोट घेतच होते. मात्र हाच चहा आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. मर्यादित प्रमाणात चहा प्यायल्याने थकव , डोकेदुखी कमी होऊन ताजेपणा मिळतो, पण जास्त चहा आपल्याला अनेक गंभीर समस्या देऊ शकतो.
लठ्ठपणाची समस्या
लठ्ठपणा या समस्येमुळे बरेच लोक त्रासलेले आहेत. परंतु, तरीही ते आपल्या खाण्यांच्या सवयींमध्ये अजिबात तडजोड करू इच्छित नाहीत. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने, त्यात विरघळलेली साखरदेखील शरीरात जाते. ज्यामुळे वजन वाढते आणि लठ्ठपणाची समस्या निर्माण होते
सांधे दुखी
बर्याच लोकांना सांधेदुखीची समस्या असते. यामागील एक मोठे कारण म्हणजे चहा! चहा पिण्यामुळे आपल्या हाडांमध्ये वेदना होतात आणि दातही पिवळसर पडू लागतात.
ताणतणावाचे मोठे कारण
काम करणारे लोक ताजेतवाने राहण्यासाठी चहाचे जास्त सेवन करतात. त्यामुळे अशा व्यक्तींच्या शरीरात कॅफिनचे प्रमाण लक्षणीय वाढते आणि त्यांचे मन खूप उत्साही होते. मात्र, यामुळे झोप देखील व्यवस्थित येत नाही. रिक्त पोट किंवा जास्त चहा पिण्यामुळे ताण आणि नैराश्यासारख्या समस्या उद्भवतात.
अल्सरची समस्या
कित्येक लोकांना गरमागरम, कडक चहा पिणे आवडते. परंतु, सकाळच्या वेळी गरम चहा पिण्यामुळे पोटाच्या आतील पृष्ठभागावर इजा होते, ज्यामुळे पोटात हळूहळू अल्सरची समस्या उद्भवते.
पाचन शक्ती मंदावते
बरेच लोक नेहमी सकाळी सकाळी रिकाम्या पोटी चहाचा कप रिचवतात. त्याबरोबर काहीही खात नाहीत, ज्यामुळे पोटात गॅसचा त्रास होतो आणि पचनशक्ती कमी होते. रिकाम्या पोटी चहा प्यायल्यामुळे, पित्त प्रक्रियेत अडथळा येतो. ज्यामुळे आपल्याला मळमळल्यासारखे आणि चिंताग्रस्त वाटू शकते.
थकवा आणि चिडचिड
चहा पिण्यामुळे चपळता येते, असे म्हटले जाते. परंतु, सकाळी दूधयुक्त चहा प्यायल्याने दिवसभर थकवा येतो आणि कामात चिडचिड होऊ लागते.
हृदय रोग
रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने हृदयाची गती वाढते. ज्यामुळे हृदयविकाराची समस्य निर्माण होण्याची शक्यता असते.
News English Summary: Tea contains high levels of caffeine and tannin which can be harmful to your health. Therefore, consume a limited amount of tea in a day. Everyone likes strong tea with cardamom and ginger. The day started with a sip of tea. However, this tea can be dangerous for your health. Drinking a limited amount of tea reduces fatigue, headaches and gives freshness, but too much tea can give you many serious problems.
News English Title: Drinking over limit tea is dangerous to our health news update article
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो