27 December 2024 9:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

Health First | गूळ आणि चणे खा आणि ताकद मिळवा - नक्की वाचा

Eat jaggery with chickpeas

मुंबई, २९ जून | वेळी भूक लागल्यावर किंवा सकाळी नाश्ता करायला वेळ नसतो तेव्हा वेफर्स, जंकफूड, वडापाव, फ्रॅन्की असे काही जंकफूडचे पदार्थ खाण्याकडे अनेकांचा कल असतो. अवेळी लागणार्‍या भूकेची वेळीच काळजी न घेतल्याने आणि काही अरबट चरबट पदार्थांची निवड केली जाते. यामुळे लठ्ठपणा, मधूमेहाचा त्रास वाढतो. गूळ आणि चणे हे कॉम्बिनेशन अवेळी लागणार्‍या भूकेला आटोक्यात ठेवण्यासाठी मदत करते. मग जाणून या कॉम्बिनेशनचे काही फायदे

भाजक्या चण्यासह गोड फुटाणे खातात परंतु चण्यासह गूळ खाणं जास्त फायदेशीर आहे.भाजक्या चण्यामध्ये कार्बोहायड्रेट,प्रोटीन,कॅल्शियम,व्हिटॅमिन आणि मुबलक प्रमाणात आयरन आढळते.या मध्ये फायबरचे प्रमाण देखील चांगले आहे.शरीर आणि स्नायू बळकट करण्यासाठी भाजके चणे आणि गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो.गुळात व्हिटॅमिन ए आणि बी असतं.त्यात सुक्रोज, पोटॅशियम, झिंक आणि आयरन मुबलक प्रमाणात आढळते.फारच कमी लोकांना याच्या फायद्या बद्दल माहित नाही.तर चला मग आज याच्या फायद्यां विषयी जाणून घेऊ या.

मसल्स मजबूत करतात:
चणे आणि गूळ एकत्र खाल्ल्याने मसल्स मजबूत होण्यास मदत होते. चणे आणि गूळातील प्रोटीन घटक नैसर्गिकरित्या आणि आरोग्यदायी मार्गाने तुमचे मसल्स बनवण्यासाठी मदत करतात.

त्वचेला कांती:
त्वचेला चकाकी आणण्यासाठी आहारात झिंक घटक असलेले पदार्थ अवश्य निवडा. गूळ आणि चण्यामध्ये झिंक घटक असल्याने त्वचेला तजेला देण्यास मदत करतात.

लठ्ठपणा कमी होतो:
गूळ आणि चणे एकत्र खाल्ल्याने शरीरात मेटॅबॉलिजमचा रेट सुधारतो. यामुळे वजन आटोक्यात ठेवण्यास मदत होते. व्यायमशाळेत जाऊन वजन घटवण्यासाठी मेहनत करण्यासोबत आहरात चणे-गूळ हे मिश्रण एकत्र खावे.

बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो:
चणे आणि गूळ यामधील फायबर घटक पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत करतात. अ‍ॅसिडीटीचा त्रास कमी होतो.

मेंदुला चालना:
गूळ आणि चणं हे मिश्रण मेंदूला चालना देण्यासाठी मदत करते. यामधील व्हिटॅमिन बी 6 घटक स्मरणशक्ती सुधारायला मदत करते

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Eat jaggery with chickpeas to gain physical strength health news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x