26 December 2024 5:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK EPFO Pension Alert | खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वर्षात पेन्शन वाढणार, जाणून घ्या फायद्याची अपडेट IRFC Share Price | रेल्वे स्टॉक IRFC सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना असावी तर अशी, महिना SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 5 लाख रुपये परतावा Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनी बाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांकडून रेटिंग सह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: SUZLON
x

Health first | आंबट गोड चवीचं अननस उन्हाळ्यात खाल्ल्यास आरोग्यास अनेक फायदे होतात ते कसे हे जाणून घ्या

 benefits of pineapple

मुंबई २१ एप्रिल : सध्याच्या कडाक्याच्या उन्हाळ्यात आहारात संतुलित पदार्थांचा समावेश करणं अत्यंत गरजेचं असतं. उन्हाळ्यात अननस खाल्यास शरीरास त्याच्या योग्य को फायदा होतो. अननसमुळे शरीरातील अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. उन्हाळ्यात अननस खाण्यामुळे शरीराला उर्जा मिळते. पण आरोग्याविषयी काही समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे.जाणुन घेऊ अननसच्या 7 मोठ्या फायद्यांविषयी.

इम्यूनिटी वाढवते
अननसमध्ये ब्रोमेलेन नावाचे एक तत्त्व असते. ज्यामध्ये अँटी-इनफ्लेमेटरी आणि फायब्रीनोलिटिक तत्त्व असते. हे तत्त्व इम्यून सिस्टम मजबूत करण्याचे काम करते याव्यतिरिक्त अननसमध्ये व्हिटॅमिन सी उच्च प्रमाणात असते. जे इम्यून सिस्टमला वाढवून इंफेक्शन पासुन लढण्याची क्षमता प्रदान करते.

हाडांची मजबूती
अननस आपल्या हाडांसाठी खुप चांगले असते. कारण यामध्ये मॅगनीज असते. मॅगनीज एक असे पोषकतत्व आहे जे हाडांच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका निभावते. याव्यतिरिक्त ब्रोमेलेनचे अँटी इन्फ्लेमटरी तत्त्व अर्थराइटिस सारख्या गंभीर समस्या दूर करण्याचे काम करते.

डायबीटीजसाठी चांगले
गोड फळ असले तरी अननसमध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स आणि कॅलरी खुप कमी असतात. म्हणजेच डायबीटीजचे रुग्ण कसलीच काळजी न करता हे फळ खाऊ शकता.

हृद्य रोगपासुन वाचवते
अननसमध्ये असे अँटीऑक्सीडेंट्स असतात जे फ्री रॅडिकल्सला स्वच्छ करुन बॅड कोलेस्ट्रॉलचे ऑक्सीडेशन होण्यापासुन वाचवतात आणि हृदय रोगांची शक्यत कमी करतात. अननसमध्ये असलेले ब्रोमेलेन धमन्यामधील रक्त जमा होणे आणि सूज येण्यापासुन थांबवते. यामुळे हृदयाच्या आजारांची भिती कमी होते.

पचनक्रिया चांगली राहते
अननस फायबरचा चांगला स्त्रोत आहे. फायबर पचन क्रियेला चांगले ठेवते आणि आतड्यांना निरोगी ठेवते. यामध्ये उपलब्ध ब्रोमेलेन पोटाच्या एसिडला नियंत्रणात ठेवते. ज्यामुळे एसिडिटी देखील होत नाही.

ग्लोइंग स्किन (चमकदार त्वचा)
अननसाचे अँटीऑक्सीडेंटस एजिंगचे लक्षण म्हणजेच सुरकूत्यांपासुन दूर ठेवते. याव्यतिरिक्त व्हिटॅमिन सी त्वचेचा ग्लो वाढवते आणि स्किनला निरोगी ठेवते.

कँसरची शक्यता कमी
अनेक स्टडीज मध्ये समोर आले आहे की, अननस खाल्ल्याने कँसरची भिती दूर होऊ शकते. कारण यामध्ये कँसरपासुन बचाव करणारे तत्त्व उपलब्ध असतात. एका संशोधनात सांगितले गेले की, अननसमध्ये उपलब्ध ब्रोमेलेन तुम्हाला कोलोरेक्टल कँसर पासुन वाचवते.

 

News English Summary: In the current hot summer, it is very important to include a balanced diet. Eating pineapple in summer is good for the body. Pineapple helps to get rid of many problems in the body. Eating pineapple in summer gives energy to the body. But if you have any health problems, it is very important to consult a doctor. Let’s learn about the 7 major benefits of pineapple.

News English Title: Eat pineapple and you know its benefits news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x