23 February 2025 3:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity Money Alert | प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात ग्रॅच्युइटीचे 2,01,923 रुपये जमा होणार, बेसिक सॅलरी प्रमाणे रक्कम मिळेल GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार
x

Health First | दूधासोबत हे '4' पदार्थ खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे माहित आहेत का? - वाचा सविस्तर

Eat these food with milk

मुंबई, १० जुलै | दूध हे पूर्णअन्न असल्याने अनेकदा जेवणाची वेळ टळून गेल्यास आपण दूध पितो. दूधामुळे वेळी अवेळी लागणार्‍या भूकेवर मात करता येऊ शकते. दूधात कॅल्शियम घटक मुबलक प्रमाणात असल्याने हाडांच्या आरोग्यासाठी त्याचा फायदा होतो. दूध हे आरोग्याला फायदेशीर असले तरीही त्याच्यासोबत तुम्ही काय खाता ? यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. मग दूधाच्या सेवनामुळे तुम्हांला आरोग्याला होणारा फायदा दुप्पट करायचा असेल तर काही खास पदार्थांचा दूधासोबत आस्वाद घ्यायला विसरू नका.

दूधासोबत कोणते पदार्थ खावेत ?
दूध आणि खजूर:
दूधात खजूर मिसळून प्यायल्यास आरोग्याला फायदा होतो. दूधाअम्ध्ये व्हिटॅमिन घटक मुबलक असतात. सोबतच अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटकही असतात. यामुळे दुबळ्या लोकांना रक्त वाढवण्यासाठी, मसल्स वाढवण्यासाठी तसेच शरीराला उर्जा मिळवण्यासाठी त्याचा फायदा होतो.

दूध आणि खसखस:
दूधात खसखस मिसळून पिणेदेखील आरोग्यवर्धक आहे. खसखसीमध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड मुबलक प्रमाणात असतात. दूधात खसखस मिसळल्याने वजन नियंत्रणामध्ये राहण्यास मदत होते. सोबतच शरीर मजबूत होते.

दूध आणि दालचिनी:
दूधात दालचिनी मिसळून प्यायल्याने वजन घटवण्यास मदत होते. दालचिनीयुक्त दूधामुळे शरीराची रोगप्रतिकारक्षमता सुधारते. अनेक आजारांचा धोका कमी करण्यास मदत होते.

दूध आणि काळामिरी:
दूधात काळामिरी मिसळून प्यायल्याने हाडांना मजबुती मिळते. काळामिरी वजन घटवण्यास, व्हायरल इंफेक्शन दूर ठेवण्यास मदत करते. त्यामुळे काळामिरीयुक्त दूधही परिणामकारक आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Eat these food with milk for health benefits in Marathi news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x