26 December 2024 6:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK EPFO Pension Alert | खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वर्षात पेन्शन वाढणार, जाणून घ्या फायद्याची अपडेट IRFC Share Price | रेल्वे स्टॉक IRFC सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना असावी तर अशी, महिना SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 5 लाख रुपये परतावा
x

Health First | काळ्या मिठाच्या सेवनाने होतील आरोग्यास फायदे । नक्की वाचा

benefits of black salt

मुंबई २४ मे : काळे मीठ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात वापरला जाणारा खाद्यपदार्थ आहे. बर्‍याच प्रकारचा डिशची चव वाढविण्यासाठी याचा वापर केला जातो. त्यामध्ये बऱ्याच प्रकारची प्रथिने आणि औषधी गुणधर्म आढळतात, ज्यामुळे ते आपल्या शरीराला आजारांपासून वाचवते.सामान्यतः लोक स्वयंपाकासाठी पांढऱ्या मिठाचाच वापर करतात, पण काळ्या मिठाचे फायदे भरपूर आहेत. जाणून घ्या कुठे आपल्या कामी येऊ शकते काळे मीठ.

1. चरबी कमी करण्यासाठी मदतगार
काळे मीठ हे आपल्या शरीरातील घातक जिवाणूंचा नाश करते आणि शरीरातील वाढती चरबी कमी करण्यास मदत करते. काळ्या मिठामुळे खाद्यपदार्थांची चवही वाढते. आयुर्वेदानुसार दररोज सकाळी गरम पाण्यात काळे मीठ टाकून घेतल्याने आरोग्य चांगले राहते.

2. हाडे मजबूत होतात
काळ्या मिठात अनेक प्रकारची पोषकतत्वे आणि जीवनसत्वे असतात. नियमितपणे याचे सेवन केल्याने शरीरातील हाडे मजबूत होतात.

3. मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर
मधुमेहाच्या रुग्णांनी साध्या मिठाऐवजी काळ्या मिठाचे सेवन अधिक करावे. यामुळे शरीरातील रक्तशर्करा नियंत्रणात राहते आणि तब्येत सुधारते.

4. लहान मुलांसाठी सर्वाधिक फायदेशीर
काळे मीठ हे लहान मुलांसाठी सर्वाधिक फायदेशीर मानले जाते. यामुळे अपचन आणि कफ जमण्याच्या समस्यांमध्ये आराम मिळतो. आपल्या मुलाच्या जेवणात रोज थोडे काळे मीठ टाकल्याने पोटाच्या समस्या दूर होतात.

5. पाचनशक्ती सुधारण्यात असते सहाय्यकारी
काळ्या मिठामुळे आपले पाचनतंत्र सुधारते आणि आपल्या शरीरातील सेराटोनिन हे संप्रेरकही वाढवते ज्यामुळे आपल्याला तणावमुक्त राहण्यास मदत होते.

प्रमाणाबाहेर सेवन केल्यास होऊ शकतो त्रास
काळ्या मिठात सोडियमचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे शरीरात अधिक प्रमाणात क्रिस्टल म्हणजेच खडे तयार होण्याची शक्यता असते. त्यामुळे काळ्या मिठाचे सेवन अधिक प्रमाणात करू नका.

News English Summary: Black salt is a staple food in every Indian kitchen. It is used to enhance the taste of many types of dishes. It contains a variety of proteins and medicinal properties, which protect our body from diseases. Generally, people use only white salt for cooking, but the benefits of black salt are many. Learn where black salt can come in handy.

News English Title: Eating black salt is beneficiary to our health news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x