22 November 2024 10:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

Health first | जाणून घ्या चिकू खाण्याचे आहेत हे फायदे । नक्की वाचा

benefits of chiku

मुंबई ८ एप्रिल : अतिशय मधुर चवीचे आणि सहज उपलब्ध असणारे असे फळ म्हणजे चिकू. हे फळ शरीराला ताकद देणारे, शरीरातील लोहाची कमतरता दूर करणारे, हाडांना बळकटी देणारे, शरीराची चयापचय शक्ती वाढविणारे, असे बहुगुणी आहे. चिकूच्या सेवनाने होणाऱ्या फायद्यांवर आहारतज्ञ आणि वैज्ञानिकांनी संशोधन केले असून, त्याद्वारे चिकूचे सेवन आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असल्याचे निदान केले आहे. मूळचे मेक्सिको आणि मध्य अमरिकेतील काही भागांमध्ये होणारे हे फळ आता जगभरातील अनेक देशांमध्ये पिकविले जात असते. चिकूचे झाड जास्तीत जास्त तीस मीटर उंचीपर्यंत वाढू शकत असून, सर्वसाधारणपणे या झाडाची उंची दहा ते पंधरा मीटर पर्यंत वाढते. उत्तम देखभाल लाभलेले चिकूचे झाड एका वर्षामध्ये दोन हजार फळे देऊ शकते.

कॅन्सरसारख्या आजारांपासून होतो बचाव
चिकूमध्ये व्हिटामिन ए, व्हिटामिन बी, आर्यन, कॅल्शियम, फायबर, अंटीऑक्सिड्ंट् असतात. ज्यामुळे कॅन्सरसारखे आजार रोखण्यास मदत होते. जर तुम्ही दररोज चिकूचे सेवन केले तर कॅन्सरसारख्या आजारांपासून बचाव होऊ शकतो.

डोळ्यांचे तेज वाढते
चिकूमध्ये व्हिटामिन ए मोठ्या प्रमाणत असते ज्यामुळे डोळ्यांचे तेज वाढण्यास मदत होते. दररोज चिकूचे सेवन केल्यास डोळ्यांच्या समस्या दूर होतात. यासाठी दररोजच्या खाण्यामध्ये चिकूचा समावेश केला पाहिजे.

चिकू खाल्ल्याने चेहऱ्याची सुंदरता वाढते
चिकूमध्ये अनेक पोषकतत्वे असतात. चिकू खाल्ल्याने केवळ आरोग्यच चांगले राहत नाही तर चेहऱ्याची सुंदरताही वाढते. यातील अँटीऑक्सिडंट्स, अँटी व्हायरस आणि अँटी बॅक्टेरियल सारखे गुण त्वचेला स्वस्थ राखण्यास मदत करतात.

News English Summary: Chiku is a very tasty and easily available fruit. This fruit is said to give strength to the body, eliminate iron deficiency in the body, strengthen the bones, increase the metabolic power of the body. Dietitians and scientists have conducted research on the benefits of consuming chiku, which has led to a diagnosis of health benefits. Originally grown in Mexico and parts of Central America, the fruit is now grown in many countries around the world. The Chiku tree can grow up to a maximum height of 30 meters, and in general the height of this tree increases from 10 to 15 meters. A well-maintained chiku tree can bear two thousand fruits in a year.

News English Title: Eating chiku is beneficiary to our health

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x