27 December 2024 7:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

Health First | गुणकारी लसणाचा आपल्या आहारात करा समावेश । सविस्तर वाचा

benefits of garlic

मुंबई २९ एप्रिल : साधारणपणे भारतीय खाद्यपदार्थांमध्ये लसूण आर्वजून वापरले जाते. डाळीला, भाजीच्या फोडणीला, चटणीला लसूण वापरले जाते. स्वाद वाढवण्यासाठी लसूण आवश्यक आहे.हजारो वर्षापूर्वीपासून लसूण औषधी स्वरूपात वापरण्यात येत आहे.दररोज लसणाची एक पाकळी खाणे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. यातून अ, ब आणि क जीवनसत्त्वांसह आयोडीन, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यासारखे अनेक पोषक तत्त्व एकत्र मिळतात. तर मग जाणून घेऊया लसूण खाण्याचे फायदे….

  • लसणाचे तेल तळहात आणि तळपायाला लावल्यास डास जवळ येत नाहीत. तसेच त्वचाही नितळ होते.
  • लसणात अ‍ॅण्टिबॅक्टेरियल गुण आहेत. म्हणूनच तारुण्यपीटिकांची समस्या असल्यास लसणाचे सेवन अतिशय गुणकारी ठरते. तारुण्यपीटिकेवर लसणाची पाकळी लावून हलक्याने रगडल्यास लवकरच आराम मिळतो.
  • लसणाच्या नियमित सेवनाने त्वचेचे आजारही बरे होतात. तळपायाच्या आजारांसाठी लसूण अतिशय उपयुक्त आहे. िरगवर्म किंवा अ‍ॅथलिट फूट यासारख्या आजारांवर लसूण गुणकारी आहे.
  • लसूण शरीरात इन्सुलीनचे प्रमाण वाढविते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे अतिशय उपयुक्त आहे.
  • लसणाचे सेवन कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित करते. लसणामुळे रक्ताचे शुद्धीकरण होतेच, शिवाय रक्त पातळ होते. त्यामुळे रक्ताच्या गाठी निर्माण होत नाहीत.
  • लसूण हृदयाला ऑक्सिजन रॅडीकल्सच्या प्रभावापासून वाचवितो. तसेच सल्फरयुक्त गुण रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊ देत नाही. अ‍ॅण्टी क्लोनिंग गुणांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होत नाहीत.
  • सरसूच्या तेलात लसणाच्या पाकळ्या टाकून उकळून घ्या. हे तेल कानात टाकल्यास कान दुखण्याचा त्रास कमी होतो.
  • रोज लसणाचे सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते. हवामान बदलामुळे होणा-या सर्दी आणि खोकल्यावर लसूण टाकलेला चहा गुणकारी आहे.
  • थंडी किंवा बदलणा-या वातावरणात सर्वच वयोगटातील लोकांना कफ किंवा सर्दीचा त्रास होतो. लसणाचे नियमित सेवन केल्यास अशा आजारांपासून सहज मुक्तता होऊ शकते.
  • लसणात अ‍ॅण्टी इन्फ्लामेटरी गुण आहेत. ज्यामुळे अ‍ॅलर्जीला दूर पळविता येते. लसणातील अ‍ॅण्टी आर्थिटिक गुणांमुळे डायलीसल्फाईड आणि थियासेरेमोनोने यांचे संतुलन बनून राहते. लसणाचा रस प्यायल्यानेही अनेक फायदे आहेत.
  • लसणाचे नियमित सेवन केल्यास कर्करोगाचा धोका कमी होतो.
  • सिरोसियसच्या त्रासावर लसूण रामबाण उपाय आहे. लसणाचे तेल लावल्यास त्वचेला खूप आराम मिळतो आणि समस्या दूर होते.
  • लसणात डायली-सल्फाईड असते. त्यामुळे फेरोप्रोटीनचे प्रमाण वाढविते. याचा फायदा म्हणजे, आयर्न मेटाबॉलिझम सुधारण्यात मदत होते.
  • नियमित लसूण सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. अ‍ॅसिडीटी आणि गॅसेसच्या त्रासापासूनही दिलासा मिळतो. हृदयाच्या विकारांसह तणावावरही लसूण नियंत्रण ठेवतो.
  • दुधात लसूण उकळवून पाजल्यास लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढते. लसणाच्या पाकळ्या भाजून खाल्ल्यास लहान मुलांना श्वास घेताना होणारा त्रास दूर होतो. ज्या मुलांना सर्दीचा त्रास जास्त होतो, त्यांना लसणाच्या पाकळ्यांची माळा घातली पाहिजे. त्रास कमी होतो.
  • वजन घटविण्यात लसूण गुणकारी आहे. शरीरातील वसा कोशिकांना विनियमित करण्याची क्षमता लसणात आहे. त्यामुळे वजन कमी होते.
  • गर्भवती महिलांनी नियमित लसणाचे सेवन केले पाहिजे. गर्भवती महिलांना उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर संपूर्ण गर्भावस्थेपर्यंत लसणाचे सेवन केले पाहिजे.
  • लसणाच्या सेवनामुळे व्हायरल, फंगल, यीस्ट आणि वर्म यांचा संसर्ग होत नाही. ताज्या लसणाच्या सेवनामुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोका कमी होतो.
  • सांधेदुखीसाठी लसूण अतिशय गुणकारी आहे.
  • शरीरात रक्ताची कमतरता असल्यास लसूण खूप फायदेशीर आहे. लसणात लोह असते. रक्त तयार होण्यास लोह आवश्यक असते. तसेच क जीवनसत्त्व असल्यामुळे स्कर्वी रोगापासूनही बचाव होतो.
  • लसणाच्या सेवनामुळे सर्दीपासून लवकर आराम होतो. तसेच घशाला होणा-या संसर्गापासूनही बचाव होतो. अस्थमासारख्या श्वसनविकारात लसूण गुणकारी आहे.
  • लसणाच्या सेवनाने केस गळणे बंद होते. लसणात अ‍ॅलिसिनचे प्रमाण भरपूर आहे. तसेच सल्फरही असते. लसणाची पेस्ट डोक्याला लावल्यास केस गळणे कमी होते
  • लसूण नियमित सेवन केल्यास दातांच्या दुखण्यामध्ये आराम मिळतो. दात दुखत असल्यास लसणाची पेस्ट करून दातांवर ठेवावी. लगेच आराम मिळेल. लसणात अ‍ॅण्टी बॅक्टेरियल तत्त्व असतता. त्याचा फायदा होतो.
  • लसूण एक नसर्गिक पेस्टीसाईड म्हणूनही उपयोगी आहे. लसूण, मिनरल ऑईल, पाणी आणि लिक्विड सोप एकत्र करून नसíगक कीटकनाशक तयार केले जाऊ शकते.
  • लसणाच्या ५ पाकळ्या बारीक करून त्यात थोडे पाणी टाकावे. त्यात १० ग्रॅम मध मिसळावा. हे मिश्रण सकाळी आणि सायंकाळी सेवन करावे. यामुळे पांढरे केस काळे होतील.
  • लसणाचे सेवन लहान मुलांसाठी उपयुक्त आहे. हवामान बदलाशी संबंधित आजारांवर लसूण गुणकारी आहे. ५ वर्षापर्यंतच्या मुलांसाठी लसूण अनेक आजारांवर उपायकारी सिद्ध होतो.

News English Summary: Garlic is commonly used in Indian cuisine. Garlic is used in pulses, vegetable chops, chutneys. Garlic is essential for enhancing the taste. Garlic has been used medicinally for thousands of years. Eating a clove of garlic every day is very good for health. It combines vitamins A, B and C with many nutrients like iodine, iron, potassium, calcium and magnesium. So let’s learn the benefits of eating garlic ….

News English Title: Eating garlic everyday is beneficiary to our health news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x