Health First | पाहूया गुलकंद आरोग्यास किती लाभदायी आहे
मुंबई ३ मे : गुलाबाचे फूल जितके नाजुक ,मोहक आहे तितकेच त्याचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत. साखर व गुलाबाच्या पाकळ्यांनी तयार केलेला ‘गुलकंद’ चवीला अवीट आणि आरोग्याला हितकारी आहे. जसजसा उकाडा वाढायला लागतो , तसतसे पित्त, जळजळ , उष्माघात यासारखे आजार डोकं वर काढायला सुरूवात करतात. मग गरमी पासून सुटका करण्यासाठी बाजारात मिळणारी शीतपेयं घेण्यापेक्षा शीतदायी आणि तृष्णाशामक गुलकंदच घ्या. आयुर्वेदातही गुलकंदाचा वापर प्रामुख्याने अनेक औषधांमध्ये केला जातो. गुलकंदामध्ये व्हिटामिन सी, ई आणि बी भरपूर प्रमाणात असते. याच्या सेवनाने शरीर थंड राहते आणि उन्हाळ्यामुळे होणारा त्रास दूर होतो.
गुलकंद सेवनाचे अनेक फायदे होतात.
अल्सर आणि सूज :
गुलकंदाचे सेवन केल्याने पित्त प्रकोप होत नाही. पोटातील उष्णता कमी करण्याचे काम गुलकंद करतो. त्याशिवाय आतड्याचा अल्सर तसेच सूज यावर उपचार करून त्वरित आराम मिळतो.
गुलकंदामुळे यकृताची ताकद वाढते. तसेच भूक आणि पचन सुधारण्यासही मदत होते.
त्वचेसाठी उपयुक्त :
त्वचेशी निगडित समस्यांमध्ये गुलकंदाचे सेवन केल्याचा फायदा होतो. त्वचेशी निगडित समस्या जसे डाग दूर होण्यास मदत होते. यामुळे रक्त शुद्ध होते. त्यामुळे ब्लॅकहेड्स, पिपल्सच्या समस्या दूर होतात.चेहर्याची सूज आणि डोळे लाल होणे कमी होते. तोंड येण्यावरही त्याचा ङ्खायदा होतो.
मासिक पाळीमध्ये प्रभावी :
ज्या स्त्रियांना पाळीच्या काळात अतिरक्तस्त्राव होतो तसेच ल्युकोरिया सारख्या समस्या उद्भवतात त्यावर गुलकंद उपयु्क्त आहे.
गुलकंद सेवनाचे इतर फायदे:
- गुलकंदाच्या सेवनाने शरीर ताजेतवाने राहते. तसेच गारवा मिळतो. उन्हामुळे येणारा थकवा, आळस, शरीरातील जळजळ दूर होते. शरीराला ऊर्जा देणारे हे टॉनिक आहे.
- उन्हाळ्यात अनेकांच्या नाकातून रक्त येते. यातून वाचण्यासाठी उन्हात जाण्याआधी दोन चमचे गुलकंद खा.
- गरोदर महिलांसाठी याचे सेवन खूपच फायदेशीर ठरते. गरोदरपणात बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर गुलकंद खाण्याने फायदा होतो.
गुलकंदाचे सेवन कसे करावे :
गुलकंदाचे फायदे पाहिले तर दिवसातून 2 वेळा एक चमचा गुलकंद सेवन करायचे मग ते लस्सी, फळांचा रस, मिल्कशेक, आईस्क्रीम, गुलाब चहा या कोणत्याही प्रकारे करू शकतो.
News English Summary: As delicate and elegant as the rose flower is, it also has health benefits. ‘Gulkand’ made from sugar and rose petals is delicious and healthy. Gulkand is also used in Ayurveda in many medicines. Sugarcane is rich in vitamins C, E and B. Its consumption keeps the body cool and relieves the discomfort caused by summe.
News English Title:Eating Gulkand is beneficiary to our health news update article
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Insurance Tips | कार इन्शुरन्स क्लेम करण्याच्या नादात 'या' गंभीर चुका करू नका, इथे जाणून घ्या योग्य माहिती
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा