26 December 2024 5:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK EPFO Pension Alert | खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वर्षात पेन्शन वाढणार, जाणून घ्या फायद्याची अपडेट IRFC Share Price | रेल्वे स्टॉक IRFC सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना असावी तर अशी, महिना SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 5 लाख रुपये परतावा
x

Health First | आरोग्यदायी ओट्स खाण्याचे हे आहेत मोठे फायदे

oats benefits

मुंबई, ०८ जून | ओट्स खाल्ल्याने शरीराला नक्की काय मिळतं, असा प्रश्न अनेकांना होता. खरे तर ओट्समध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स व फॅट्स असे अन्नातील तीनही मुख्य घटक असतात. त्यापैकी कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण ७० टक्के, प्रोटीन्सचे प्रमाण १५ टक्के तर फॅट्सचे प्रमाणही १५ टक्के असते. या फॅट्स शरीराला आवश्यक अशा (मोनो आणि पॉलिअनसॅच्युरेटेड) असतात. त्यामुळे त्यांचे वाईट परिणाम होत नाहीत. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्समुळे रक्तात साखर एकदम न वाढता हळूहळू रिलीज होते.

याशिवाय ओट्समध्ये कॅल्शिअम, आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मँगेनीज असे मिनरल्स असून, सोडियमचे प्रमाण अगदी कमी असते. तसेच बहुतेक सर्व बी व्हिटॅम‌िन्स असतात. मुख्य म्हणजे विरघळणारा आणि न विरघळणारा असे दोन्ही प्रकारचे फायबर असल्याने कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत तर होतेच; परंतु बद्धकोष्ठतेसारखे विकारही कमी होतात.

अनेक जण गव्हाच्या पिठाऐवजी ओट्सच्या पिठापासून बनवलेली भाकरी व इतर गोष्टींचे सेवन करतात. आपल्या सर्वांना ही गोष्ट माहित आहे की ओट्स आपल्या साधा आहाराचे निरोगी आहारामध्ये रूपांतर करतो. हे इतर अनेक धान्यांपेक्षा अधिक फायदेशीर आहे. त्यामुळेच कोरोना महामारीत लोक ओट्सच्या पिठाचे सेवन करण्यास प्राधान्य देत आहेत.

100 ग्रॅम ओट्समध्ये किती पोषक तत्वे मिळतात:

  • कॅलरी : 389
  • पाणी : 8%
  • प्रोटीन : 16.9 ग्रॅम
  • कार्ब्सन : 66.3 ग्रॅम
  • साखर : 0 ग्रॅम
  • फायबर : 10.6 ग्रॅम
  • चरबी: 6.9 ग्रॅम

ग्लूटेनमुक्त असतात ओट्स:
आपल्या शरिरातील विविध व्याधींना ग्लुटेन कारणीभूत असते. त्यामुळे आपण आरोग्याची काळजी घेताना ग्लुटेनमुक्त पदार्थ खायला पसंती दिली पाहिजे. अन्यथा आपल्याला पोटदुखी यांसारख्या त्रासाला सामोरे जावे लागते. ओट्सदेखील ग्लुटेनमुक्त पदार्थ आहे. त्यामुळे विविध व्याधींपासून सुटका मिळवण्यासाठी ओट्सचे सेवन उपयुक्त ठरेल.

ओट्सचे पीठ अधिक गुणकारी:
सामान्यत: घरांमध्ये गहू आटा किंवा इतर आटाचा वापर केला जातो. तुलनेत ओट्सच्या वापराचे प्रमाण कमी आहे. मात्र आपण नेमकी हीच चूक करतो की अधिक गुणकारी असलेल्या ओट्सचा तुलनेत कमी वापर करतो. ओट्सचे पीठ अधिक स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर असते हे लक्षात घ्या.

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात आणते:
मधुमेहाच्या रुग्णांसाठी ओट्सचे सेवन अधिक फायदेशीर असते. ओट्समुळे आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. ओट्समध्ये व्हिटॅमिन बी, अँटीऑक्सीडेंट, फायबर, डायटरी फायबर आणि मिनरल्स असते. हे सर्व घटक आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. बॅड कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेचे प्रमाणामुळे आरोग्याच्या समस्यांचा सामना करणाऱ्या लोकांनी ओट्सचे अवश्य सेवन करावे. त्याचबरोबर पचन व्यवस्था सुस्थितीत ठेवणे, ह्रदयविकाराचा धोका कमी करणे यासाठीही ओट्स उपयुक्त आहे.

 

News English Summary: Many wondered what exactly the body gets from eating oats. In fact, oats contain all the three main components of a diet: complex carbohydrates, proteins and fats. Of these, 70% are carbohydrates, 15% are proteins and 15% are fats. These fats are essential for the body (mono and polyunsaturated). So they do not have bad consequences. Complex carbohydrates are released slowly without raising blood sugar.

News English Title: Eating healthy oats benefits for health news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x