26 December 2024 5:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK EPFO Pension Alert | खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वर्षात पेन्शन वाढणार, जाणून घ्या फायद्याची अपडेट IRFC Share Price | रेल्वे स्टॉक IRFC सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना असावी तर अशी, महिना SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 5 लाख रुपये परतावा Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनी बाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांकडून रेटिंग सह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: SUZLON
x

Health First | फळांचा राजा आंबा सगळ्यांनाच आवडतो तर जाणून घ्या तो खाल्ल्याने होणारे फायदे आणि तोटे

effects of mango

मुंबई १९ एप्रिल : उन्हाळा सुरू होताच प्रत्येकजण आंब्याची आतुरतेने वाट पाहत असतो. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी सोबतच कॉपर, झिंक, पोटॅशियमसारखे अनेक मिनरल्स असतात. जे आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहेत. हापूस, तोतापूरी, पायरी, बदामी अशा विविध प्रकारातील आंबे चवीला जितके चांगली असतात तितकेच आरोग्यालाही पौष्टिक असतात. मात्र आंबा खाण्याचे काही फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत

आंबा खाण्याचे फायदे –
आंबा खाण्याच्या अनेक फायद्यांपैकी एक फायदा म्हणजे आंबा त्वचेला आतून साफ करतो. आंब्यात भरपूर प्रमाणात बीटा-कॅरोटीन आणि विटॅमिन ए असतं. आंब्यात असणारे कॅरोटीनॉइड त्वचा तजेलदार ठेवण्यास मदत करते.

आंब्यात व्हिटॅमिन सी, ए आणि विविध प्रकारचं कॅरोटेनॉइड असतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

आंबा व्हिटॅमिन आणि खनिजांचा चांगला स्त्रोत असल्याने शरीराला हायड्रेटेट ठेवतो. एका अभ्यासात शरीराचा उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आंबा फायदेशीर ठरतो.

ऍनीमियाच्या रुग्णांसाठी आंबा नैसर्गिक वरदान आहे. आंब्यात असणारं लोह शरीरासाठी फायदेशीर आहे. आर्यन आणि कॅल्शियम वाढवण्यासाठी आंबा अतिशय गुणकारी आहे.

आंबा खाण्याचे तोटे –
आंब्याला लवकर पिकवण्यासाठी त्यात अनेकदा कॅल्शियम कार्बाइटचा मारा केला जातो. या केमिकलमुळे शरीराला मोठा धोका असतो. आंबा खाण्याआधी तो धुवून स्वच्छ केला जातो पण केवळ पाण्याने धुण्यामुळे त्यावरील केमिकल पूर्णत: नष्ट होत नाही.

एका मध्यम आकाराच्या आंब्यात १३५ कॅलरीज असतात. अधिक प्रमाणात आंबा खाल्याने वजन वाढते.

News English Summary: As summer begins, everyone is eagerly awaiting mangoes. Mango contains Vitamin A, C as well as many minerals like Copper, Zinc, Potassium. Which are very beneficial for your health. Different types of mangoes like Hapus, Totapuri, Payari, Badami are as good for taste as they are for health. But eating mango has some advantages as well as some disadvantages

News English Title: Eating mango has advantages and disadvantages news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x