Health First | तळलेले पदार्थ खायचे आहेत आणि आरोग्यावरील दुष्परिणामही टाळायचे आहेत | मग हे करा

मुंबई, २७ मे | तळलेल्या पदार्थावर ताव मारणे बऱ्याच जणांना आवडते. मात्र हे चमचमीत पदार्थ आरोग्यासाठी योग्य नाहीत. कारण तळलेल्या पदार्थाचे आणि शर्करायुक्त पेयांचे नियमित सेवन करणाऱ्यांना हृदयविकाराचा धोका अधिक असतो, असा निष्कर्ष अमेरिकी हृदयविकारतज्ज्ञांनी काढला आहे. सकस आहार करणाऱ्यांपेक्षा तळलेले पदार्थ खाणाऱ्यांना हृदयविकाराचा धोका ५६ टक्के अधिक आहे, असे हे शास्त्रज्ञ सांगतात.
तेलकट पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक असतात, असं आपण बऱ्याचदा ऐकलं असेलच. दुसरीकडे बटाटा वडा, सामोसे, साबुदाणा वड्याची प्लेट समोर ठेवल्यास ‘नाही’ कसं म्हणायचं. पण तळलेल्या पदार्थांवर मनसोक्त ताव मारण्याची परवानगी तुम्ही स्वतःच स्वतःला देऊ शकता, असं म्हटलं तर?… हो हे शक्य आहे. तुम्ही म्हणाल मग तब्येतीचं काय?. पण Not to Worry, आरोग्य सांभाळून चमचमीत पदार्थांची चव बिनधास्तपणे कशी चाखता येईल, यासंदर्भातील काही टिप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत. तेलकट पदार्थ खाऊन कोलेस्टेरॉल, वाढणारी चरबी, हृदयरोग आणि अन्य आजारांचा सामना करावा लागू नये, यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. निरोगी आरोग्यासाठी पौष्टिक आहारासोबत खाण्यापिण्याच्या नियमांचं पालन करणंही आवश्यक आहे.
उच्च कोलेस्टेरॉलची समस्या तेलकट खाद्यपदार्थ आणि जंकफूडच्या जास्त सेवनामुळे होते. कोलेस्टेरॉल हा शरीराच्या सर्व पेशींमध्ये आढळणारा मेणासारखा पदार्थ आहे. मेंदू आणि मज्जासंस्था पूर्णपणे कोलेस्टेरॉलवर अवलंबून असतात. उच्च कोलेस्टेरॉल असल्यावर अति चरबीयुक्त पदार्थ खाण्यामुळे खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढते आणि चांगल्या कोलेस्टेरॉलची घट होते. कोलेस्टेरॉलच्या चांगल्या पातळीत घट झाल्यामुळे ते रक्तवाहिन्या गोठतात आणि रक्ताचा प्रवाहात अडथळा होतो. यामुळे हृदय आणि मेंदूच्या समस्यांचा धोका वाढतो.
तज्ज्ञ याबाबत सांगतात की, उच्च कोलेस्टेरॉलचं संतुलन राखण्यासाठी चरबीयुक्त आणि तेलकट पदार्थ खाणं टाळणं महत्त्वाचं आहे. जास्त तळलेले पदार्थ खाल्ल्यानं शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. या व्यतिरिक्त ज्या तेलात खाद्यपदार्थ तळले जातात ते बऱ्याचदा आरोग्यासाठी हानिकारक असते. त्यावेळी मोठ्या उत्साहाने तुम्ही तेलकट पदार्थ खाल पण त्यानंतर होणारा कोलेस्टेरॉलचा त्रास टाळण्यासाठी एक उपाय आहे.
जर तुम्ही जास्त तेलकट खाल्लं असेल तर त्यानंतर एक किंवा दोन ग्लास गरम पाणी प्या. असं केल्याने तेलकट अन्न शरीरातून सहज काढता येईल. यामुळे आतड्या, यकृत आणि पोट निरोगी राहिल आणि तेलामुळे होणारे नुकसान टाळलं जाईल. कोलेस्ट्रॉलसाठी कोमट पाणी आणि मध यांचं मिश्रण चांगलं आहे आणि यामुळे हृदयरोग बरा होतो. तसंच उच्च रक्तदाब समस्येवर मात करण्यास मदत होते. तेलकट अन्न खाल्ल्यानंतर कोणत्याही थंड गोष्टी खाऊ नयेत याची काळजी घ्या कारण त्याचा यकृत, पोट आणि आतड्यांवर विपरित परिणाम होतो.
याखेरीज जर तुम्ही जास्त तेलकट पदार्थ खाल्ले असतील तर त्यानंतर थोड्या फेऱ्या मारा. हे अतिरिक्त कर्बोदक जाळण्यास मदत करेल. आयुर्वेदानुसार तेलकट पदार्थांचे सेवन केल्यानंतर मध सेवन केल्यास फायदा होतो. याशिवाय दिवसात दोन ते तीन वेळा मधासह दोन चिमूटभर काळी मिरी पावडर वापरली जाऊ शकते.
जर तळलेले पदार्थ आवडत असतील तर तळण्यासाठी ऑलिव्ह ऑईल किंवा सूर्यफूलाचे तेल वापरा. ऑलिव्ह ऑईल आणि सूर्यफूलाच्या तेलात तळलेले पदार्थ हानिकारक नसल्याचं संशोधनातून दिसून आले आहे. जे लोक वयाने मोठे आहेत किंवा वजन जास्त आहेत त्यांनी उच्च कोलेस्टेरॉल टाळण्यासाठी हे उपाय केले पाहिजेत. गरम पाणी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. जर मुलांना सुरुवातीपासूनच याची सवय झाली असेल तर ती मोठी झाल्यावर देखील निरोगी राहतील.
News English Summary: Many people like to have a fever over fried foods. However, these spicy foods are not good for health. Because regular consumption of fried foods and sugary drinks increases the risk of heart attack, American cardiologists have concluded. Scientists estimate that people who eat fried foods have a 56 percent higher risk of heart disease than those who do not.
News English Title: Eating oily food precautions helps to control cholesterol health article news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB