Health First | पनीर खाणे आरोग्यासाठी लाभदायी । नक्की वाचा
मुंबई ७ एप्रिल : मोठया प्रमाणात लोकांना पनीर आवडतं. त्याचे कारण म्हणजे, भारतीय जेवणात पनीरचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात. भाज्यांसोबत पराठ्यांमध्ये पनीरचा वेगवेगळ्या प्रकारात समावेश केला जातो. फक्त चवीत नव्हे, तर तुमच्या आरोग्यासाठी पनीर खूप चांगले आहे. कॅल्शियम भरपूर असल्याने, पनीर तुमच्या हाडांसाठी आणि दातांसाठी खूप फायदेशीर आहे. प्रोटीन युक्त पनीर मासपेशींसाठी फायदेशीर आहे. पनीर खाल्याने वजन कमी करायलाही मदत होते.
पनीर प्रोटीन युक्त आहे. वजन कमी करण्यास मदत होते. हे भूक कमी करणारे हार्मोन्स जीएलपी -१, पीवाइवाई आणि सीसीकेच्या स्तराला वाढवतात. तिथेच भूख वाढवणाऱ्या हार्मोनच्या स्तराला कमी करतात. त्यामुळे डायटिंगला फायदा होतो. मात्र पनीर अतिप्रमाणात खाल्ल्यास वजन वाढू शकतं हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
हाडे होतात मजबूत-
वाढत्या वयामुळे हाडांची झीज होते तर मेनोपॉजमुळे स्त्रियांनाही हाडांच्या तक्रारी सुरु होतात. तसंच व्यायाम न करणे, अयोग्य आहार घेणे यामुळे हाडे सहज फ्रॅक्चर होणे किंवा ठिसूळ होणे अशा समस्या उद्भवत राहतात. म्हणूनच हाडांच्या बळकटीसाठी पनीक व दुग्धजन्य पदार्थांचं सेवन करावं. पनीर मध्ये व्हिटॅमिन ए, फॉस्फरस आणि कॅल्शियम असल्यामुळे हाडे मजबूत होतात. दुधामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. एक कप दुधामध्ये 280 mg कॅल्शियम असते. त्यामुळे हाडे मजबूत राहण्यासाठी दररोज कपभर दुधाचा आहारात समावेश असावा. दुधामध्ये प्रोटीनही भरपूर असल्याने मांसपेशींच्या आरोग्यासाठीही ते उपयोगी ठरते. याशिवाय दुधाचे पदार्थ म्हणजे दही, लोणी, तूप, ताक, पनीर यामुळेही भरपूर कॅल्शियम मिळत असते.
प्रोटीन रिच डाएट-
१०० ग्रॅम पनीर मध्ये जवळ जवळ १८ ग्रॅम प्रोटीन आढळतं. पनीर मध्ये नैसर्गिकरित्या चिकटपणा असतो जो त्वचेमध्ये व शरीरातील इतर स्नायूंमध्ये मऊपणा टिकवून ठेवतो. ज्या लोकांना मांसाहार किंवा अंडी खायला आवडत नाहीत त्या लोकांनी मसल्स स्ट्रॉंग करण्यासाठी पनीरचं सेवन करणं गरजेचं असतं. प्रोटिन आणि कॅल्शियमबरोबरच पनीरमध्ये कॉन्ज्युगेट लिनोलीकअॅसिड नामक फॅटी अॅसिड असते. यामुळे शरीरातील फॅट्स कमी होऊन वजन कमी करण्यास मदत मिळते. त्यामुळे वजन कमी करायचे असल्यास आहारात पनीर असलेल्या पदार्थांचा समावेश करावा.
वजन कमी करण्यासाठी-
पनीरमध्ये प्रोटिन आणि कॅल्शियमबरोबरच पनीरमध्ये कॉन्ज्युगेट लिनोलीक अॅसिड नामक फॅटी अॅसिड असते. कॉन्ज्युगेट लिनोलीक अॅसिड आपलं मेटाबॉलिज्म योग्य ठेवण्यास लाभदायक ठरते व यामुळे आपले वजन नियंत्रित राहते. सोबतच पनीर भूक कमी करणा-या हार्मोन्समध्ये जसं की जीएलपी १, पीवाइवाई व सीसीकेच्या पातळीत वाढ करतं. पनीर मध्ये कॅल्शियम ,फॉस्फरस, पोटॅशियम आणि झिंक सुद्धा मोठ्या प्रमाणात असतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पनीर खाल्ल्याने आरोग्यदायी लाभ होतात. ज्यांच्या शरीरात यूरिक ॲसिड मोठ्या प्रमाणात वाढलेलं असतं त्यांना पनीर खाण्याचा सल्ला दिला जातो. तसंच जे नियमित व्यायाम करतात त्यांनाही पनीर खाणे गरजेचे असते.
News English Summary: Most people like paneer. This is because there are different types of paneer in Indian cuisine. Paneer is included in different types of parathas along with vegetables. Paneer is very good for your health, not just in taste. As it is rich in calcium, paneer is very beneficial for your bones and teeth. Protein rich paneer is beneficial for muscles. Eating paneer also helps in weight loss.
News English Title: Eating paneer beneficiary for our health news update article
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो