21 April 2025 4:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

Health First | मुलांची माती खाण्याची सवय सुटण्यासाठी करा हे उपाय

side effects of eating soil

मुंबई १२ मे : काही लहान मुलांना माती खाण्याची सवय असते. मुलांच्या या सवयीमुळे पालकांना खूप सतर्क राहावे लागते. कारण मुले कधी कुठे जावून माती खातील याचा थांगपत्ता लागत नाही. आरोग्यासाठी घातक असलेली मुलांची ही सवय सोडवण्यासाठी तुम्ही हे घरगुती उपाय करु शकता. तुमच्या मुलांनाही आहे का ही सवय? मग हे उपाय तुमच्या कामी येतील…

* केळी खायला द्या-
मुलं माती खात असेल तर त्याला केळी खायला द्या. या साठी केळी मॅश करावे त्यात मध मिसळून खाऊ घाला. असं केल्याने मुलांची माती खाण्याची सवय नाहीशी होते.

* हिरव्या पाले भाज्या –
मुलांच्या शरीरात रक्ताची कमतरता असल्यावर मुलं माती खातो. ही सवय सोडविण्यासाठी आपण मुलांना हिरव्या पाले भाज्या खाऊ घालाव्यात. कारण या मध्ये मुबलक प्रमाणात आयरन असतात. तसेच आपण मुलांना बीटरूट आणि डाळी किंवा इतर वस्तू देखील खायला देऊ शकता. या मुळे मुलांना फायदा होतो.

* ओवा खाऊ घाला-
मुलांना आपण ओवा देऊ शकता. या साठी
मुलाला झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासह ओवा द्या. असं केल्याने मुलाची माती खाण्याची सवय बदलू शकते.

* लवंग द्या-
मुलांना माती खाण्याची सवय सोडविण्यासाठी लवंग आपली मदत करू शकते. या साठी लवंग बारीक वाटून पाण्यात मिसळून उकळवून घ्या आणि हे पाणी थंड करून मुलांना थोडं थोडं पाजून द्या.

* कॅल्शिअमयुक्त पदार्थ द्या –
मुलांच्या माती खाण्याच्या सवयीमागे कॅल्शियमची कमतरता असते. यासाठी मुलांना आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करा.

* आंब्याच्या बाटचे चुर्ण –
थोड्या पाण्यात आंब्याच्या बाटचे चुर्ण मिसळून दिवसातून २-३ वेळा द्या. यामुळे मुलांच्या पोटातील जंत मरतील आणि त्याचबरोबर मुलांची माती खाण्याची सवयही दूर होईल.

News English Summary: Some children have a habit of eating soil. Parents need to be very careful about their children’s habits. Because it is not known where the children will go and eat the soil. Here are some suggestions on how to look or get an appointment for acne treatment. Do your children have this habit too? Then these solutions will work for you.

News English Title: Eating soil is dangerous to health news update article

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या