27 December 2024 7:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

Health First | सोयाबीन खाण्याचे आहेत आरोग्यदायी फायदे । नक्की वाचा

benefits of soybeans

मुंबई २४ एप्रिल : सोयाबीन हा एक महत्वपूर्ण आणि प्रोटीनयुक्त असा आहारातील घटक आहे. त्याचे शरीराला होणारे फायदेही अनेक आहेत. आहारामध्ये सोयाबीनचा नियमित वापर केल्याने हाडांच्या कमजोरीपासून आराम मिळतो. अंगाची काहिली करणाऱ्या या उन्हाळ्यात स्वत:ला फिट ठेवणे आणि आपल्या चेहऱ्याची खास काळजी राखणे गरजेचे असते. सोयाबीन केवळ तुमचे आरोग्य चांगले राखणार नाही तर त्वचेचीही काळजी घेईल.

महिलादेखील गहू किंवा अन्य धान्यांमध्ये सोयाबीन टाकून त्याचं पीठ करुन आणतात. सोयाबीनच्या सेवनाने अनेक शारीरिक व्याधी दूर होत असल्याचं म्हटलं जातं. विशेष म्हणजे सोयाबीनच्या बी प्रमाणेच त्याची अन्य उत्पादनांचादेखील शरीरासाठी तितकाच फायदा होतो. इतकंच नाही तर अलिकडे पाहायला गेलं तर सोयाबीनपासून तयार होणाऱ्या सोयाबडी (सोया नगेट) दूध व दुग्धजन्य पदार्थ, बेकरी उत्पादने (उदा. ब्रेड, बिस्किटे) व डाळीचे पदार्थ (उदा. नमकीन) यांना बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याचं पाहायला मिळतं. चला तर मग पाहुयात सोयाबीन खाण्याचे फायदे.

१. मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी सोयाबीन गुणकारी आहे.

२. हडांना बळकटी देण्यासाठी आणि मजबूती वाढविण्यासाठी सोयाबीन फायदेशीर आहे.

३. हृदयासंबंधित आजार दूर ठेवते.

४. वजन नियंत्रणात राहते.

६. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.

७. रक्तदाब नियंत्रणात राहतो.

८. निद्रानाश दूर होतो.

९. केसांची वाढ होते.

News English Summary: Soybeans are an important and protein rich dietary component. It also has many health benefits. Regular consumption of soybeans in the diet provides relief from bone weakness. It is important to keep fit and take special care of your face this summer. Soybeans will not only keep you healthy but also take care of your skin.

News English Title: Eating soybeans are beneficiary to our health news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x