Eating Walnuts Benefits | ब्लड प्रेशर आणि डायबेटिजवर गुणकारी अक्रोड | अधिक माहितीसाठी वाचा
Eating Walnuts Benefits| रोजच्या आहारात अक्रोड खाण्याचे बरेच फायदे आहेत, परंतु अक्रोड खाण्याचा योग्य मार्ग माहित असणे आवश्यक आहे. अक्रोडचे सेवन केल्याने मधुमेहामध्ये रक्तातील साखर नियंत्रण होते. वजन कमी करण्याच्या आहारामध्ये अक्रोडचे सेवन करणे फायदेशीर आहे. अक्रोड खाणे मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अक्रोडचे नियमित सेवन केल्यास हृदयरोगाचा धोका कमी होतो.अक्रोडचे शरीरातून कोलेस्टेरॉल कमी होण्यासाठी सेवन करावे.
आरोग्याच्या दृष्टीनेदेखील फायदेशीर :
सुकामेवा सहसा सर्व लोकांना आवडतोच. सुकामेवा खाण्यासाठी जितका चांगला आहे तितकाच तो आरोग्याच्या दृष्टीनेदेखील फायदेशीर आहे. सुक्यामेव्यातील एक म्हणजे अक्रोड. मेंदूसारखा दिसणारा हा सुकामेवा मेंदूसाठी खरोखरच फायदेशीर असतो. म्हणून स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अक्रोड खाण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. अक्रोड खाण्याचे आरोग्यासाठी कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊया.
ह्रदय विकाराचा धोका कमी होतो :
अक्रोडामुळे ह्रदय विकाराचा धोका कमी होतो.अक्रोडामध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे ह्रदयाचे कार्य सुरळीत चालण्यास मदत होते.अक्रोड खाण्यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो. अक्रोडामुळे बॅड कोलेस्ट्रॉल वाढत नाही ज्यामुळे तुम्हाला ह्रद विकार होण्याचा धोका कमी होतो.
मेंदूचे कार्य सुरळीत होते :
अक्रोड खाल्ल्याने मेंदूचे कार्य सुरळीत होते.अक्रोड हे फळ आकाराला मेंदूच्या आकाराप्रमाणे दिसते. पण एवढंच नाही दररोज अक्रोड खाण्यामुळे तुमच्या मेंदूचे कार्यदेखील सुरळीत होऊ शकते. अक्रोडामध्ये असे काही आरोग्यदायी घटक असतात ज्यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढू शकते.शिवाय निर्णयक्षमता, एकाग्रता आणि पटकन निराश होण्याची सवय यामुळे कमी होते. तुम्हाला त्वरीत उस्ताही वाटू लागतं. म्हणूनच जेव्हा तुम्हाला निराश आणि उदास वाटतं तेव्हा अक्रोड खाण्याची सवय लावा.
हाडांसाठी फायदेशीर:
अक्रोडमध्ये कॅल्शियम आणि जीवनसत्त्व डी असतं, ज्यामुळे हाडं मजबूत होतात. याशिवाय त्यात आढळणारा अल्फा लिनोलेनिक अॅसिड हा घटक हाडं मजबूत करण्यासदेखील मदत करतो. ज्यांना गुडघेदुखीच्या तीव्र वेदना आहेत त्यांनी नियमितपणे अक्रोड खावे.
अक्रोड वजन कमी करतं:
अक्रोड वजन कमी करण्याससुद्धा उपयुक्त आहे. सकाळी रिकाम्या पोटी अक्रोडचं सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते
रक्तदाब संतुलन:
दैनंदिन जीवनात प्रत्येक वयोगटातील लोकांना अनियमित दिनक्रम आणि चुकीच्या आहारामुळे रक्तदाब असंतुलनाची समस्या भेडसावत आहे. अक्रोड या समस्येमध्ये खूप फायदेशीर आहे. अक्रोड उच्च रक्तदाब समस्येवर मात करण्यास मदत करतं. अक्रोड हृदयाशी संबंधित धोका देखील कमी करण्यात उपयुक्त आहे.
स्मरणशक्ती मजबूत बनवते:
अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड आढळतात. हे मेंदूला सहजतेने कार्य करण्यास मदत करतात. बर्याच संशोधनात असं आढळलं आहे की अक्रोड खाण्याने मेंदूच्या कार्य करण्याच्या क्षमतेत सुधार येतो. तसंच स्मरणशक्ती देखील सुधारते.
अक्रोडमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते:
अक्रोड शरीरातील रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहे. त्यामध्ये प्रथिनांचे इम्युनोमोडायलेटरी प्रभाव असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास उपयुक्त मानले जातात.
अक्रोड तणाव दूर करतं, शांत झोप लागण्यास मदत होते:
अक्रोडमधील जीवनसत्त्व बी 6, ट्रायटोफन, प्रथिने आणि फॉलिक अॅसिड तणाव कमी करण्यास मदत करतात.त्यात आढळणारे ओमेगा 3 फॅटी ऍसिड मूड ठिक करण्यास मदत करतात आणि तणाव कमी झाला की शांत झोपही आपोआपच लागते.
मधुमेहातही फायदेशीर:
अक्रोडची पानं मधुमेहासाठी आयुर्वेदिक उपचार म्हणून वापरली जातात. एका संशोधनात असं दिसून आलं आहे की, अक्रोडच्या पानांमध्ये अँटी-डायबेटिक गुणधर्म असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होण्यास मदत होते. मधुमेह असलेल्या रुग्णांनी दररोज अक्रोड खावं.
गर्भवती महिलांसाठी आरोग्यदायी औषध:
अक्रोडमध्ये आढळणारे सर्व घटक गर्भवती महिलेसाठी आवश्यक आहेत. अक्रोडमध्ये अँटिकॉनव्हल्संट, न्युरोप्रोटिक्ट आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत, जे गर्भवती महिलांच्या वाढत्या शिशुसाठी फायदेशीर आहेत.
News Title: Eating walnuts in beneficial for health check details 18 June 2022..
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- EPFO Passbook | पगारदारांनो, तुम्ही EPF मधून किती वेळा पैसे काढले आहेत, आता तुम्हाला पेन्शन मिळेल का, नियम लक्षात ठेवा