23 February 2025 2:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती
x

Health First | एक्सपायरी डेट उलटून गेल्यानंतर औषधं घेतल्यास काय होईल ? - नक्की वाचा

Expired medicine effect

मुंबई, १७ जुलै | औषधं खरेदी करण्यापूर्वी त्याची एक्सपायरी डेट चेक करणे महत्त्वाचे आहे आणि ते आपण करतो. परंतु, ताप, सर्दी, खोकला यासाठी विकत घेतलेल्या पेनकिलर्स आपण वर्ष-दोन वर्ष वापरत नाही. म्हणून अशा गोळ्या किंवा सिरप घेताना एकदा नाहीतर दोनदा त्याची एक्सपायरी डेट चेक करायला हवी. अनेक लोक या गोष्टीकडे गंभीरपणे बघत नाहीत आणि या गोळ्या घेतल्यावर काय होणार आहे, असे कुतुहूल त्यांच्या मनात असते. एक्सपायरड गोळ्या घेतल्यास (नकळत) काय दुष्परिणाम होऊ शकतात, यावर मुंबईतील तज्ज्ञ फिजिशियन डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.

कोणतंही औषधं असो, प्रत्येक औषधाचा स्वतःचा असा स्टाबिलीटी पिरियड असतो. तसंच औषधाची मार्जिन टेस्ट केली जाते. उदा. म्हणजेच जर औषधाचा स्टाबिलीटी पिरियड वर्षभराचा असेल तर त्याची एक्सपायरी डेट ६ महिन्यांचीच दिली जाते. म्हणून जर तुम्ही एक्सपायर्ड गोळी घेतलीत तर कदाचित आरोग्यावर काहीही दुष्परिणाम होणार नाहीत. कारण त्याचा स्टाबिलीटी पिरियड संपलेला नसतो. तसंच औषध दोन, तीन किंवा पाच वर्षापर्यंत स्टेबल राहू शकतं. परंतु, ते औषधाच्या प्रकारावर व निर्मितीवर अवलंबून आहे. एक्सपायर्ड औषध घेतल्याने ते आजारावर परिणामकारक ठरणार नाही. कारण त्याची क्षमता कमी झालेली असेल. कारण काळानुसार औषधातल्या केमिकल कंपाऊंडची केमिकल चेंजेस करण्याची क्षमता कमी होते. जे हानिकारक ठरू शकते किंवा नाही.

केमिस्टकडून औषधं विकत घेताना एक्सपायरी डेट गेलेली औषधे मिळण्याची शक्यता फार कमी आहे. कारण एक्सपायर्ड प्रॉडक्स कंपनीला परत पाठवली जातात आणि त्याबदल्यात कंपनी नवीन औषधं पाठवते. त्याचबरोबर ड्रग अॅडमिनिस्ट्रेटर एक्सपायरी डेट जवळ आलेल्या औषधांची यादी काढतो आणि ती वेळेत बदलून घेतली जातात. त्यामुळे एक्सपायर्ड औषधं घेण्याची चूक तुमच्याकडून होण्याची शक्यता अधिक आहे. एक्सपायर्ड औषधं घेतल्याने डोकेदुखी, मळमळ, उलट्या, पोटात दुखणे हे दुष्परिणाम होतात.

एक्सपायर्ड गोळ्या घेतल्यानंतर काय करावे?
चुकून किंवा नकळत एक्सपायर्ड गोळ्या घेतल्यास आरोग्यावर होणारे दुष्परिणाम जाणण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या शरीरावर त्याचा काही परिणाम झाला आहे का, हे जाणून घेण्यासाठी डॉक्टर ब्लड टेस्ट करतील. त्याचबरोबर लिव्हर फंगशन टेस्ट आणि किडनी फंगशन टेस्ट करण्याचा सल्ला देतील. (हे औषधाच्या प्रकारावर अवलंबून आहे) त्यामुळे किडनी, लिव्हरला काही हानी पोहचली आहे का, ते समजेल. उपचार करण्यापेक्षा काळजी घेणे केव्हाही योग्यच. म्हणून कधीही औषध घेण्यापूर्वी न विसरता त्याची एक्सपायरी डेट चेक करा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title:  Effects of expired medicine in Marathi news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x