3 December 2024 10:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

Health First | उपाशी पोटी व्यायाम करणे योग्य की अयोग्य? - नक्की वाचा

Exercise with empty stomach side effect

मुंबई, ०४ ऑगस्ट | जिममध्ये वर्कआउट करताना खाण्यापिण्यावर विशेष लक्ष द्यावे लागते. वर्कआउ करणारे लोक वर्कआउट पूर्वी किंवा त्यानंतर खाणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्हाला माहितीच असेल की, योग्य वेळी योग्य आहार घेतल्यास तुम्हाला वर्कआउट केल्याचा सुद्धा रिजल्ट मिळेल. प्रोफेशनली असे म्हटले जाते की, कोणतेही वर्कआउट करण्यासाठी डाएट करणे गरजेचे आहे. पण संशोधकर्त्यांच्या द्वारे जो रिसर्च करण्यात आला आहे त्यामध्ये असे म्हटले आहे की, ज्या लोकांनी व्यायाम करण्यापूर्वी उपाशी राहतात त्यांच्यामध्ये 20 टक्के चरबी कमी होते. म्हणजेच उपाशीपोटी व्यायाम करणे फायदेशीर आहे. यामुळे अधिक चरबी कमी करता येऊ शकते.

खासकरुन जेव्हा तु्म्ही सकाळी उठल्यानंतर व्यायाम करणार असाल तर तो एका तासापेक्षा अधिक वेळ करु नका. कारण शरीराला उर्जेचे गरज असते. ही उर्जा शरीरातील ग्लाइकोजेनपासून आपल्याला मिळते. हे ग्लायकोजन आपल्याला ग्लूकोज पासून भेटते. जे शरीरातील मासपेशी आणि लिव्हरमध्ये जमा असतात. जेव्हा एखादा वर्कआउट कराल तेव्हा त्यावेळी शरीराला उर्जेची गरज असते.

नॉर्थथंब्रिया युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी वर्कआउट आणि खाण्यापिण्यामधील संबंध जाणून घेण्यासाठी एक रिसर्ज केला आहे. त्यामधून असे समोर आले आहे की, रात्री उपाशी पोटी राहणारे सकाळी वर्कआउट करत असतील तर ते दिवसभरात खुप खातात. या व्यतिरिक्त रिसर्चमध्ये हे सुद्धा समोर आले की, असे केल्यास एकूण किती फॅट बर्न होतात.

रिसर्च मधून असे समोर आले की, सर्व लोकांनी व्यायाम योग्य पद्धतीने केला. त्यांनी त्यासाठी शरीरातील उर्जेचा वापर केला. तसेच सकाळी व्यायाम ज्या लोकांनी केला त्यांनी सुद्धा कोणतीही अतिरिक्त उर्जा वापरली नाही. पण त्यांना भूक अधिक लागली. रिसर्च मधील महत्वपूर्ण निष्कर्ष असा होता की, ज्यांनी व्यायामापूर्वी काहीच खाल्ले नाही त्यांच्यामध्ये 20 टक्के अधिक फॅट बर्न झाले. म्हणजेच उपाशी पोटी व्यायाम करणे अधिक फायदेशीर आहे.

उपाशीपोटी व्यायाम केल्यास फॅट लवकर कमी होते, असा गैरसमज अनेकांमध्ये असतो. व्यायाम सुरू करण्यापूर्वी शरीरात ग्लुकोज असणे खूप आवश्यक असून शरीरातील ग्लुकोज संपले तर फॅट कमी करणारी प्रक्रियाच काम करत नाही. त्यामुळे व्यायाम करण्यापूर्वी थोडा नाष्टा किंवा हलका प्रथिनयुक्त आहार घेणे आवश्यक असल्याचे आहारतज्ज्ञ सांगतात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Exercise with empty stomach side effects in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x