22 December 2024 8:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

दोन डोसमधील अंतर वाढवल्याने संक्रमणाचा धोका जास्त | अमेरिकन तज्ज्ञ डॉ. एन्थनी फौची यांचा दावा

 Dr Anthony Fauci

नवी दिल्ली, १२ जून | कोरोना व्हॅक्सिनच्या डोसमध्ये गॅप संदर्भात अमेरिकेचे महामारी एक्सपर्ट डॉ. एन्थनी फौची यांनी चेतावणी दिली आहे. त्यांच्यानुसार, व्हॅक्सिनच्या दोन डोसमधील काळ वाढवल्याने लोकांमध्ये इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो. ब्रिटनमध्ये असे आढळून आले आहे. डॉ. फौची यांनी NDTV च्या एका मुलाखतीमध्ये हे सांगितले.

भारत संदर्भात फौचि यांचे दावा यासाठी महत्त्वाचा आहे कारण, सरकारने मागील महिन्यातच कोविशील्डच्या दोन डोसमधील गॅप वाढवून 12-16 आठवडे केला आहे. यापूर्वी हा गॅप 6 ते 8 आठवडे होता. यापूर्वी मार्च महिन्यातही हा गॅप 28 दिवसांवरून 6 ते 8 आठवडे करण्यात आला होता. सरकारचे म्हणणे आहे की, दोन डोसमधील गॅप वाढवल्याने व्हॅक्सिनचा प्रभाव वाढेल.

परंतु फौची यांच्यानुसार, व्हॅक्सिन डोसमध्ये गॅप वाढवण्यापेक्षा शेड्युलनुसार आपण चालावे. यासोबतच ते असेही म्हणाले की, व्हॅक्सिनचा पुरवठा कमी असल्यास गॅप वाढवणे आवश्यक होते. कोरोनाचा जास्त संक्रामक व्हेरियंट डेल्टा विषयी फौची म्हणाले की, या व्हायरसला नष्ट करण्यासाठी लोकांना लवकारातल्या लवकर व्हॅक्सिन देणे आवश्यक आहे. डेल्टा व्हेरियंट सर्वप्रथम भारतात आढळून आला होता आणि याच व्हेरियंटमुळे भारतात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे सांगण्यात येते. एक्स्पर्टसनुसार हा व्हेरियंट 40-50% जास्त संक्रामक आहे.

 

News Title: Extending vaccine intervals may leave people vulnerable to corona variants US expert Dr Anthony Fauci news updates.

हॅशटॅग्स

#Intern(1)#International(41)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x