26 December 2024 5:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK EPFO Pension Alert | खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वर्षात पेन्शन वाढणार, जाणून घ्या फायद्याची अपडेट IRFC Share Price | रेल्वे स्टॉक IRFC सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना असावी तर अशी, महिना SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 5 लाख रुपये परतावा Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनी बाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांकडून रेटिंग सह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: SUZLON
x

Health First | पापड सुद्धा आहेत आरोग्यदायी | पण त्याआधी ही माहिती समजून घ्या

Eating Papad Benefits

मुंबई, ०९ जून | भारतीय संस्कृती मध्ये अनेक पद्धतीचे लोक राहत असतात आणि भारतीय खाद्य संस्कृती ही वेगवेगळ्या पद्धतीची असते आणि अनेक पदार्थांचा समावेश भारतीय खाद्य संस्कृतीत असतो. आपल्या देशांतील कित्येक भागांत दररोज न चुकता शाकाहारी जेवणाबरोबर पापड खाण्याची परंपरा पूर्वीपासूनच चालत आली आहे. पण सर्वात जास्त पापड हे राजस्थान मध्ये खाल्ले जातात ! पण देशभरात सर्वात जास्त आवडणारे आणि लोक ज्यांचे पापड चवीचवीने खातात ते राज्य म्हणजे गुजरात.

देशभरात लग्न किंवा इतर समारंभामध्ये पंच पक्वानांचे जेवण असते. न चुकता सलाड व पापड हे असतातच. खरं तर लोणचं आणि पापड हे भोजनासोबत चवीला खाल्ले जातात. म्हणजे लोणचं आणि पापड हे आपण साईड डिश म्हणून खातो. यामुळे जेवणाची मजाच वेगळी असते. पण फक्त चवीसाठी खाल्ले जाणारे पापड आरोग्यासाठीही तितकेच खास असतील हे तुम्हाला कधी वाटलं तरी होतं का? गरम गरम भातावर साजूक तूप, डाळ आणि सोबत कुर्रम कुर्रम पापड असा बेत असल्यावर कोण नाही म्हणेल खायला ? सर्वांच्या थाळीतील हक्काची एक जागा ही पापडाने पटकावलेली असते. तुम्ही देखील पापड खाता ना ? मग जाणून घ्या पापड खाण्याचे फायदे

हे आहेत पापड खाण्याचे फायदे:

पचन क्रिया सुधारते:
बरेच लोक जेवणाच्या शेवटी आणि जेवणासोबत पापड खातात. असं यासाठी केलं जातं कारण पापड पचनक्रियेसाठी अत्यंत लाभदायक मानला जातो. जेव्हा आपण आहारात जास्त कॅलरीज असलेले पदार्थ, तळलेले पदार्थ किंवा मसालेदार पदार्थ खात असतो. तेव्हा पापड ते जड अन्न पचवण्यासाठी आपल्या पचनकेंद्राची मदत करते. कारण पापड हे विविध डाळींपासून बनवले जातात. डाळींमध्ये पोषक तत्वांचीही भरपूर मात्रा असते.

जाणून घ्या पापडचे प्रकार आणि लाभ:
आजकाल पापड हे फक्त स्वादासाठीच नाही तर आरोग्याच्या दृष्टी हेतू ही बनवले जातात. म्हणजेच स्वादासोबतच त्यातील घटकांचे आरोग्याला कसे लाभ होतील यावर विशेष लक्ष दिलं जातं.

1. मार्केटमध्ये लाल-तिखटाचे पापड, जिरा पापड, ओवा पापड, लवंगाचे पापड हे देखील उपलब्ध असतात.
2. लाल-तिखटांच्या पापडांना वेगळं केलं तर बाकीचे सर्व पापड आरोग्यास लाभदायक ठरतात आणि जेवण पचवण्यास मदत करतात.

जाणून घ्या पापड तळून खावेत की भाजून ?
अनेकांच्या मनात एक प्रश्न येत असेल की पापड खाण्याची योग्य पद्धत कोणती आहे? म्हणजे आपण पापड भाजून खावेत की तळून तर जेव्हा तुम्हाला फक्त पापड स्वादासाठी खावेसे वाटले तेव्हा तुम्ही ते तळून खावू शकता. आणि आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक ठरणा-या पद्धतीने तुम्हाला जर पापड खायचे असतील तर तुम्ही ते भाजून खाल्लेले योग्य ठरतील. या भाजलेल्या पापडांवर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लिंबू, चाट मसाला टाकून तुम्ही खाऊ शकता. असा मसालेदार पापड स्वादिष्टही असतो आणि आरोग्यदायीही!.

 

News English Summary: There are many ways of living in Indian culture and Indian food culture is of different ways and many foods are included in Indian food culture. In many parts of our country, the tradition of eating papad with a vegetarian meal every day has been going on for a long time. But most papads are eaten in Rajasthan! But Gujarat is the most loved and popular state in the country.

News English Title: Fact about Papad connection with health news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x