Health First | झटपट केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय | वाचा सविस्तर
मुंबई, २९ मे | आपले केस लांबसडक, चमकदार आणि सुंदर असावेत असं कोणाला वाटत नाही. लहान केस लवकर वाढावेत आणि सुंदर दिसावेत म्हणून आपण खूप उपाय करत असतो. कधी केसांना तेल लावून ठेवतो तर कधी पार्लरमध्ये जाऊन महाग पॅकेज खरेदी करतो. पण त्यानंतरसुद्धा आपले केस आपल्याला हवे तसे लांबसडक होतातच असं नाही. जर आम्ही तुम्हाला सांगितलं की, हे सर्व न करताही केस लांब करता येऊ शकतात तर? आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. आपल्या घरीच असे काही उपाय आहेत, ज्यामुळे केस महिनाभरात लांबसडक वाढण्यास मदत होते. फक्त त्यासाठी तुम्हाला योग्य केस वाढीसाठी उपाय करण्याची गरज आहे. हे उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आणि ते तुम्ही घरच्याघरी नक्की करून पाहा.
1. केसांच्या वाढीसाठी बायोटिन्स:
काय गरेजेचं आहे
- 2-3 बायोटिन्सच्या गोळ्या
- ऑलिव्ह ऑईल किंवा नारळाचं तेल
तुम्ही काय करायला हवं?
- गोळ्यांची पावडर करून घ्या आणि असलेल्या तेलामध्ये मिक्स करा
- हे मिक्स केलेलं मिश्रण तुम्ही तुमच्या केसांच्या मुळांपासून लावा आणि रात्रभर हे तसंच लावून ठेवा
- सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे तुमचे केस धुऊन टाका
किती वेळा करू शकता?
आठवड्यातून दोन वेळा तुमच्या केसांवर हा प्रयोग तुम्ही करू शकता.
याचा उपयोग कसा होतो?
बायोटिन्समध्ये हिरव्या पालेभाज्यांमधील विटामिन बी चं प्रमाण जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे केसगळती थांबवण्यासाठी याची मदत होते. याचा वापर केल्यामुळे तुमचे केस अधिक जाड आणि निरोगी होतात. तसंच केसगळतीची समस्या असल्यास, निघून जाते.
2. केसांच्या वाढीसाठी विटामिन्स
बायोटिन्स हा विटामिन्सचा एक प्रकार आहे, ज्यामुळे केसगळती थांबते अशीच अनेक विटामिन्स आहेत ज्यामुळे केसांची वाढ होण्यासाठी मदत होते. तुमच्या केसांचा निरोगीपणा जपण्यासाठी ही विटामिन्स मदत करतात. तुमच्या केसांचा ताण विटामिन्स ई कमी करण्यासाठी मदत करते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विटामिन ई मुळे केसांवर खूप चांगला परिणाम होतो. इतकंच नाही तर हे ट्रॉपिकल लाईफ सायन्सेस रिसर्च जर्नलने केलेल्या अभ्यासातून सिद्ध झालं आहे. दुसरं विटामिन जे केसांसाठी सर्वात चांगलं काम करतं ते म्हणजे विटामिन सी. केसांच्या मुळांमध्ये होत असणारे डेड सेल्स संपवण्याचं काम हे विटामिन सी करतं. यामुळेदेखील केसांच्या वाढीला मदत होते. तर विटामिन्स सी च्या गोळ्या घेतल्यामुळे केसांचे मूळ मजबूत होण्यास मदत मिळते.
3. केसांच्या वाढीसाठी कांद्याचा रस:
काय गरेजेचं आहे
- 2 लाल कांदे
- कापूस
तुम्ही काय करायला हवं?
- कांदे व्यवस्थित कापून घ्या
- कापलेल्या कांद्याचा मिक्सरमधून ज्युस काढून घ्या
- अतिशय काळजीपूर्वक कांद्याचा रस तुमच्या केसांना मुळापासून लावा तेही कापसाच्या सहाय्याने. अजिबात केसावर रस थापू नका आणि साधारण 15 मिनिट्स लावून ठेऊन द्या
- शँपूने त्यानंतर केस धुवा
किती वेळा करू शकता?
याचा निकाल नक्की कसा लागतोय ते पाहून आठवड्यातून एक वेळ तुम्ही हा प्रयोग करून पाहू शकता.
याचा उपयोग कसा होतो?
कांद्याच्या रसामध्ये असलेल्या सल्फरमुळे केसांच्या वाढीला वेग येतो. केस वाढवण्यासाठी हा सर्वात जुना आणि अगदी योग्य उपाय आहे. कांदा केसांप्रमाणे संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर असल्यामुळे कांदा खाण्याचे फायदे तुम्हाला माहीत असायला हवे.
4. केसांच्या वाढीसाठी कोरफड जेल:
काय गरेजेचं आहे
कोरफड
तुम्ही काय करायला हवं?
कोरफड फाडून घेतल्यानंतर त्यातील जेल काढा
त्यातील जेल तुमच्या केसांना मुळापासून लावा
एक तास हे असंच राहू द्या आणि नंतर शँपूने तुमचे केस धुवा
किती वेळा करू शकता?
आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही हा प्रयोग करून पाहू शकता.
याचा उपयोग कसा होतो?
तुमच्या मुळातील डेड सेल्स काढून टाकण्यात कोरफडीचा खूप चांगला उपयोग होतो. कोरफडीमध्ये केसांसाठी आवश्यक अनेक पोषक तत्व असतात आणि त्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते.
योग्य आहार:
केस लवकर वाढवण्यासाठी पोषक आहार घेणे आवश्यक आहे. केसांच्या आरोग्यासाठी आहारात प्रोटिन्स, व्हिटॅमिन-E, झिंक यासारखे पोषकघटक असणारे पदार्थ घेणे आवश्यक असते. यासाठी आहारात दूध व दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मांस, मासे, सुखामेवा (बदाम, अक्रोड इ.), मोड आलेली कडधान्ये यांचा समावेश करावा. याशिवाय आहारात पालेभाज्या, फळभाज्या, विविध फळे यांचाही समावेश असावा.
हेअर प्रॉडक्ट्सचा अतिवापर टाळावा:
केमिकलयुक्त हेअर प्रॉडक्ट, स्ट्रेटनर्स, शॅम्पू, कलर्स यांचा अतिवापरामुळे केस डॅमेज होत असतात. दररोज केसांना शॅम्पू केल्यामुळे केसांच्या मुळातील (स्कैल्पमधील) नॅचरल ऑइल निघून जात असते. वास्तविकता केसांच्या मुळात असणारे ऑइल हे केसांच्या आरोग्यासाठी खूप उपयोगी असते. त्यामुळे दररोज केसांना शॅम्पू करू नये. आठवड्यातून 3 ते 4 वेळाच शॅम्पूचा वापर करावा. तसेच शॅम्पू केल्यानंतर केस तुटू नयेत यासाठी कंडिशनर जरूर करावे.
अंड्याचा हेअरमास्क:
केसांची वाढ लवकर होण्यासाठी अंड्याच्या हेअर मास्कचा वापर आठवड्यातून एकदा करावा. यासाठी दोन अंडे फोडून त्यातील पिवळा भाग काढून टाकावा. अंड्यातील पांढऱ्या भागाचा थर केसांना लावावा. 15 मिनिटांनी केस धुवून घ्यावेत यामुळे केस लवकर वाढतात तसेच ते मजबूत व घनदाट ही होतात. कारण अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये प्रोटीन, जस्त, सल्फर, लोह, फॉस्फरस आणि आयोडीन यासारखी केसांसाठी उपयुक्त असणारी पोषकतत्वे असतात.
खोबरेल तेल, लसूण व कांदा:
वाटीभर खोबरेल तेलात तीन चमचे एरंडेल तेल मिसळून त्यात 4-5 लसूण पाकळ्या व थोडा कांदा बारीक करून घालावा. हे मिश्रण मंद आचेवर पाच मिनिटे गरम करून घ्यावे. तेलाचे हे मिश्रण थोडे कोमट झाल्यावर केसांच्या मुळाशी लावावे. या तेलाच्या नियमित वापराने केस गळणे कमी होते, केस घनदाट होतात तसेच गळलेले केस नवीन येऊन त्यांची जलदपणे वाढ होण्यास मदत होते.
News English Summary: No one wants their hair to be long, shiny and beautiful. We do a lot of remedies to make short hair grow faster and look beautiful. Sometimes he puts oil on his hair and sometimes he goes to a parlor and buys an expensive package. But even then, your hair does not always grow as long as you would like.
News English Title: Fast hair growth home remedies health news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY