Health First | सौंदर्य खुलवण्यासाठी फायदेशीर मेथीचे दाणे
मुंबई, १६ फेब्रुवारी: सौंदर्य खुलवण्यासाठी अनेक जण सौंदर्यप्रसाधनांचा भरपूर वापर करतात. मात्र सौंदर्यप्रसाधनांपेक्षा योग्य आहार, व्यायाम आणि नैसर्गिक घटकांनीच सौंदर्य अधिक खुलतं असं नेहमीच आपण ऐकत आलोय. ब्युटी एक्स्पर्टही जास्तीत जास्त नैसर्गिक घटकांचा वापर करण्याचा सल्ला देतात. त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असलेला नैसर्गिक घटक म्हणजे मेथीचे दाणे होय.
मेथीच्या दाण्यात लोह, तांबे, फास्फरस यांसारखी खनिजे, ब ६ आणि क सारखी जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात जी त्वचेच्या अनेक समस्येवर रामबाण उपाय म्हणून काम करतात. चला तर पाहू मेथीच्या दाण्याचे काही फायदे.
काळे डाग आणि मुरुम:
चेहऱ्यावरचे काळे डाग आणि मुरुम दूर करण्यासाठी मेथी फायदेशीर आहे. यासाठी मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भीजत ठेवा. दुसऱ्या दिवशी त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट फेसपॅक म्हणून १५ मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि नंतर चेहरा धुवून टाका. यामुळे मुरुम, पुरळ निघून जाण्यास मदत होते.
नैसर्गिक स्क्रब:
मेथीच्या दाण्यांचा नैसर्गिक स्क्रब म्हणूनही वापर करण्यात येतो. मेथीचे दाणे, कच्च दूध, ओट्स आणि गुलाबजल एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा. या पेस्टनं चेहऱ्यावर हलका मसाज करा. नंतर कोमट पाण्यानं फेसपॅक धुवून टाका.
चेहऱ्याला नैसर्गिक उजळपणा देण्यासाठी उपयुक्त:
मेथीच्या दाण्याचा उपयोग चेहऱ्याला नैसर्गिक उजळपणा देण्यासाठीही केला जातो. मेथीच्या दाण्याची पावडर, दूध किंवा दह्यात मिक्स करा. हे पॅक चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्याची त्वचा उजळण्यास मदत होते.
केसगळतीपासून बचाव:
केसगळतीच्या समस्येपासून मेथीचे दाणे बचाव करतात. गरम खोबरेल तेलात मेथीचे दाणे रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर हे तेल दुसऱ्यादिवशी केसांच्या मुळांना लावा यामुळे केसगळती कोंड्याच्या समस्येपासून सुटका मिळते.
News English Summary: Many people use a lot of cosmetics to open up the beauty. But we have always heard that beauty is more open only with proper diet, exercise and natural ingredients than with cosmetics. Beauty experts also recommend using as many natural ingredients as possible. Fenugreek seeds are a natural ingredient for skin and hair health.
News English Title: Fenugreek seeds health benefits news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY