Health First | हृदयविकाराचा झटका आल्यास ‘हे’ उपाय करा आणि जीव वाचवा | वाचा आणि शेअर करा

मुंबई, २० जून | एका संशोधनादरम्यानच्या सर्व आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, भारतात हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे, यात तरुण मंडळींचाही समावेश आहे. वास्तविक, बऱ्याच लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची सुरुवातीची लक्षणे समजत नाहीत आणि रूग्णालयात नेईपर्यंत जीव वाचवण्याइतके प्राथमिक उपचार त्यांना मिळत नाहीत. यामुळे, बर्याच वेळा रुग्णालयात पोहोचेपर्यंत रुग्णाची प्रकृती गंभीर बनते आणि कधीकधी मृत्यू देखील होऊ शकतो. आपल्या कुटूंबाला कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटनेपासून वाचवण्यासाठी हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे आणि प्रथमोपचार संबंधित आवश्यक माहिती जाणून घेतलीच पाहिजे.
‘ही’ असू शकतात लक्षणे:
छातीत जडपणा किंवा तीव्र वेदना, छातीत दुखणे, हात, जबडा, मान, पाठ आणि ओटीपोटात दुखणे, घाम येणे, चक्कर येणे किंवा चिंताग्रस्त होणे, श्वास लागणे, मळमळणे आणि खोकला येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अशक्तपणा वाटणे इत्यादी लक्षणे दिसू शकतात. मात्र कधीकधी वेदना खूपच जोरात होतात, तर कधीकधी सौम्य असतात किंवा जाणवतच नाहीत. परंतु, इतर लक्षणांसह आपण त्याचा आधीच अंदाज लावू शकता
हृदयविकाराचा झटका जर कुणाला आला तर अजिबात घाबरून न जाता हे पाच उपाय जर केले तर तुम्ही रुग्णाचा जीव वाचू शकता. महत्वाची गोष्टी म्हणजे रुग्णवाहिका ताबडतोब बोलवा. बहुतांश रुग्णवाहिकांमध्ये सर्व सुविधा उपलब्ध राहत असल्यामुळे रुग्णावर ताबडतोब उपचार सुरू केले जाऊ शकतात.
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णाला मळमळते. त्या रुग्णाला अशावेळेस एका कडेवर वळवा. त्याला असे केल्याने मोकळा श्वास घेता आल्याने त्याची तिव्रता कमी होते. तसेच फुप्फुसांना नुकसान होत नाही. मानेजवळ रुग्णाच्या हात ठेवून त्याचा पल्स रेट चेक करा. तो जर 60 ते 70 पेक्षा जास्त असेल तर रक्तदाब झपाट्याने वाढतो आणि रुग्णाची प्रकृती नाजूक आहे असे समजून तात्काळ रुग्णालयात हलवा.
कमी जास्त पल्स रेट होत असेल तर रुग्णाला झोपवून त्याचे पाय वर उचला. यामुळे पायाकडील रक्तप्रवाह त्याच्या हृदयाकडे वळतो. असे केल्याने त्याला बऱ्यापैकी आराम मिळतो. रुग्णाला झोपवल्यानंतर त्याचे कपडे जरा सैल करा. अशा परिस्थितीत त्याला जास्त हालचाल करायला लावू नये. रुग्णाने गाडी चालवता कामा नये, तसेच जिने चढणे-उतरणे टाळावे. असे काही घडत असेल तर रुग्णाभोवती जास्त गर्दी होणार नाही याची काळजी घ्या. पुरेशी हवा त्याला मिळेल नीट श्वास घेता येईल येची काळजी घ्या. अॅस्पिरीन किंवा सॉरबिट्रेट यापैकी कोणतिही एक गोळी रुग्णाला द्यावी.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.
News Title: First aid treatment for saving life during heart attack health news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB