20 April 2025 1:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

Health First | अनेक महिलांना माहिती नाही | म्हणून रात्री झोपताना ब्रा काढून झोपावे

sleeping without Bra

मुंबई, ११ जून | बऱ्याच स्त्रियांना रात्री झोपताना ब्रा घालून झोपणे अस्वस्थ वाटते. त्या मुळे त्या ब्रा काढून झोपतात. काहींचा असा विश्वास आहे की ब्रा घालून झोपल्यानं त्यांच्या शरीराची आकृतीमध्ये बिघाड होतो.काही स्त्रिया असे मानतात ब्रा घालून झोपल्यानं आरोग्याशी निगडित तक्रारी सुरू होऊ लागतात. चला तर मग जाणून घेऊ या की अशा परिस्थितीत काय करावं.

तज्ज्ञांच्या मते रात्री टाईट ब्रा घालून झोपणं योग्य नाही. यामुळे तुमच्या शरीराला हानी पोहचू शकते. रात्री झोपताना ब्रा घालणं योग्य की अयोग्य? याबद्दल अनेकांचे दुमत आहे. तज्ज्ञांचे याबद्दल काय मत आहे हे आपण जाणून घेउया. तज्ज्ञांच्या मते रात्री टाईट ब्रा घालून झोपणं योग्य नाही. यामुळे तुमच्या शरीराला हानी पोहचू शकते. याची नक्की कारणं काय आहे ते आपण पाहू;

आजकाल अंडरवायर ब्रा खूपच ट्रेंड मध्ये आहे. परंतु कदाचित आपल्याला हे माहिती नाही की अशा प्रकारच्या ब्रा रक्त परिसंचरणावर वाईट परिणाम करतात. ह्याचा वायर स्तनाभोवतीच्या स्नायूंना संकुचित करतात आणि ह्याचा थेट परिणाम मज्जासंस्थेवर पडतो.

ब्रा ही आपल्या शरीरावर उत्तम प्रकारे फिट बसते ज्यामुळे ह्याला जास्त काळ घातल्यावर डिस्कलरेशन, पिगमेंटेशन आणि गडद डाग येऊ शकतात.म्हणून झोपताना ब्रा काढून झोपणे चांगले आहे. तज्ज्ञांच्या मते ज्या स्त्रियांचे ब्रेस्ट किंवा स्तन जड असतात त्यांनी रात्री ब्रा घालून झोपावं ज्यामुळे त्यांचे स्तन सैल होऊ नये. जर आपण देखील ब्रा घालून झोपू इच्छिता तर हलकी आणि सैल असलेली ब्रा निवडा. जेणे करून ब्रेस्टच्या भोवती घट्ट होता कामा नये.

अहवालानुसार रात्री ब्रा घालून झोपल्यानं बुरशीजन्य संसर्ग होऊ शकत. आपण जेव्हा दीर्घ काळ ब्रा घालता तर ब्रेस्ट किंवा स्तन मोकळेपणाने श्वास घेऊ शकत नाही आणि ह्याच्या भोवती बेक्टेरिया सहजपणे वाढतात. ब्रा या साठी घालतात की आपले शरीर आकारात राहील, परंतु 24 तास ब्रा घातल्यानं आपल्या शरीराचा आकार बिघडू शकतो.

ब्लड सर्क्युलेशन:
ब्रा घालून झोपण्याचं सर्वात मोठं नुकसान म्हणजे तुमचं ब्लड सर्क्युलेशन नीट होत नाही. शरीर निरोगी राहण्यासाठी ब्लड सर्क्युलेशन होणं ही सर्वात महत्त्वाची प्रक्रिया आहे. तुम्हालादेखील जाणवलं असेल की, जेव्हा तुम्ही ब्रा काढून झोपता तेव्हा तुम्हाला अतिशय हलकं हलकं वाटतं. कोणतंही बंधन तुम्हाला वाटत नाही. त्यामुळे ब्रा न घालता झोपण्याचा हा एक महत्त्वाचा फायदा आहे की, तुमची ब्लड सर्क्युलेशन प्रक्रिया व्यवस्थित होते.

कॅन्सर होण्याची भीती:
तुम्ही रात्री झोपताना नेहमी टाईट ब्रा घालून झोपत असाल तर, तुमच्या स्तनांमध्ये कॅन्सरची गाठ होण्याची भीती वाढते. एका रिसर्चमध्ये सांगितल्याप्रमाणे, ही गोष्ट सिद्ध झाली आहे. त्यामुळे सहसा रात्री झोपताना ब्रा घालून झोपू नये. पण खूप मोठे स्तन असणाऱ्या महिलांनी अगदी सैल ब्रा घालून झोपलं तर चालेल. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.

रॅशेस अथवा खाजेची समस्या:
दिवसभर अथवा रात्रभर ब्रा घालण्यामुळे त्याठिकाणी रॅशेस अथवा खाज वाढण्याचा धोका जास्त असतो. ब्रा चं इलॅस्टिक घट्ट असल्यामुळे या गोष्टी घडत असतात. टाईट ब्रा तुमच्या त्वचेवर चिकटते आणि त्यामुळे या जागी जळजळ आणि खाज येते. त्यामुळे रात्रभर ब्रा घालू नये. अगदीच तुम्हाला सवय असल्यास, रात्री झोपताना स्पोर्ट्स ब्रा घालून झोपावं त्यामुळे तुमची रॅशेसची समस्या कमी होईल.

झोप पूर्ण न होणं:
तुम्हाला रात्री टाईट ब्रा घालून झोपल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. असं झालं तर अर्थातच त्याचा परिणाम तुमच्या झोपेवर होत असतो. तुमची झोप मध्येमध्ये तुटते आणि झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे घट्ट ब्रा घालून झोपण्याचा प्रयत्न करू नये.

कपड्याशिवाय झोपणं आहे फायदेशीर:
एका सायन्स रिसर्चनुसार सांगण्यात आलं आहे की, आपल्यापैकी केवळ 30% लोक कपड्यांशिवाय झोपतात आणि बाकी लोक अंडरवेअर घालून झोपण्याला प्राधान्य देतात अथवा आरामदायी पायजमा घालतात. पण तुम्हाला माहीत आहे का? कपड्यांशिवाय झोपण्याऱ्या लोकांचा कपडे घालून झोपणाऱ्या लोकांपेक्षा जास्त फायदा बाहेर येऊ शकत नाही. यामुळे झोपण्यामध्ये तुम्हाला त्रास होतो. पण जेव्हा तुम्ही कपड्यांशिवाय झोपता तेव्हा शरीराचं तापमान कमी होतं. यामुळे तुम्हाला अनेक फायदे होतात.

 

News Summary: Many women find it uncomfortable to wear a bra while sleeping at night. Because of that, they take off their bras and sleep. Some people believe that sleeping with a bra spoils their body shape. Some women believe that sleeping with a bra causes health problems. So let’s find out what to do in such a situation. According to experts, it is not advisable to sleep at night wearing a tight bra.

News Title: For women’s sleeping without Bra is good for health news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या