21 November 2024 9:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Gastro symptoms and Treatment | 'गॅस्ट्रो' त्रासदायक आजार ठरू शकतो | लक्षण व उपचार - नक्की वाचा

Gastro symptoms and treatment

मुंबई, २१ ऑगस्ट | गॅस्ट्रो हा आजार पचनसंस्थेतून निर्माण होणारा आजार आहे. ज्यामध्ये पोटातील आतड्यांना सूज येऊन रुग्णाला जुलाब, उलट्या, पोटदुखी, ताप येणे असे त्रास होतात. पावसाळ्यात हा आजार होण्याची दाट शक्यता असते. जर आहे आजार बळावला तर शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते आणि त्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो.

‘गॅस्ट्रो’ त्रासदायक आजार ठरू शकतो, लक्षण व उपचार (Gastro symptoms and treatment information in Marathi) :

गॅस्ट्रोची काही कारणं आहेत जसे की सॅल्मोनेला ,शिंगेला यासारखे विषाणूच्या इन्फेकशनमुळे गॅस्ट्रोची लागण होतेय. तसेच दूषित पाण्यामुळे याचा फैलाव होऊ शकतो. दूषित आहार, उघड्यावरचे खाणे आणि पाणी प्यायल्यामुळे हा आजार होऊ शकतो. गॅस्ट्रोची काही लक्षणे आहेत जसे की पोट दुखणे,जुलाब व उलट्या होणे, सतत शौचास होणे, भूक न लागणे, ताप, डोकेदुखी, चक्कर येणे इत्यादी. गॅस्ट्रोमुळे लहान मुलांवर जास्त परिणाम होतो. लहान मुलांचे तोंड कोरडे पडणे, वजनात घटहोणे यासारखी लक्षणे दिसतात.

गॅस्ट्रो होऊ नये म्हणून काही उपाय केले पाहिजे जसे की पाणी उकळून आणि गाळून पिणे, एखादा पदार्थ खराब असल्यास तो खाऊ नये, हात व्यवस्थित धुवावे, घरातील तसेच आजूबाजूचा परिसर साफ ठेवावा. जर गॅस्ट्रोमुळे (Gastro symptoms and treatment) जास्त त्रास होत असल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाऊन दाखवावे आणि डिहायड्रेशन कमी प्रमाणात असेल तर पाणी प्यावे. पोट रिकामे ठेवू नये. आहार संतुलित ठेवावा.

काही घरगुती उपाय (Gastro symptoms and Treatment Home Remedies) :

* डिहायड्रेशन टाळण्यासाठी भरपूर द्रवपदार्थ घेणे:
पाणी पिणे सर्वात उत्तम. काही फळांचे रस, शहाळ्याचे पाणी वगैरेही पिऊ शकतात. अर्थात, सॉफ्ट ड्रिंक्स आणि मद्य टाळले पाहिजेत.

* विश्रांती:
वारंवार रेस्ट-रूमला जावे लागल्याने थकल्यासारखे वाटते. डिहायड्रेशन आणि अशक्तपणामुळेही असेच होते. तुमच्या शरीराला बरे होण्यासाठी पूर्ण विश्रांती देणे महत्त्वाचे आहे. तुम्ही पूर्ण बरे होत नाही, तोपर्यंत कष्टाची कामे किंवा व्यायाम करणे टाळा.

* आहार:
उन्हाळ्याच्या दिवसात पचनक्रिया सोपी व्हावी म्हणून नेहमी हलका आहार घेणेच उत्तम. सूप, भात, वरण आदी साधे अन्नपदार्थ थोडे थोडे खा. तळलेले, मसालेदार पदार्थ किंवा जंक फूड टाळा.

* लहान मुलांमध्ये इलेक्ट्रोलाइट्स भरून काढण्यासाठी ओटीसी रिहायड्रेशन मिश्रणे उपयुक्त ठरू शकतात. तोंडाला व ओठांना कोरड पडणे, लघवीचा रंग गडद होणे, त्वचा शुष्क होणे आदी डिहायड्रेशनच्या लक्षणांबाबत सावध राहा आणि त्वरित आवश्यक ते उपाय करा.

* हा काही घरगुती उपाय नव्हे, पण काही प्रतिबंधात्मक औषधे घेऊन तुम्ही वेदना, मळमळ, उलटय़ा कमी करू शकता. यामुळे आतडय़ांची हालचाल स्थिर होण्यात मदत होईल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Health Title: Gastro symptoms and treatment information in Marathi.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x