27 December 2024 7:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

Health First | घरचे तूप आणि पोळी आरोग्यासाठी आहे उत्तम | वाचा आणि शेअर करा

Ghee with Chapati

मुंबई, २० जून | खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी” ही म्हण आपण ऐकलीच असेल. तुपाला भारतीय खाद्यसंस्कृतीत अगदी मानाचं स्थान आहे. अनेक खाद्यपदार्थांना तुपामुळे एक विशिष्ट स्वाद आणि सुगंध येतो. गरमागरम पुरणपोळी, मोदक, मुग डाळ खिचडी, शिरा असे अनेक पदार्थ तुपाशिवाय पूर्णच होऊ शकत नाहीत. स्वयंपाकासोबत अनेक धार्मिक विधींमध्येदेखील तुपाचा वापर केला जातो. या शिवाय घरात मंगल प्रसंगी देवाजवळ तुपाचा दिवा लावण्यात येतो. सण-समारंभ, लग्नविधी अशा अनेक कार्यक्रमातील जेवणाच्या पंगतीत पाहुणचार करताना आग्रहाने तुप वाढलं जातं. तूप आरोग्य आणि त्वचेसाठीदेखील फायदेशीर ठरतं. यासाठी प्राचीन काळापासून आहारात तुपाचा वापर करण्यास सांगितलं जातं.

तुपात मधूर, शक्तीशाली, पित्तशामक, मेद आणि शुक्रधातूंचे पोषण करणारे घटक असतात. शिवाय त्यात व्हिटॅमिन् ए आणि डी, कॅल्शियम, फॉस्फरस मिनरल्स, पोटॅशियम, अॅन्टी ऑक्सिडंट आणि अॅन्टी व्हायरल घटकदेखील असतात. दोन प्रकारचं तूप तुम्ही आहारात वापरू शकता. गाईच्या दुधापासून आणि म्हशीच्या दुधापासून असे दोन प्रकारचे तूप तयार केले जाते. या दोन्ही प्रकारच्या तुपाच्या सेवनाने शरीर बळकट आणि निरोगी होण्यास मदत होते. यासाठीच जाणून घ्या तूप खाण्याचे फायदे

आजकाल वजनवाढ, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह आणि अनेक पकारच्या व्याधीनी लोक त्रासले आहेत आणि त्यामुळे आहार नियमात तेल तुपाचा वापर कमीत कमी करण्याचा सल्ला बहुतेक वेळा दिला जातो. तूप खाणे तर त्यात निषिद्धच मानले जात आहे. मात्र पोळी, पराठा, भाकरी अथवा रोटीबरोबर प्रमाणात खाल्लेले साजूक तूप किंवा देसी घी प्रत्यक्षात आरोयासाठी खूपच लाभदायी ठरते असे आता संशोधनातून दिसून आले आहे.

अनेक प्रयोगातून असे दिसले आहे कि पोळीसाठी रीफाइंड तेलाचा वापर होत असेल तर त्यातील पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड आरोग्यला धोका निर्माण करत असते या उलट साजूक तुपाचे सेवन अनेक आजार बरे करते. साजूक तुपाचे मर्यादित सेवन वजन घटविण्यास सहाय्यकारी ठरते कारण या तुपात जीएलअ हा घटक असतो तो चयापचय क्रिया म्हणजे मेटॅबोलीझमचा रेट वाढवितो व त्यामुळे वजन घटते.

तूप आणि पोळी किंवा भाकरी पराठा ग्लायसेमिक इंडेक्स कमी करतो. त्याचा फायदा मधुमेहींना होतो. तुपातील सीएलए इन्शुलिनची मात्रा कमी करते त्यामुळे तुपाबरोबर पोळी खाल्ली तर रक्तातील साखर लगेच वाढत नाही आणि पोट दीर्घकाळ भरलेले राहते यामुळेही रक्तातील साखर नियंत्रणात येते. तूप पोळीचे सेवन लुब्रिकंटचे काम करते. त्यामुळे हृद्य, रक्तवाहिन्यात रक्तवाहनाचे काम सुरळीत राखले जाते. तुपाचा ज्वलन बिंदू कमी आहे त्यामुळे त्यातून लवकर धूर येतो. पण शिजत असताना ते सहज जळत नाही त्यामुळे ते पचनासाठी चांगले ठरते. रक्तातील तसेच आतड्यातील कोलेस्टेरॉल तुपामुळे नियंत्रणात येते त्यामुळे बायलरी लिपीड स्त्राव वाढतो आणि वाईट कोलेस्टेरॉल कमी होते.

प्रमाणात खाल्लेले तूप प्रतिकारशक्ती वाढविते. अर्थात साजूक तूप किंवा देसी घी दररोज १ किंवा दोन चमचे याच प्रमाणात आहारात समाविष्ट केले तरच त्याचे फायदे होतात अन्यथा नुकसान होऊ शकते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Ghee with Chapati has good health benefits news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x