25 December 2024 10:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS NMDC Share Price | मल्टिबॅगर NMDC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024
x

Health First | जाणून घ्या खोकल्याव्यतिरिक्त सुंठीचे आरोग्यदायी फायदे । नक्की वाचा

benefits of ginger powder

मुंबई १० एप्रिल : सुंठीवाचून खोकला गेला’ अशी म्हण आहे. म्हणजे सुंठ ही खोकल्यावर रामबाण औषध आहे. खोकला झाल्यास सुंठीचं सेवन केलं जातं, त्यामुळे खोकल्यापासून आराम मिळतो हे आपणा सर्वांना माहितीच आहे. मात्र याशिवायही सुंठीचे अनेक फायदे आहेत..प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधांमध्ये सुंठेचा उपयोग केला जात आहे.सुंठ म्हणजेच सुकलेलं आलं आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. सुकलेल्या आल्याच्या पावडरलाच सुंठ बोललं जातं. सुंठदेखील आल्याप्रमाणेच गरम असते. उन्हाळ्याच्या दिवसांत सुंठेचं कमी, तर थंडीच्या दिवसांत अधिक सेवन फायदेशीर ठरतं ​कारण थंडी म्हटलं की आरोग्याच्या अनेक समस्या आल्या. खोकला, ताप, सांधेदुखी या समस्या थंडीत अधिक बळावतात आणि या सर्वांवर सूंठ फार उपयुक्त आहे. सुंठीचे नेमके काय फायदे आहेत जाणून घेऊयात.

1) सुंठ आणि खडीसाखर एकत्र करून त्याचा पाक चाटल्याने खोकला कमी होतो.

2) सुंठ घातलेले पाणी उकळून प्यावं ताप कमी होतो.

3) छातीत कळ आल्यास फक्त सुंठीचं चाटण दिलं तरी बरं वाटतं.

4) सातत्याने ढेकर येत असेल तर त्यावर सुंठीचं चाटण खावं.

5) सुंठ खाल्ल्याने खूप भूक लागते.

6) अजीर्णाची समस्या असल्यास सुंठ ताकात उगाळून प्यावी.

7) घशात जळजळ आणि आंबट उलटी अशी आम्पपित्ताची लक्षणं असतील, तर सुंठ, आवळकाठी आणि खडीसाखर समप्रमाण घेऊन खावं.

8) आमवात म्हणजे सांध्याच्या ठिकाणी सूज आल्यास त्यावरही सुंठीचे सेवन फायदेशीर आहे.

9) अर्धांगवायू असलेल्यांना सुंठ पूड, लसूण आणि तूप एकत्र करून घ्यावं.

10) भोवळ, अर्धशिशी, डोकेदुखीची समस्या असल्यास सुंठ उगाळून त्याचा लेप लावावा

News English Summary: It is said that he coughed up ginger. So ginger is a panacea for cough. Ginger is consumed in case of cough, so we all know that it gives relief from cough. But apart from this, ginger has many benefits. Ginger has been used in Ayurvedic medicine since ancient times. Ginger is a dried ginger which is very beneficial for health. Ginger is also known as dried ginger powder. Ginger is as hot as it gets. Consumption of less ginger in summer days and more in cold days is beneficial as cold is said to cause many health problems. Problems like cough, fever, joint pain are exacerbated in cold and ginger is very useful in all these. Let’s find out exactly what are the benefits of ginger.

News English Title: Ginger powder is effective for many health problems news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x