26 December 2024 6:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK EPFO Pension Alert | खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वर्षात पेन्शन वाढणार, जाणून घ्या फायद्याची अपडेट IRFC Share Price | रेल्वे स्टॉक IRFC सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या
x

Health First | हे आहेत हिरवे चणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे - वाचा सविस्तर

Green Gram in benefits

मुंबई, ११ जुलै | ब्रोकोली, पालक, मेथी आणि हिरव्या भाज्यांसारख्या बर्‍याच हिवाळ्यातील भाज्या शरीरातील बऱ्याच घटकांची कमतरता देखील दूर करते. या भाज्यांमध्ये कमी कॅलरीज असतात. त्यामुळे आरोग्यासाठीही चांगल्या असतात. या सर्वांमध्ये अशी एक भाजी आहे ज्यामध्ये चव आणि आरोग्यासाठी बरेच फायदे सुद्धा आहेत. ती भाजी म्हणजे हिरवा हरभरा. मग ते कच्चे खावं, भाज्या किंवा उकडून बनवून खावं. हिरवे चणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हिरव्या हरभरामध्ये प्रथिने भरलेली असतात आणि यात सेच्युरेटेड मॅक्रोन्यूट्रिएंट देखील आहेत. हे मॅक्रोन्यूट्रिएंट्स स्नायूंच्या वाढीस प्रोत्साहित करण्याबरोबरच ते सामर्थ्य देखील प्रदान करतात.

ऊर्जा मिळते:
हिरवे चणे खाल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि थकवा दूर होतो. हिरव्या चणांची भाजी, सलाड तुम्ही खाऊ शकता. त्याचबरोबर उकडलेले हिरवे चणे देखील स्वादिष्ट लागतात.

हाडांना बळकटी येते:
हिरव्या चण्यात व्हिटॉमिन सी आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हाडे बळकट होतात आणि शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

ब्लड शुगर नियंत्रित राहते:
हिरव्या चण्यांमध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचे गुणधर्म असतात. चण्यात फायबर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे शरीरात ब्लड फॅटचे नियमन व्यवस्थित राहते. त्याचबरोबर त्यात साखरेचे प्रमाण नसल्याने मधुमेहींसाठीही फायदेशीर ठरतात.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी:
चण्यात खूप सारे विटॉमिन्स आणि मिनिरल्स असतात. डोळ्यांच्या आरोग्यासाठी ते लाभदायी ठरतात. व्हिटॉमिन ए, ई, सी, के आणि बी कॉम्पेलेक्स असल्याने दृष्टी सुधारते.

हृदयविकार राहतील दूर:
हिरव्या चण्यांचे सेवन केल्याचे हृदयविकारही दूर राहतील. त्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि गुड कोलेस्ट्रोलचे प्रमाण वाढते. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी चणे खाणे फायदेशीर ठरेल.

वजन कमी करण्यासाठी:
यात भरपूर फायबर असते त्यामुळे पचन करणे सोपे होते आणि बर्‍याच वेळेस पोट भरते. वजन आणि मधुमेह कमी करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. हिरव्या हरभऱ्यात जीवनसत्त्वे ई आणि ए देखील भरपूर प्रमाणात असते. हे दोन्ही जीवनसत्त्वे त्वचा आणि डोळ्यांसाठी खूप चांगले आहेत. यात डोळ्यांसोबत एंटीएजिंग देखील असतं. हिरवा चणे हे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगांमध्ये देखील फायदेशीर आहे. फायबर जास्त प्रमाणात असल्यानं रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा करण्यापासून थांबवते. यात कॅलेरी कमी होते, यामुळे हे खाल्ल्यानं चरबी देखील शरीरात जमा होत नाही.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Green Gram in beneficial for health in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x