26 December 2024 6:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: YESBANK Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 57 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS
x

Health First | बसून काम करण्याच्या जीवनशैलीचा तुमच्या हाडांवर कसा परिणाम होतो?

Harmful effects on bones

मुंबई, २६ जुलै | खुर्चीवर बसून काम करण्याच्या जीवनशैलीचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो सोबतच जीवनशैलीचे विकार देखील होतात. दैनंदिन जीवनात तुम्ही चालणे अथवा लिफ्ट ऐवजी पाय-यांचा वापर करणे अशा शारीरिक हालचाल करणा-या गोष्टी करणे टाळतो. दिवसभरात सहा तासांपेक्षा अधिक काळ तुम्ही खुर्चीवर बसून काम करता. अशा जीवनशैलीमुळे तुमची हाडे व स्नायू कमजोर होण्याचा धोका वाढून हाडांचे विकार विकसित होण्याची शक्यता असते.

ऐवढेच नाही तर अशी माणसे त्यांच्या प्रौढ वयातच २० ते ४० टक्के मसल मास गमावून बसतात. तसेच बसून काम करण्याच्या जीवनशैलीमुळे लवकर वृद्धत्व येते.त्यामुळे सक्रिय जीवनशैली असलेली माणसे आळशी जीवनशैली असलेल्या लोकांपेक्षा वयाने मोठी असून देखील तरुण दिसतात.

बसून काम करण्याच्या जीवनशैलीचा हाडांवर कसा प्रभाव पडतो?
अशा तक्रारी ब-याचदा प्रौढ व्यक्तींकडून येतात ज्यांना आर्थ्राटीस अथवा संधीवाताची समस्या असते. या समस्यांमुळे अशा लोकांना त्यांची दैनंदिन कामे करणे देखील कठीण जाते. अशा लोकांना दररोज स्वयंपाक करणे, खरेदी करणे, औषधे घेणे, पैसे सांभाळणे किंवा अगदी घरामध्ये चालणे, अंघोळ करणे व कपडे घालणे देखील नकोसे वाटते. शिवाय जी प्रौढ माणसे त्यांच्या स्नायूंच्या त्यांच्या शारीरिक क्षमतेनूसार वापर करीत नाहीत त्यांच्या स्नायूंची कार्यक्षमता हळूहळू कमी होत जाते. अशा जीवनशैलीमुळे प्रौढ व्यक्तींना भविष्यात सांध्यांची दुखणी निर्माण होतात. अशा लोकांना आर्थ्राटीस अथवा ऑस्टिओपोरोसिस सारख्या समस्या झाल्यामुळे जीवन जगण्यासाठी इतरांची मदत घ्यावी लागते.

तज्ज्ञांच्या मते निष्क्रीय जीवनशैलीचा माणसाच्या संपूर्ण आरोग्यावर विपरित परिणाम होतो. चुकीची जीवनशैली असलेल्या प्रौढांना चाळीशीनंतरचे जीवन जगणे कठीण जाते. चुकीच्या जीवनशैलीचा त्यांच्या हाडांवर दीर्घाकालीन दुष्परिणाम होतो. आर्थ्राटीस ही समस्या वृद्धापकाळी होत असली तरी आजकाल ही समस्या तरुणवयात होताना दिसत आहे. सांध्याचे नुकसान होण्यामागे एखाद्याच्या बसण्याचे प्रोश्चर कारणीभूत असू शकते ज्यामुळे पुढे सांध्यांमध्ये विकृती येते.

शारीरिक हालचाल कमी झाल्यामुळे हाडे कमजोर होतात व लवकर तुटतात. त्यामुळे सतत शारीरिक हालचाल केल्यामुळे हाडे मजबूत रहातात व सांधेदुखी टाळता येते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Harmful effects of a sedentary lifestyle on bones in Marathi news updates.

ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्रनामा मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा: Click Here to Download

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x