22 April 2025 3:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Health First | रात्री लवकर झोप येत नाही? | घरगुती उपायांनी करा निद्रानाशावर मात

inadequate sleep Problem

मुंबई, २७ मे | जीवनशैली बदलल्याने झोपेच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. अनेकांना झोप लागत नाही, ज्याला निद्रानाश म्हटलं जातं. हल्ली बहुतेक लोकांना निद्रानाश आहे. दिवसभर कामात व्यस्त राहिल्याने ताणतणाव हे त्याचं सर्वात मोठं कारण आहे. तणाव शरीरात अनेक संप्रेरक बदल घडवून आणतो ज्याचा परिणाम झोपेवर होतो. झोप लागत नसली की अनेक जण झोपेचं औषध घेतात. मात्र थेट झोपेचं औषध घेण्यापेक्षा काही आयुर्वेदिक आणि औषधी वनस्पतींनीदेखील तुम्ही या समस्येवर मात करू शकता.

झोप न येण्याच्या समस्या निद्रानाशाच्या आजारामुळे उद्भवते. ताणतणावात राहणाऱ्या आणि कोणत्याही गोष्टीबद्दल काळजीपूर्वक तसंच खोलवर विचार करणाऱ्या व्यक्तींमध्ये झोप न येण्याचा त्रास जास्त प्रमाणात आढळतो. यामुळे त्यांच्या स्लीपिंग हार्मोनमध्ये बिघाड निर्माण होतो. परिणामी रात्रीच्या झोपेचे गणित पूर्णतः बिघडते. रात्री झोप लवकर येत नाही आणि सकाळी लवकर उठणे देखील कठीण होते. अपुऱ्या झोपेमुळे विविध गंभीर आजारांची लागण देखील होऊ शकते.

अपुऱ्या झोपेमुळे डोकेदुखी, चिडचिड होणे, लक्ष्य विचलित होणे असे परिणाम शरीरावर दिसू लागतात. या सर्वांचा आपल्या कार्यक्षमतेवर दुष्परिणाम होतात. अपुऱ्या झोपेमुळे रक्तदाब, मधुमेह, हृदयविकारांनाही आयते आमंत्रण मिळते. पुरेशा प्रमाणात झोप छान झाली की संपूर्ण दिवसही एकदम मस्त जातो. किमान सात ते आठ तासांची झोप मिळावी, यासाठी काही टिप्स आपण जाणून घेऊया

मेथी:
संबंधित तज्ज्ञांनी सांगितलं, मेथी तणाव, निद्रानाश आणि चक्कर यासारख्या समस्यांपासून आराम देण्यासाठी उपयुक्त आहे. दोन चमचे मेथीच्या पानांचा रस घ्या आणि त्यात एक चमचा मध मिसळा. हे मिश्रण नियमित घ्या.

केळी:
तज्ज्ञांनी सांगितलं, केळ्यामध्ये ट्रायटोपॉन नावाचं अमिनो अॅसिड असतं, जे सेरोटोनिनची पातळी वाढवण्यात मदत करतं. केळ्यामुळे मानसिक आरोग्य सुधारतं. केळ्यात आढळणारे लोह, कॅल्शियम आणि पोटॅशियम असे घटक झोपेसाठी उपयुक्त आहेत.

गरम दूध:
एक कप गरम दुधामध्ये एक किंवा दीड चमचा दालचिनीची पूड घाला. हे मिश्रण झोपायच्या आधी प्या.

जायफळ:
जायफळ हे झोपेचं औषधदेखील आहे. झोपण्यापूर्वी एक कप कोमट दुधात जायफळ पूड घालून प्यायल्यास चांगली झोप लागते. याशिवाय एक चमचा आवळाच्या रसात जायफळ पावडर मिसळून दिवसातून किमान तीन वेळा प्या. याचाही फायदा होईल. जायफळ खाल्ल्यास अपचनाची समस्याही दूर होते.

जिरं:
झोप न येण्याचं एक कारण म्हणजे वारंवार पोट खराब होणं. पोटाच्या समस्यांसाठी जिरं फायदेशीर आहे. जिरं पचन सुधारण्यासाठी कार्य करतं. जर पोटाचं आरोग्य चांगलं असेल तर झोप देखील चांगली होईल. कुस्करलेल्या केळीमध्ये एक चमचा जिरं पूड मिसळा. हे मिश्रण झोपायच्या आधी खा. याशिवाय ताण आणि थकवा कमी करण्यासाठी जिऱ्याचा चहादेखील घेता येतो. जिऱ्याचा चहा तयार करण्यासाठी एक चमचा जिरं पाच सेकंद मंद आचेवर गरम करा. नंतर एक वाटी पाणी गरम करून त्यात भाजलेलं जिरं घाला. झोपेच्या आधी हा चहा प्या.

लेव्हेंडर:
लेव्हेंडर एक आयुर्वेदिक औषध आहे, ज्यामुळे झोपेची समस्या दूर होते. झोपायच्या आधी एक कप लेव्हेंडर-टी प्यायल्याने शरीराला आराम मिळतो. यामुळे मानसिक थकवा आणि तणाव कमी होतो. इतकंच नाही तर ही औषधी वनस्पती मज्जासंस्था मजबूत करण्यासाठी देखील कार्य करते.

अश्वगंधा:
अश्वगंधादेखील निद्रानाश दूर करण्यासाठी एक उपयुक्त औषध आहे. एका संशोधनानुसार ही एक औषधी वनस्पती आहे जी दीर्घकालीन तणाव कमी करते. शरीराला त्वरित विश्रांती मिळवून देते.

महत्वाची टीप : कोणत्याही उपायांचा अवलंब करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या

 

News English Summary: Insomnia is caused by insomnia. Insomnia is a disorder that is affecting more and more people. This causes a breakdown in their sleeping hormones. As a result, the math of a night’s sleep is completely ruined. Sleep does not come early at night and it is also difficult to get up early in the morning. Inadequate sleep can also lead to various serious illnesses.

News English Title: Have a problem of inadequate sleep then try these home remedies health article news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या