20 April 2025 7:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

Health First | दुधी भोपळ्याचा रस आरोग्यास लाभदायक

Health benefit, bottle gourd juice, Health Article

मुंबई, ०९ मार्च: सकाळी रिकाम्या पोटी दुधी भोपळ्याचा रस पिणे हृदयरोग, मधुमेह, बद्धकोष्ठता, यकृताच्या समस्या, मूत्राशयाशी निगडीत अडचणी तसेच नैराश्य या समस्या कमी होण्यास मदत होते. आयुर्वेद आणि पर्यायी उपचार करणाऱ्यांकडून हा रस पिण्यास सांगितले जाते.

सकाळी उठून जर तुम्ही वर्कआऊट करत असाल तर दुधीचा रस जरुर प्यावा. रिकाम्या पोटी एक ग्लास दुधीचा रस प्यायल्याने एनर्जी मिळते. तसेच दुधीच्या रसात ९८ टक्के पाणी आणि अँटी ऑक्सिडेंटस असतात. ज्यामुळे शरीरातील अशुद्ध घटक बाहेर फेकले जातात. यामुळे शरीराला थंडावा मिळतो.

  • एनर्जीसाठी:
    सकाळी उठून जर तुम्ही वर्कआऊट करत असाल तर दुधीचा रस जरुर प्यावा.
  • युरिन इन्फेंक्शन:
    लघवीच्या ठिकाणी जळजळ होत असल्यास दुधीचा रस पिणे उत्तम. लघवीमध्ये अॅसिडचे प्रमाण अधिक वाढल्यास जळजळीचा त्रास होतो. दुधीचा रस प्यायल्यास हा त्रास कमी होतो.
  • शरीरातील अशुद्धी बाहेर फेकण्यासाठी:
    रिकाम्या पोटी एक ग्लास दुधीचा रस प्यायल्याने एनर्जी मिळते. तसेच दुधीच्या रसात ९८ टक्के पाणी आणि अँटी ऑक्सिडेंटस असतात. ज्यामुळे शरीरातील अशुद्ध घटक बाहेर फेकले जातात. यामुळे शरीराला थंडावा मिळतो.
  • वजन घटवण्यासाठी फायदेशीर:
    दुधीच्या रसात कॅलरीज आणि फॅट्स नसतात. यामुळे तुम्ही वजन घटवत असाल तर दुधीचा रस प्यावा. यातील फायबर भूक कंट्रोल करण्यात मदत करतात.
  • बद्धकोष्ठतेच्या त्रासावर गुणकारी:
    तुम्हाला जर बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर सकाळी दुधीचा रस प्यायल्याने फायदा होतो.
  • भोपळ्याचा रस दिर्घकाळ बंद बाटलीत असेल आणि चवीला थोडा जरी कडू लागला तरी तो खराब आहे असे समजावे आणि तो अजिबात पिऊ नये. कारण त्यातून गंभीर इजा उद्भवण्याची शक्यता असते.
  • दुधीभोपळ्याचा रस एक वाटी, लिंबाचा रस एक चमचा व एक चमचा मध एकत्र करून दिल्यास मुत्रविकार कमी होतात.
  • रोज सकाळी काही न खाण्याआधी अर्धा वाटी दुधीभोपळ्याचा रस व एक चमचा आल्याचा रस पाण्यात मिसळून घेतल्यास स्थूलपणा कमी होतो.
  • दुधी भोपळ्याच्या एक वाटी रसात एक चमचा मध व चिमुटभर जायफळ पूड ‍मिसळून तयार झालेला तेप त्वचेवर लावल्याचा कांती उजळते.
  • एक चमचा आवळा चुर्ण भोपळ्याच्या रसात रात्री कोमट पाण्यात घेतल्याने झोप चांगली लागते. तसेच पोट साफ होते.

 

News English Summary: Drinking pumpkin juice on an empty stomach in the morning helps in reducing heart disease, diabetes, constipation, liver problems, bladder problems and depression. Ayurveda and alternative therapists recommend drinking this juice.

News English Title: Health benefit of bottle gourd juice news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या