Health First | प्रत्येक मोसमात कोथिंबीर आहे आरोग्यदायी - नक्की वाचा
मुंबई, २७ जुलै | देशात आणि जगभर जेवणात हिरव्या कोथिंबिरीच्या पानांचा उपयोग केला जातो. जगभरात कोथिंबीर वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. कोथिंबीर जेवणाची रंगत वाढवते, आस्वाद वाढवतेच. शिवाय अनेक आजार कोथिंबिरीमुळे दूर राहतात. यात अनेक पोषक तत्त्व असतात. प्रत्येक मोसमात मिळणारी ही कोथिंबीर किती फायदेशीर आहे, त्यात कुठली पोषक तत्त्व आहेत हे ‘ईटीव्ही भारत’च्या वाचकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत.
कोथिंबिरीतली पोषक घटक:
कोथिंबीर भरपूर पौष्टिक आहे. कोथिंबिरीच्या हिरव्या पानांमध्ये फायबर मुबलक असते. कोथिंबिरीत व्हिटॅमिन ए आणि सी, कॅल्शियम, मॅग्नीशियम, मॅगनीज, लोह, पोटॅशियम आणि प्रोटिन्स भरपूर असतात.
भारतीय स्वयंपाकघरात धणे किंवा त्याची पावडर मसाल्यात वापरली जाते. धण्याचे सेवन केल्याने आरोग्य चांगले राहते. पचनशक्ती सुधारते. शौच साफ होते. कोथिंबिरीत अँटीबॅक्टीरियल आणि अँटीऑक्सिडेंट घटक असतात. यामुळे शरीरात होणाऱ्या संसर्गाशी लढण्यास शक्ती मिळते. कोथिंबीर त्वचेसाठी चांगली आहे.कोथिंबिरीमुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. यातले कॅल्शियम, लोह आणि न्यूरोट्रांसमीटर एसिटाइलकोलाइन एकत्र येऊन रक्तवाहिन्यांवरचा ताण कमी करायला मदत करतात.
कोथिंबिरीचे फायदे आणि त्या संबंधी घरगुती उपाय:
* हिरव्या कोथिंबिरीमुळे पचनशक्ती चांगली राहते. यामुळे पोटाच्या समस्या दूर होतात. ताकात कोथिंबिरीचा पाने टाकून ते प्यायले तर अपचन, मळमळ, पोटशूळ आणि कोलायटिसवर आराम मिळतो. यामुळे गॅस आणि पित्ताची समस्या देखील दूर होते.
* अतिसारावर कोथिंबिरीची चटणी फायदेशीर होते.
* पाणी कमी प्यायल्याने लघवीची समस्या उद्भवते. अशा वेळी धण्याचे सेवन केल्याने ही समस्या दूर होते.
* कोथिंबिरीत व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर असते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढतेच. पण याबरोबर याच्या नियमित सेवनाने सर्दी–खोकलाही बरा होतो.
* पोटाच्या समस्येबरोबर तोंडातल्या जखमा आणि अल्सर कोथिंबिरीमुळे बरा होतो.
* कोथिंबिरीत मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी आहे. यामुळे संधिवातावर ही फायदेशीर आहे.
* कोथिंबिरीमुळे शरीरातले कॉलेस्ट्रॉल कमी होऊन नियंत्रणात राहते. उच्च कॉलेस्ट्रॉल असले तर धण्याचे पाणी गरम करून प्यायले तर फायदा होतो.
* मधुमेह असेल तर धणे गुणकारी आहेत. याच्या सेवनाने रक्तातील इन्सुलीनचे प्रमाण नियंत्रणात राहते.
* नियमित धणे खाल्ल्याने स्त्रियांच्या मासिक पाळीच्या समस्या दूर होतात. मासिक पाळीत रक्तस्राव जास्त होत असेल तर धण्याचे पाणी पिऊन फायदा होतो.
* धण्याचे पाणी पिऊन पायांची होणारी जळजळ कमी होते.
* धण्यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. त्याचे कार्य सुरळीत सुरू राहते.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Health benefits of Coriander in Marathi news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा