26 December 2024 7:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK EPFO Pension Alert | खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वर्षात पेन्शन वाढणार, जाणून घ्या फायद्याची अपडेट IRFC Share Price | रेल्वे स्टॉक IRFC सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
x

Health First | जेवणानंतर बडीशेप नव्हे तर काळी मिरी आणि खडीसाखर एकत्र खा | होतील हे फायदे

black pepper with caster sugar

मुंबई , २७ मे | काळी मिरी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. काळी मिरी बर्‍याच रोगांमध्येही हे प्रभावी मानली जाते. काळ्यामिरीत पेपरिन नावाचा घटक असतो. हा घटक औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. यात लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, जस्त, क्रोमियम, व्हिटामिन ए आणि इतर पोषक गुणधर्म आढळतात. याशिवाय यामध्ये रायबोफ्लेविन, थायामिन, पोटॅशियम, सोडियम, फॉलेट, बेटेन आणि नियासिन हे घटकदेखील आढळतात. या कारणांमुळे स्वादासह काळीमिरी आपल्या आरोग्यासाठीही लाभदायक आहे.

गॅसची समस्या असल्यास काळी मिरी हा रामबाण उपाय आहे. एक कप पाणी घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस, अर्धा चमचा काळी मिरी पूड आणि अर्धा चमचा काळं मीठ याचं काही दिवस सेवन केल्याने गॅसची समस्या दूर होते.

जेवणाचं चांगलं पचन व्हावं यासाठी कहीजण खडीसाखर आणि बडीशेप खातात, पण, गॅस,बद्धकोष्ठता,अपचना समस्या, सूज येणं किंवा पोट फुगणं अशा तक्रारी असल्यास मिरपूडबरोबर खडीसाखर खावी. यामुळे पचन संबंधीत सर्व समस्या दूर होतील. काळी मिरी आणि खडीसाखर एकत्र खाल्याने आरोग्याला फायदा होतो.

काळी मिरीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, बीटा केरोटीन, व्हिटॅमिन ए, अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म, अँटीऑक्सिडेंट्स, सेलेनियम असतात. तर खडी साखरेत व्हिटॅमिन बी 12, फायबर, अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म, अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. त्यामुळे दोन्ही एकत्र खाल्ल्याने बर्‍याच प्रकरणात शरीराला फायदा मिळतो. या मिश्रणाच्या सेवनामुळे आरोग्यास किती फायदा होतो हे पाहुयात.

मेंदूसाठी फायदेशीर:
जर स्मरणशक्ती कमकुवत झाली असेल किंवा मानसिक तणाव जाणवत असेल तर त्या व्यक्तीने मिरपूड आणि खडीसाखर खावी. याने मानसिक थकवा दूर होईल आणि स्मरणशक्तीही चांगली होईल. मिरपूड आणि खडीसाखरेच्या सेवनाने झोपेची समस्या देखील दूर होते. फ्रेश वाटत नसेल तर आपलं मन ताजतवानं करण्यासाठी हे मिश्रण खा.

वजन कमी करण्यासाठी:
काळी मिरी आणि खडीसाखर एकत्र खाल्ली तर वजन कमी करण्यास मदत होते. मिरपूडच्या वरच्या थरांवर फायटोन्यूट्रिएंट्स असतात, जे शरीरातील चरबीच्या पेशी तोडण्याचं काम करतात. तर खडीसाखर पोट निरोगी ठेवण्यासाठी आणि भूक नियंत्रण करण्यांच काम करते. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर मिरपूड आणि खडीसाखरेचं मिश्रण खाऊ शकता.

घशातील समस्या दूर:
खडीसाखर आणि तुपाचे काही थेंब काळी मिरी पावडरमध्ये मिसळून खाल्ल्यास आपल्या घशात आराम मिळेल. या चाटणाने खोकल्यामध्ये त्वरित आराम मिळतो. काळी मिरी घशातील कफ काढून टाकण्यासाठी खूप मदत करते.

शरीर आणि मेंदूला त्वरित ऊर्जा:
मिरपूड आणि खडीसाखर यांचं मिश्रण घेतल्याने तणाव कमी होतो आणि शरीराला त्वरित ऊर्जादेखील मिळते. यामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा कमी होऊ शकतो.

महत्वाची टीप : कोणत्याही उपायांचा अवलंब करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.

 

News English Summary: Some people eat caster sugar and dill to improve digestion of food, but if there are complaints of gas, constipation, indigestion, bloating or bloating, eat caster sugar along with black pepper. This will eliminate all the problems related to digestion. Eating black pepper and granulated sugar together is good for health.

News English Title: Health benefits of eating black pepper and caster sugar combination health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x