27 December 2024 11:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअरवर ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: BEL Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 55 टक्केपर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर ब्रेकआऊट देणार. तज्ज्ञांनी दिले तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRFC Suzlon Share Price | सुझलॉन शेअर टॉप लेव्हलवरून 25% घसरला, आता 100 रुपयांच्या पार जाणार - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS NBCC Share Price | एनबीसीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: NBCC
x

Health First | आयुर्वेदिक बहुगुणी जायफळ आरोग्यासाठी फायदेशीर - वाचा सविस्तर

Nutmeg beneficial for Health

मुंबई, २४ जून | आपल्या स्वयंपाक घरात असलेले मसाले फक्त पदार्थांमधील चवच वाढवतात असं नाही, तर ते आपलं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठीही अधिक फायदेशीर असतात. गरम मसाल्यात वापर केलं जाणारं जायफळ त्यापैकीच एक आहे. जायफळमध्ये खूप प्रभावशाली अँटीऑक्सिडंट असतात. आकारानं लहान असून सुद्धा ज्या बियांमधून जायफळ काढलं जातं त्या बिया आणि ते झाड सुद्धा खूप औषधीयुक्त असतं. आपल्या शरीरात अँटीऑक्सिडंटचं काम जायफळ करतं. जायफळ अँटी इंफ्लेमेटरी आणि अँटी बॅक्टेरिअल गुणांनीही परिपूर्ण असतं. म्हणूनच डाएटमध्ये थोड्या-थोड्या प्रमाणात जायफळचा वापर केला तर अनेक आजारांपासून आपला बचाव करता येतो. सोबतच पचनक्रियेशी संबंधित संक्रमण आणि आजारांमध्ये सुद्धा जायफळ खूप उपयुक्त ठरतं. तर जाणून घ्या जायफळचे औषधीय गुण..

* चेहऱ्यावरील सुरकुत्या:
आपल्या चेहऱ्यावर वाढणाऱ्या सुरकुत्यांनी चिंताग्रस्त असाल, तर त्यासाठी जायफळ उपयोगी आहे. जायफळ उगाळून त्याची पेस्ट एक महिना चेहऱ्याच्या सुरकुत्यांवर लावल्यास सुरकुत्या निघून जातात. त्याशिवाय चेहऱ्यावरील मुरूम, पुटकुळ्या यांचे चेहऱ्यावर पडणारे डाग घालवण्यासाठीही याचा उपयोग होतो.

* रक्तप्रवाहात वृद्धी:
जायफळाने मालिश केल्यास रक्तप्रवाह योग्य पद्धतीने होतो. शरीरातील रक्तप्रवाह योग्य राहिल्यास झोप चांगली लागते आणि दिवसभर ताजेतवाने वाटते. त्याशिवाय रोज रात्री दुधातून जायफळाची पूड घेतल्यास झोप चांगली लागते.

* दातदुखी दूर होते:
दातदुखीमध्ये जायफळाचे तेल खूप फायदेशीर ठरते. दात दुखत असतील कापसावर जायफळाचे तेल घेऊन दातांच्या मुळाशी लावल्याने वेदना कमी होण्यास मदत होते. आयुर्वेदिक टूथपेस्टमध्येही दालचिनी आणि जायफळ टाकलेले असते.

* मुलांना हितकारी:
लहान मुलांना दूध पचायला जड जाते. अशा वेळी अर्धे दूध व अर्धे पाणी घालून त्यात एक जायफळ टाकून उकळून थोडे थंड करून पाजल्यास मुलांना दूध पचते.

* दृष्टी वृद्धिंगत होते:
डोळ्यांची दृष्टी कमी झाली असल्यास जायफळ खूपच फायदेशीर ठरते. त्यासाठी जायफळ उगाळून त्याचा लेप तयार करा. हा लेप डोळ्यांच्या पापण्यांवर आणि डोळ्यांच्या चारही बाजूस लावल्यास दृष्टी सुधारते.

* ब्रेन टॉनिक:
प्राचीन काळात रोमन आणि ग्रीक या दोन्ही संस्कृतींमध्ये जायफळाचा वापर ब्रेन टॉनिक सारखा करत असत. कारण, जायफळ मेंदूला उत्तेजित करते. त्यामुळे थकवा, तणाव कमी करण्यासाठी मदत करू शकते. एखाद्या व्यक्तीला चिंता रोग किंवा औदासिन्य आले असेल, तर त्यावर जायफळाचा उपयोग होऊ शकतो. जायफळाच्या सेवनाने अल्झायमरसारखा आजारही होणार नाही.

* वेदनाशामक:
जायफळामुळे वेदना कमी होण्यास मदत होते. त्यामुळेच पोटदुखी आणि सूज येणे या दोन्हींमध्ये जायफळाचा वापर केला जातो. आपल्याला सांधेदुखी, स्नायूंमध्ये वेदना, गाठी, जखमा आणि इतर सर्व आजारांमध्येही जायफळाचा वापर केला जाऊ शकतो. वेदनाहारी म्हणून जायफळाचे तेल वेदना होणार्‍या जागी लावल्यास गुणकारी ठरते.

* पचनसंबंधी समस्या:
पचनसंस्थेशी निगडीत काही त्रास, जुलाब होणे, पोटात वायू होणे, सूज येणे, पोट फुगणे आदी समस्यांनी ग्रस्त असाल, तर जायफळाचा नक्कीच फायदा होईल. जायफळाचे तेल आतड्यातील अतिरिक्त वायू बाहेर टाकण्यास मदत करेल. त्यामुळे पोटदुखीपासून सुटका होते. जायफळाचे सेवन केल्यास भूक न लागण्याची समस्याही दूर होते.

* रोगप्रतिकारक क्षमतेत वाढ:
जायफळाचा वापर पदार्थांचा स्वाद वाढवण्यासाठी केला जातोच, शिवाय त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमताही वाढते. जायफळात खनिजे आहेतच. त्याव्यतिरिक्त पोटॅशिअम, कॅल्शिअम, लोह आणि मॅग्नेशिअम हे सर्व धातूही शरीराला पोषक असतात.

* यकृत आणि मूत्राशय:
जायफळ शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकणे खूप महत्त्वाचे असते. आहार, प्रदूषण, तणाव, तंबाखू सेवन तसेच काही औषधे आणि इतर बाहेरील पदार्थांचे सेवन यामुळे शरीरातील विषारी घटकांचे प्रमाण वाढते. जायफळाचा येथे टॉनिकसारखाच फायदा होतो. मूत्राशय आणि यकृत यांच्यातील विषारी घटक ते शरीराबाहेर टाकून ते साफ ठेवण्यास जायफळ मदत करते. आपल्यापैकी कोणालाही यकृताचा काही त्रास असेल, तर जायफळ नक्कीच फायदेशीर ठरेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Health benefits of nutmeg Jaiphal news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x