22 January 2025 10:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO
x

BREAKING | राज्यात यापुढे कुणालाही होम आयसोलेशन ठेवण्यात येणार नाही - आरोग्यमंत्री

Maharashtra corona pandemic

मुंबई, २५ मे | होम आयसोलेशनमध्ये असलेले अनेक कोरोना रुग्ण बाहेर फिरत असल्याचं दिसत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने होम आयसोलेशनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात या पुढे कुणालाही होम आयसोलेशन ठेवण्यात येणार नाही. रुग्णाला आता कोविड सेंटरमध्येच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 18 जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर राजेश टोपे यांनी मीडियाशी बोलताना ही माहिती दिली. राज्यात होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोविड सेंटरची संख्या वाढवून तिथेच रुग्णांना ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी कोविड सेंटरची संख्या वाढवण्यात येणार आहे. असं केल्याने सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही. तसेच सौम्य लक्षणे असेलेल रुग्ण सुपर स्प्रेडर बनून बाहेर फिरत असतात. त्यालाही आळा बसेल, असं टोपे यांनी सांगितलं.

दुसरी महत्वाची बाब म्हणजे, वित्तमंत्रालयाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीसाठी जो निधी दिला जातो त्यातून २५ टक्के खर्च हा कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी द्यावा अशी सूचना देण्यात आली आहे. ज्यात २५ ते ३० आयसोलेटेड बेड्स असतील असंही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

टेस्टींग फोकस पद्धतीने वाढवा:
तसेच, टेस्टींग ही फोकस पद्धतीने वाढवली पाहिजे असंही ते म्हणाले. याचा अर्थ जो पॉझिटीव्ह रुग्ण असेल त्याचे हायरिस्क आणि लॉ रिस्क कॉन्टटॅक्ट यामध्येच टेस्टींग झाली पाहिजे. कुठेही जाऊन टेस्ट करत पॉझिटीव्हीटी रेट कमी करु नये अशा सूचनाही यावेळी देण्यात आले आहेत. तसेच आशा वर्कर्स यांनाही खास ट्रेनिंग देऊन टेस्टींगमध्ये त्यांना सामिल करण्याचे ठरवले आहे. एक म्हणजे रेपिड एन्टीजन टेस्ट आणि दुसरी सेल्फ टेस्टींग किट्स जी कोविशिल्डची आली आहे त्याचं ट्रेनिंग देण्याचं ठरवलं आहे.

 

News English Summary: Many of the corona patients in home isolation appear to be walking outside. Therefore, the state government has taken a big decision regarding home isolation. No further home isolation will be maintained in the state. The patient will now be kept in isolation at the Covid Center, Health Minister Rajesh Tope said.

News English Title: No home isolation in Maharashtra now says health minister Rajesh Tope news updates.

हॅशटॅग्स

#RajeshTope(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x