Health First | दातातील कीड नष्ट | वेदना कमी करणारा सर्वोत्तम उपाय
मुंबई, १७ सप्टेंबर : तुम्ही सगळेच जाणता की, आपल्याला जीवनाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर आपले स्वास्थ्य उत्तम असणे खूपच जरूरी आहे. त्यासाठी शरीराचा प्रत्येक भाग तंदुरुस्त असला पाहिजे. जर आपण, दातातील किडीबद्दल बोलत असू, तर आजकाल ही समस्या बर्याच लोकांमध्ये दिसून येते. काही लोक आपल्या आवडीचे पदार्थ खायलादेखील घाबरतात.
दातदुखी हे अतिशय त्रासदायक दुखणे आहे. त्यामुळे आपल्याला रोजची कामे करणे पण कठीण होते. त्याच्या वेदांनांनी आपली मानसिक अस्वस्थता वाढते. यातून सुटका होण्यासाठी काही लोक पेनकिलर घेतात. पण हा झाला तात्पुरता उपाय. यामुळे दातातील कीड मरत नाही व थोडे दिवसांनी तो परत दुखायला लागतो. यावर आपल्याकडे घरगुती उपाय आहेत. तर, आज आम्ही तुम्हाला काही असे उपाय सुचवणार आहोत, जे केल्यामुळे तुमच्या दातातील कीड कायमची नष्ट होईल. बघा तर मग, कोणते आहेत ते उपाय?
तुळशीचे पान आणि कापुर:
जर तुमचा दात थोडासा दुखत असेल, तर तुळशीचे एक पान, आणि पूजेसाठी जो कापुर वापरतो तो घ्या. मग कापूर आणि तुळशीचे पान हातात घेऊन दोघांचा चुरा करा, एकत्र करून एक लाडूसारखे बनवा, म्हणजे तो तुमच्या दातात राहू शकेल. मग तो छोटा लाडू जिथे तुमचा दात दुखत आहे, त्या जागी ठेवा. लक्षात असुदे, की लाडू तेवढ्याच आकाराचा बनवा, जो तुमच्या दातात राहू शकेल. हा उपाय केल्याने तुम्हाला दातदुखीपासून लवकर आराम मिळेल.
लवंग तेल वापरा:
जिथे दातात दुखत असेल, किंवा कीड लागली असेल, तिथे तुम्ही लवंगेचे तेल कापसाच्या बोळ्यावर शिंपडा आणि ते लावा व थोडा वेळ लवंग तेलाला दातात राहू द्या. तेलाऐवजी तुम्ही लवंगेची पाऊडर वापरू शकता. तसेच, सुंठ पाऊडर पण या दुखण्यावर रामबाण उपाय आहे. मित्रांनो, ह्या उपायाने तुम्हाला दाताच्या वेदनेपासून आराम मिळेल. हे तुम्ही सतत केलेत, तर तुमच्या दातातील कीड निघून जाईल.
तुरटी:
याचा दूसरा उपाय पण आहे. तुम्हाला अर्धा चमचा तुरटी पाऊडर करून, मोहरीच्या तेल थोडे कोमट करून त्यात तुरटी पाऊडर मिसळा व एक पेस्ट तयार करा. ती कीड लागलेल्या दाताला लावा. यामुळे सुद्धहा तुमच्या दाताच्या दुखण्याला आराम मिळू शकेल. तुमचे दाताचे दुखणे कमी होईल व सतत हा प्रयोग केला, तर दातातील कीड कायमची नाहीशी होईल.
आले:
दात दुखत असल्यास, आल्याचा लहान तुकडा चघळत राहा, आल्याचा जो रस निघेल, तो दुखणार्या दाताकडे लावण्याचा प्रयत्न करा. आल्यामध्ये असलेल्या जंतूंनाशक घटकांमुळे तुमच्या दातात जर संसर्ग झाला असेल, तर त्यापासून तुम्हाला नक्कीच आराम पडेल. हा उपाय दिवसातून 2-3 वेळा करायला काही हरकत नाही.
News English Summary: A regular salt water rinse and cold compress application can typically remedy minor irritation, but more serious toothaches may require a dentist’s intervention. If your symptoms persist for more than a day or two, see your dentist. They can provide guidance on how to relieve your symptoms and prevent future pain. You should also talk to your dentist before using any of the following remedies if you’re pregnant, breastfeeding, or have any medical condition that may be impacted by herbal ingredients.
News English Title: Home made remedies and toothache Health Fitness Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO