24 December 2024 6:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स BEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर - NSE: BEL Penny Stocks | कर्ज मुक्त कंपन्यांचे 7 पेनी शेअर्स, किंमत 3 ते 5 रुपये, संयम श्रीमंत करू शकतो - Penny Stocks 2024 IPO Watch | स्वस्त IPO आला रे, प्राईस बँड 14 रुपये, संधी सोडू नका, कुबेर कृपा करू शकतो हा IPO - IPO GMP NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NHPC Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 3 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मजबूत परतावा मिळेल - NSE: TATATECH NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन सहित या 4 शेअर्समध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कमाईची मोठी संधी - NSE: NTPCGREEN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, 55 टक्केपर्यंत परतावा मिळेल - NSE: RELIANCE
x

Health First | चेहऱ्यावर वाफ घेण्याची योग्य पद्धत | आरोग्य आणि सौंदर्यासाठी फायदेशीर

Home made tips, steaming face, Smooth Face, Marathi News ABP Maza

मुंबई, २३ सप्टेंबर : आपला आठवडाभरचा थकवा दूर करण्यासाठी आपण कोणते न कोणते उपाय करीत असतो. त्यामध्ये आपल्या त्वचेची खास करून आपल्या चेहरा ताजा तजेल दिसण्यासाठी काही न काही उपाय करतो. त्यापैकी एक आहे “फेशियल ट्रीटमेंट” आणि त्यामध्ये देखील “स्टीम” घेणं हे महत्त्वाचे आहे. स्टीम किंवा गरम पाण्याची वाफ घेण्यामुळे आठवड्याचा थकवा तर दूर तर होतोच आणि आपल्या चेहऱ्याचे रोमछिद्र देखील उघडतात, तसेच त्वचे मधील रक्तपुरवठा वाढून त्वचा तजेल होते.

जर आपल्याला हे पार्लर मध्ये जाऊन करणं शक्य होत नसेल तर आपण घरातच गरम पाण्याची वाफ चेहऱ्यावर घेऊ शकता. त्यासाठी आम्ही आपल्याला स्टीम कशी घ्यावी याची योग्य पद्धत सांगत आहोत. चला तर मग स्टीम कशी घ्यावी आणि त्यापासून होणाऱ्या फायद्यांबद्दल जाणून घेऊया.

गरम पाण्याची वाफ घेण्याची पद्धत:
बहुतांश लोकं गरम पाण्याची वाफ घेण्यासाठी “फेस स्टीमर” चा वापर करतात. जर आपल्या घरात ते नसल्यास आपण चेहऱ्यावर वाफ घेण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी गरम करावं. गरम पाणी झाल्यावर भांडे गॅस वरून खाली काढून घ्या. नंतर आपल्या डोक्यावर टॉवेल झाकून आपला चेहरा त्या भांड्यावर झाका आणि सर्व बाजूने टॉवेल झाकून घ्या. आता आपल्या चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घ्या. डोळे घट्ट मिटून दीर्घ श्वास घ्यावा. आणि जेवढे सहन होईल तेवढंच करावं. असे केल्याने आपल्या त्वचेची रोमछिद्रे मोकळी होतात. आणि त्वचा मधील सर्व घाण बाहेर पडते. आणि त्वचा स्वच्छ आणि तजेल होते. त्याच बरोबर त्वचेमधील निस्तेजपणा कमी होतो. त्वचा चकाकते.

फायदे:
चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घेतल्याने त्वचा स्वच्छ होते. हे एका क्लिन्झर सम कार्य करतं. गरम पाण्याची वाफ घेतल्यानं त्वचेवरील आणि रोम छिद्रामध्ये जमलेली घाण बाहेर पडते. चेहऱ्यावर मुरूम, पुळ्या, पुटकुळ्या झाल्या असल्यास गरम पाण्याची वाफ घेताना काळजी घ्यावी.

गरम पाण्याची वाफ किंवा स्टीम घेतल्यावर चेहऱ्याची रोम छिद्र उघडतात. त्यामुळे त्वचा स्वच्छ होते. या वर आपण कोणतंही ब्युटी क्रीम लावल्यास त्वचा क्रीम शोषून घेते. त्याचे चांगले परिणाम चेहऱ्यावर दिसून येते.

स्टीम घेतल्यानं रक्त प्रवाह चांगला होतो. ज्यामुळे ऑक्सिजन आणि पोषक घटक मुबलक प्रमाणात चेहऱ्यापर्यंत पोहोचतात. परिणामी निस्तेज त्वचा टवटवीत होते आणि चकाकते. चेहरा नैसर्गिकरीत्या चमकतो.

स्टीम घेतल्यानं ब्लॅक किंवा व्हाईट हेड्स झाले असल्यास ते दूर होतात. आपल्या त्वचेला नैसर्गिक मॉइश्चरायझर त्वचेतून सीबम च्या स्रावामुळे मिळतं. त्यामुळे अतिरिक्त तेल रोमछिद्रामध्ये जमा होतं. जेणे करून मुरूम, ब्लॅक किंवा व्हाईट हेड्स होतात. हे दूर करण्यासाठी गरम पाण्याची वाफ घेऊन या त्रासाला दूर करता येणं सोपं होतं.

स्टीम घेतल्याने त्वचेस अँटी एजिंग फायदे मिळतात जेणे करून आपली त्वचा तरुण राहते. सरत्या वयामुळे आपल्या चेहऱ्यावर पडणाऱ्या सुरकुत्या दिसू लागतात. ते दिसू नये त्यासाठी आपण गरम पाण्याची वाफ घ्यावी. त्यामुळे चेहऱ्याची मृत त्वचा गळून पडते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चकाकी आणि तजेलता येते.

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

 

News English Summary: Looking for a way to step up your skin care game without breaking the bank? Facial steaming is a DIY skin treatment that cleanses, nourishes, and feels luxurious. Read on to find out how to get your glorious glow on without having to set foot in a spa. Steam opens up your pores and helps loosen any buildup of dirt for a deeper cleanse. Opening up your pores also softens blackheads, making them easier to remove.

News English Title: Home made tips for steaming face Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x