26 December 2024 6:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK EPFO Pension Alert | खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वर्षात पेन्शन वाढणार, जाणून घ्या फायद्याची अपडेट IRFC Share Price | रेल्वे स्टॉक IRFC सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या
x

Health First | जाणून घ्या उचकी थांबवण्याचे सोप्पे घरगुती उपाय । नक्की वाचा

remedies for hiccup

मुंबई १२ एप्रिल : असं म्हणतात की उचकी लागली म्हणजे कोणी तरी आपली आठवण काढत आहे. म्हणजेच एक प्रकारे ती व्यक्ती आपल्याला मिसकॉल देत आहे. पण काय हो, उचकी लागणे म्हणजे नेमकं काय होतं ? त्यापाठी कोणती करणं असतात ? आणि महत्वाचं म्हणजे उचकी लागल्यावर काय करावं ?

सोप्प्या भाषेत सांगायचं झालं तर उचकी लागणे म्हणजे विशिष्ट परिस्थितीला आपल्या शरीराने दिलेला प्रतिसाद उर्फ रिप्लाय. ही परिस्थिती म्हणजे जठरात आम्लाचे (अॅसिड) प्रमाण वाढणे, विषकारक पदार्थांची निर्मिती होणे किंवा अशाच प्रकारची असामान्य परिस्थिती निर्माण होणे. यामुळे होतं काय तर, छाती व पोट यामधील पडदा आणि बरगड्यांमधील स्नायू यांचे आकुंचन होते व हवा फुफ्फुसात जाण्यास अडथळा निर्माण होतो. यावेळी जो विशिष्ट प्रकारचा आवाज ऐकू येतो त्याला उचकी म्हणतात.

उचकी ही सर्वसाधारण आहे. कधीकधी ती सतत येत राहते. साधारणपणे ४ किंवा ५ वेळा उचकी येऊ शकते. पण काही वेळा ती एका मिनिटात ३० पेक्षा जास्त वेळा सुद्धा लागू शकते. उचकी जर महिनाभर किंवा त्यापेक्षा जास्त काळ लागत असेल तर त्याला अडेलतट्टू उचकी म्हणतात.

चला तर आता वळूयात उचकीच्या उपायांकडे

साखर : उचकी आल्यावर त्वरीत एक चमचा साखर खा. यामुळे थोड्यावेळात उचकी थांबून जाईल. साखरेच्या पाण्यात थोडं मीठ टाकल्यास ते थोडे थो़डे प्यायल्याने उचकी थोड्यावेळात बंद होते.

लिंबू आणि मध : उचकी आल्यावर एक चमचा लिंबूचा ताजा रस घ्या त्यात एक चमचा मध टाका आणि दोघांना मिक्स करून चाटण करा. हे चाटण घेतल्यावर उचकी बंद होईल.

हळूहळू जेवा : अनेकवेळा फास्ट खाल्ल्याने उचकी लागते, जेवताना हळूहळू आणि चावून जेवा, असे केल्यास उचकी थांबते. फास्ट खाल्ल्याने किंवा तिखट खाल्याने उचकी लागते.

आपला श्वास रोखून ठेवा : एक लांब श्वास घ्या आणि काही सेकंद रोखून ठेवा. जाणकारांनुसार फुफ्फुसात कार्बन डायऑक्साईड भरेल आणि डायफ्राम त्याला काढण्याच प्रयत्न करेल तर उचकी आपोआप थांबेल.

उलटे अंक मोजणे: उचकी लागली आणि तुमच्या आसपास पाणी किंवा काहीच उपाय नसतील तर उलटे अंक मोजा. अंक मोजताना श्वास रोखून धरल्यास आणखी फायदा होऊ शकतो.

मीठ किंवा मिठाचे पाणी : हा उपाय तुम्हाला अवघड वगैरे वाटू शकतो. एक चमचा मीठ तोंडात ठेवा. मीठ जास्त प्रमाणात घेतल्याने उचकी थांबते पण जर तुम्हाला मीठ आवडत नसेल तर तुम्ही मिठाचं पाणी सुद्धा घेऊ शकता.

News English Summary: It is said that a hiccup means that someone is remembering you. That is, in a way, the person is giving you a miscall. But what exactly is a hiccup? What to do next? And most importantly, what to do when you have a cough?

News English Title: Home remedies for hiccup news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x